Women IPL 2022 : शेतकऱ्याची लेक खेळणार महिला आयपीएल, गावात घेतले क्रिकेटचे धडे

Women IPL 2022 : शेतकऱ्याची लेक खेळणार महिला आयपीएल, गावात घेतले क्रिकेटचे धडे
Image Credit source: tv9 marathi

मला खूप आनंद झाला आहे. मी सिलेक्ट झाली आहे आयपीएलसाठी, मी मागच्या सात वर्षापासून एस वी नेट अकॅडमीत क्रिकेटचा सराव करीत आहे. शशिकांत निर्हाळी यांच्या मार्गदर्शनाखाली क्रिकेटचे धडे घेतले आहेत.

कुणाल जायकर

| Edited By: महेश घोलप, टीव्ही 9 मराठी डिजीटल

May 16, 2022 | 11:41 AM

अहमदनगर – सध्या आयपीएल (IPL 2022) सुरू असल्याने प्रत्येक दिवशी क्रिकेट चाहत्याला आज काय होणार याची उत्सुकता असते. सध्या आयपीएलमधून अनेक संघ खराब कामगिरीमुळे बाहेर पडत आहेत. दुसरी क्रिकेटच्या आनंदाची बातमी अशी आहे की, महिलांचं आयपीएल (Women IPL 2022) 23 मे पासून सुरू होत आहे. विशेष म्हणजे अहमदनगरच्या पाथर्डी सारख्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या मुलीने कष्ट आणि जिद्दीच्या जोरावर महिला आयपीएल क्रिकेटपर्यंत धडक मारलीये. ग्रामीण भागात असेलल्या एका अकॅडमीचं मार्गदर्शन घेतलं आहे. आरती शरद केदार (Arati Sharad Kedar) असं महिला खेळाडूचं नाव आहे. पाथर्डी तालुक्यातील हात्राळ या छोट्याशा गावातून आरतीने शशिकांत निर्हाळी सरांच्या मार्गदर्शनाखाली क्रिकेटचे धडे घेतले आहेत. 23 मे पासून सुरू होणाऱ्या महिला आयपीएल खेळण्यासाठी तीची तयारी झाली आहे.

क्रिकेटसाठी आई-वडीलांचं सहकार्य

मला खूप आनंद झाला आहे. मी सिलेक्ट झाली आहे आयपीएलसाठी, मी मागच्या सात वर्षापासून एस वी नेट अकॅडमीत क्रिकेटचा सराव करीत आहे. शशिकांत निर्हाळी यांच्या मार्गदर्शनाखाली क्रिकेटचे धडे घेतले आहेत. मागच्या सात वर्षांपासून क्रिकेट शिकण्यासाठी येत असलेल्या सगळ्या मुलींना शशिकांत निर्हाळी हे मोफत मार्गदर्शन करीत आहेत. तिथं सराव करीत असलेल्या चार मुली राज्यस्तरीय क्रिकेट खेळत आहेत. माझं ध्येय भारतासाठी खेळणं आणि भारताला वर्ल्डकप जिंकून देणं असं आहे. माझे आई-वडील शेती करतात, त्याचबरोबर त्यांचा मला अधिक सहकार्य आहे.

ग्रामीण भागातल्या मुलींनी खेळण्यासाठी बाहेर पडावे

ग्रामीण भागातल्या मुली खेळण्यासाठी घरातून बाहेर पडत नाही. परंतु माझं त्यांना असं सांगणं आहे की, कोणत्याही खेळासाठी घरातून बाहेर पडा. आपल्या फीटनेससाठी ते गरजेचं आहे.

हे सुद्धा वाचा

तुमचं एखाद्या खेळात करिअर झालं नाही, तर तुमचा फिटनेस चांगला राहतो असं आरती शरद केदार यांनी सांगितलं.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें