अर्जुन कि सचिन तेंडुलकर कोणाची सासुरवाडी जास्त श्रीमंत ?
सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याचा साखरपुडा झाला आहे. अर्जुनची सासुरवाडी देखील खुपच श्रीमंत आहे. चला तर जाणून घेऊयात सचिन आणि अर्जून यांचे इन लॉ काय करतात ?

क्रिकेटचा देव म्हटला जात असलेला खेळाडू सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याचा साखरपुडा झाल्याचे वृत्त आहे. अर्जुन तेंडुलकर याचा साखरपुडा मुंबईतील मोठे बिजनसमन रवी घई यांची नात सानिया चंडोक हिच्याशी झाला आहे. सचिन तेंडुलकर याच्या लग्नाला ३० वर्षे झाली आहे. सचिनने अंजली मेहता हिच्याशी २४ मे १९९५ रोजी लग्न केले होते. अंजली हिचे वडील आनंद मेहता गुजरातचे मोठे व्यापारी आहे. अंजलीची आई एन्नाबेल मेहता ब्रिटनच्या रहीवाशी होत्या त्या लग्नानंतर भारतात राहायला आल्या होत्या.
अंजली तेंडुलकर यांचं कुटुंब
अंजली हीचे सुरुवातीचे शिक्षण मुंबईत झाले आणि त्यानंतर तिने मुंबईतील मेडिकल कॉलेजात प्रवेश घेतला. अंजली या लहान मुलांच्या डॉक्टर आहेत. सचिन प्रचंड प्रसिद्ध असूनही अंजली हीने स्वत:चे खाजगी जीवन जपले आहे.अंजलीचे वडील मोठे बिजनसमन आहेत. आणि त्यांचा संबंध एका श्रीमंत परिवाराशी आहे. तर सचिन तेंडुलकर याची संपत्ती १७० दशलक्ष डॉलर इतकी आहे. जिचे भारतीय चलनात मुल्य १४ अब्ज रुपये आहे.
अर्जुन तेंडुलकरची श्रीमंत सासुरवाडी
सानिया चंडोक ही फॅमिली घई कुटुंबाकडे मोठी संपत्ती आहे. हे कुटुंब ग्रॅव्हीस ग्रुप अंतर्गत द ब्रुकलिन क्रिमरीचे मालक आहे. देशात सुरु असलेली बास्कीन – रॉबिन्सची फ्रेंचाईजी हाच ग्रुप चालवतो आहे. या कुटुंबाचे मुंबईत इंटरकॉन्टिनेंटल हॉटेल देखील आहे. रवी घई देखील पैशांच्या बाबतीत सचिन तेंडुलकर यांच्या हून कमी नाहीत. अंजली तेंडुलकर सह सानिया देखील श्रीमंत घराण्यातून तेंडुलकर यांची सून बनून येणार आहे.
अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चंडोक यांचा साखरपुडा १२ ऑगस्ट रोजी गुपचुप पद्धतीने कोणताही गाजावाजा न करता करण्यात आला. या साखरपुड्याची बातमी १३ ऑगस्ट रोजी अखेर फुटलीच. सानिया, अर्जुनची लहानपणीची मैत्रीण आहे. आणि सचिनची मुलगी सारा हीची मैत्रीणही आहे.
