AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टीम इंडियाच्या कोणत्या क्रिकेटरकडे आहेत सर्वात महागडी कार? करोडोंची किंमत

भारतीय क्रिकेट संघातील अनेक खेळाडूंना महागड्या कारंचा शौक आहे. या लेखात टीम इंडियातील सर्वात श्रीमंत क्रिकेटर्स आणि त्यांच्या करोडो रुपयांच्या कारबद्दल जाणून घेऊयात. त्यांच्या कारचा ब्रँड आणि किंमतीबद्दल जाणून नक्कीच आश्चर्य वाटेल.

टीम इंडियाच्या कोणत्या क्रिकेटरकडे आहेत सर्वात महागडी कार? करोडोंची किंमत
Which cricketer of Team India has the most expensive car? Image Credit source: tv9 marathi
| Updated on: May 04, 2025 | 4:20 PM
Share

बॉलिवूडमधील कलाकारांच्या लक्झरी आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी सगळ्यांनाच उत्सुकता असायची. पण कलाकारांसोबतच क्रिकेटर्सच्या आयुष्याबद्दलही जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असायचे. क्रिकेटर्सचे कपडे ते शूजच्या ब्रँडपासून सर्वकाही जाणून घेणे चाहत्यांनाही आवड असतेच.

बॉलिवूड सेलिब्रिटींप्रमाणेच क्रिकेटर्सना महागड्या आणि आलिशान गाड्यांचा शौक असतो. अनेकजण तर कोट्यवधी किंमत असलेल्या कार खरेदी करतात. हार्दिक, कोहली, धोनी अशा दिग्गज क्रिकेटर्सच्या नावांचा समावेश आहे. तेव्हा टीम इंडियाच्या कोणत्या क्रिकेटरकडे सर्वात महागडी कार आहे याबाबत जाणून घेऊयात. या क्रिकेटर्समध्ये 6 ते 7 जणांची नावे आहेत जे करोडोंची कार वापरतात.

7. जसप्रीत बुमराह

भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहकडे सर्वात महागडी कार मर्सिडीज मेबॅक एस560 आहे. तिची किंमत सुमारे 2.11 कोटी रुपये आहे.

6. श्रेयस अय्यर

आयपीएल 2025 मध्ये पंजाब किंग्जचे नेतृत्व करणाऱ्या श्रेयस अय्यरकडे लॅम्बोर्गिनी हुराकन ईव्हीओ आहे. त्याची किंमत 3.73 कोटी रुपये आहे.

5.केएल राहुल

आयपीएल 2025 मध्ये दिल्ली कॅपिटल्ससाठी शानदार कामगिरी करणारा विकेटकीपर फलंदाज केएल राहुलकडे अ‍ॅस्टन मार्टिन डीबी11 आहे. या कारची एक्स-शोरूम किंमत 4.2 कोटी रुपये आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, केएल राहुलकडे अ‍ॅस्टन मार्टिन DB11 देखील आ

4. विराट कोहली

कोहली जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूंपैकी एक आहे आणि त्याच्याकडे सर्वात महागडी कार, बेंटले कॉन्टिनेंटल जीटी आहे. या कारची एक्स-शोरूम किंमत 4.04 कोटी रुपये आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बेंटले व्यतिरिक्त, कोहलीकडे ऑडी आर8 एलएमएक्स, ऑडी क्यू8 आणि ऑडी आरएस 5 सारख्या अनेक लक्झरी कार आहेत.

3. रोहित शर्मा

भारतीय संघाचा एकदिवसीय आणि कसोटी कर्णधार रोहित शर्मालाही महागड्या आणि आलिशान गाड्यांचा शौक आहे. रोहितकडे लॅम्बोर्गिनी उरुस आहे. या कारची किंमत 4.18 कोटी ते 4.57 कोटी रुपयांपर्यंत आहे. रोहित शर्माच्या गॅरेजमध्ये मर्सिडीज-बेंझ एस-क्लास देखील आहे.

2.रवींद्र जडेजा

भारतीय संघाचा डॅशिंग अष्टपैलू रवींद्र जडेजाकडे अनेक प्रकारच्या गाड्या आहेत. जडेजाकडे एक महागडी कार रोल्स रॉयस व्रेथ. बाजारात त्याची शोरूमची किंमत सुमारे 5 कोटी रुपये आहे. ही कार फक्त 4.5 सेकंदात 0 ते 100 पर्यंत जाऊ शकते.

1. हार्दिक पांड्या

आयपीएल 2025 मध्ये मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करणाऱ्या टीम इंडियाचा स्टार ऑलराउंडर हार्दिक पांड्याकडे सर्वात महागडी कार आहे. हार्दिककडे रोल्स रॉयस फॅंटम आहे. या कारची भारतात शोरूम किंमत सुमारे 9.50 कोटी रुपये आहे.

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.