IND vs WI : भारताविरुद्ध शतक ठोकणारा वेस्ट इंडिजचा पहिला मुस्लिम क्रिकेटर आमिर जांगू कोण आहे ? विजयासाठी महाप्रचंड 400 प्लसचं टार्गेट

IND vs WI : वेस्ट इंडिज विरुद्ध गुवहाटी येथे सुरु असलेल्या दुसऱ्या वनडेत धावांचा पाऊस पहायला मिळाला. एकाच मॅचमध्ये वेस्ट इंडिजच्या तीन फलंदाजांनी शतकं झळकावली. यात भारताविरुद्ध शतक ठोकणारा आमिर जांगू वेस्ट इंडिजचा पहिला मुस्लिम क्रिकेटर ठरला आहे.

IND vs WI : भारताविरुद्ध शतक ठोकणारा वेस्ट इंडिजचा पहिला मुस्लिम क्रिकेटर आमिर जांगू कोण आहे ? विजयासाठी महाप्रचंड 400 प्लसचं टार्गेट
Ind vs Wi 3rd ODI amir jangoo
Image Credit source: PTI
| Updated on: Sep 30, 2026 | 7:52 PM

गुवाहाटी येथे सुरु असलेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी कमाल केली. त्यांनी भारतीय गोलंदाजी फोडून काढली. एकाच सामन्यात वेस्ट इंडिजकडून तीन फलंदाजांनी शतकं ठोकली. मैदानावर चौकार, षटकारांचा पाऊस पहायला मिळाला. वेस्ट इंडिजचा डावखुरा फलंदाज आमिर जांगूने जबरदस्त बॅटिंग केली. त्याने भारताविरुद्ध अवघ्या 70 चेंडूत शतक ठोकलं. आमिर जांगूची ही सेंच्युरी वेस्ट इंडिजसाठी खूप खास आहे. कारण भारताविरुद्ध शतक झळकवणारा तो पहिला मुस्लिम खेळाडू आहे. वेस्ट इंडिजच्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये आमिर जांगू दीर्घकाळापासून दमदार प्रदर्शन करत होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये संधी मिळाल्यानंतर त्याने त्याच्यावरचा विश्वास सार्थ ठरवला. आमिर जांगूने अवघ्या 77 चेंडूत भारताविरुद्ध 114 धावा फटकावल्या. 150 च्या आसपास त्याचा स्ट्राइक रेट होता. वेस्ट इंडिजने 400 पार धावा केल्या. भारतासमोर विजयासाठी 406 धावांचं टार्गेट ठेवलं आहे.

आमिर जांगूला रवींद्र जाडेजाने बाद केलं. पण त्याआधी आमिरने गुरनूर बराडच्या गोलंदाजीवर चांगल्याच धावा वसूल केल्या. गुरनूरच्या 21 चेंडूत आमिर जांगूने 41 धावा फटकावल्या. कुलदीप यादवच्या 15 चेंडूत त्याने 24 धावा केल्या. नमन धीरच्या गोलंदाजीवर फक्त आमिर जांगूने सावध फलंदाजी केली. अन्य भारतीय गोलंदाजांचा मात्र त्याने समाचार घेतला. जांगूने कॅप्टन शे होप सोबत मिळून चांगली पार्ट्नरशिप केली. आमिर जांगूने 44 चेंडूत अर्धशतक झळकावलं. पण त्यानंतर 30 चेंडूत तो शतकापर्यंत पोहोचला. होपसोबत मिळून जांगूने 131 चेंडूत 182 धावांची भागीदारी केली.

Loading...

आमिर जांगूचा जन्म कधी झाला?

14 जुलै 1997 रोजी त्रिनिदादच्या सेंट जेम्स येथे आमिर जांगूचा जन्म झाला. फातिमा कॉलेजमधून तो क्रिकेट खेळला आहे. हे तेच कॉलेज आहे, ज्यांनी ब्रायन लारासाख्या फलंदाजांना घडवलं. 2024 मध्ये आमिर जांगूने वनडेमध्ये डेब्यू केला. त्यावेळी 79 चेंडूत त्याने शतक झळकावलं होतं. नंबर 6 वर फलंदाजी करताना त्याने हे शतक ठोकलं होतं. याचवर्षी 2026 साली त्याने त्रिनिदादला फर्स्ट क्लास टूर्नामेंटमध्ये चॅम्पियन बनवलं. जून महिन्यात त्याने डबल सेंच्युरी झळकवली होती. याच महिन्या कॅरेबियन प्रीमियर लीगच्या फायनलमध्ये त्याने हाफ सेंच्युरी झळकवली. आता या खेळाडूने भारताविरुद्ध ऐतिहासिक शतक ठोकलं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us