AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

World Cup 2025 : स्मृती मंधाना, हरमनप्रीत कौर की मिताली राज, टीम इंडियाची सर्वांत श्रीमंत खेळाडू कोण ?

Smriti Mandhana Harmanpreet Kaur or Mithali Raj Net worth : भारतीय महिला संघाने अनेक वर्षांचा दुष्काळ संपवत रविवारी वर्ल्डकप ट्रॉफीवर नाव कोरलं. या विजयात अनेकांना मोलाचा वाटा बजावलाय. भारतीय संघातील खेळाडू स्मृती मंधाना, हरमनप्रीत कौर की मिताली राज यांचाही विजयात सिंव्हाचा वाटा आहे. त्यांचं नेटवर्थ किती, तिघींपैकी श्रीमंत कोण, चला जाणून घेऊया.

World Cup 2025 : स्मृती मंधाना, हरमनप्रीत कौर की मिताली राज, टीम इंडियाची सर्वांत श्रीमंत खेळाडू कोण ?
टीम इंडियाची सर्वांत श्रीमंत खेळाडू कोण ? Image Credit source: social media
| Updated on: Nov 04, 2025 | 8:26 AM
Share

रविवारी डी.वाय. पाटील स्टेडिअमवर झालेल्या फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेला 52 धावांनी हरवत भारताने वर्ल्डकप 2025 ची (World Cup 2025) ट्रॉफी उचलली आणि एक नवा इतिहास रचला. या शानदार विजयामुळे जल्लोषाला उधाण आलं असून सध्या जळी स्थळी काष्ठी पाषाणी महिला वर्ल्डकपच्याच चर्चा आहेत. या यशानंतर बीसीसीआय पासून आयसीसीपर्यत अनेकांनी महिला खेळांडूंवर बक्षिसांचा वर्षाव केला आहे, यावेळची रक्कमही खूप मोठी आहे. गेल्या 47 वर्षांत पहिल्यांदाच टीम इंडियाने महिला वर्ल्ड कप जिंकला असून त्या ट्रॉफीवर दिमाखात नाव कोरलं आहे. या खास प्रसंगी, प्रत्येकाच्या तोंडी भारतीय स्टार खेळाडूंच्या कामगिरीची चर्चा आहे. त्यांच्याबद्दल प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यास चाहते उत्सुक आहे. खेळाडूंच्या कमाईबद्दलही अनेकांना जाणून घ्यायची इच्छा असते. आज आपण स्मृती मंधाना, हरमनप्रीत कौर आणि माजी कर्णधार मिताली राज यांच्या नेटवर्थबद्दल जाणून घेऊ. पाहूया त्यांची कमाई…

मिताली राज

मिताली राज (Mithali Raj) हे नाव सर्वांनाच माहिती आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार मिताली राज एक हुशार खेळाडू होती. तिने वयाच्या 10 व्या वर्षी तिच्या मोठ्या भावासोबत क्रिकेट खेळायला सुरुवात केली. एकदा तिचा प्रवास सुरू झाल्यावर ती थेट टीम इंडिय़ात खेळेपर्यंत पोहोचली आणि नंतर संघाचे नेतृत्वही केलं. टीम इंडिया आज ज्या स्थानी आहे, तिथपर्यंत पोहोचवण्यात मितालीने महत्वाची, मोठी भूमिका बजावली आहे. ती महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारी खेळाडू आहे.

रिपोर्ट्सनुसार, मितालीची एकूण संपत्ती सुमारे 40-45कोटी आहे. ती भारतातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटपटू आहे.क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरही, मिताली ब्रँड एंडोर्समेंट, मार्गदर्शन भूमिका आणि क्रिकेट विकास उपक्रमांमध्ये बूत उपस्थितीद्वारे भरपूर कमाई करते.

स्मृती मंधाना

वर्ल्डकप 2025 मध्ये स्मृती मंधानाने उत्कृष्ट कामगिरी केली. ती संघाची उपकर्णधार देखील आहे. रिपोर्ट्सनुसार, तिची एकूण संपत्ती अंदाजे 32-34 कोटी आहे. स्मृतीवा बीसीसीआयकडून वार्षिक 50 लाख रुपये पगार मिळतो. ती बीसीसीआयच्या वार्षिक करार ग्रेड ए मध्ये आहे. एवढंच नव्हे तर ती महिला प्रीमियर लीगमधून दरवर्षी 3.4 कोटी कमावते आणि जाहिराती आणि गुंतवणुकीतून देखील तिची बक्कळ कमाई होते. मंधाना हिचा SM-18 कॅफे नावाचा स्वतःचा कॅफे देखील आहे.

हरमनप्रीत कौर

भारताला विश्वचषक जिंकून देण्यात मोलाचा वाटा बजावणारी हरमनप्रीत कौरही खूप सध्या चर्चेत आहे. सर्वजण तिच्यावर स्तुतीसुमनं उधळत आहेत. पण या स्थानापर्यंत पोहोचण्यासाठी तिने खूप मेहनत घेतली आहे. रिपोर्ट्सनुसार, तिची एकूण संपत्ती अंदाजे 25 कोटी रुपये आहे.वर्ल्डकपपासून तिची ब्रँड व्हॅल्यू सातत्याने वाढत आहे. हरमनप्रीत तिच्या बीसीसीआय ग्रेड ए करारातून दरवर्षी 50 लाख रुपये आणि WPL मध्ये मुंबई इंडियन्ससोबत दर हंगामात 1.8 कोटी रुपये कमावते.

माझ्या ऐवजी विरोधकांनी...; जयंत पाटलांचं मोठं विधान
माझ्या ऐवजी विरोधकांनी...; जयंत पाटलांचं मोठं विधान.
ठाकरेंनी येऊन कलादालन बघावं! प्रताप सरनाईकांचं निमंत्रण
ठाकरेंनी येऊन कलादालन बघावं! प्रताप सरनाईकांचं निमंत्रण.
त्यांची पात्रता आहे का? अनिल देशमुखांचा विखे पाटलांना टोला
त्यांची पात्रता आहे का? अनिल देशमुखांचा विखे पाटलांना टोला.
वांद्र्यातल्या किल्ल्यावर पार्टी, अखिल चित्रेंकडून व्हिडीओ टि्वट!
वांद्र्यातल्या किल्ल्यावर पार्टी, अखिल चित्रेंकडून व्हिडीओ टि्वट!.
सुप्रिया सुळे यांच्याकडून नवले पूल अपघातस्थळाची पाहणी
सुप्रिया सुळे यांच्याकडून नवले पूल अपघातस्थळाची पाहणी.
बिहारमध्ये काँग्रेसचा सुपडासाफ झालाय! गजानन काळे यांची तीव्र टीका
बिहारमध्ये काँग्रेसचा सुपडासाफ झालाय! गजानन काळे यांची तीव्र टीका.
उमेदवार उभे करू नका सांगितंल होतं! अजितदादांच्या त्या विधानाची चर्चा
उमेदवार उभे करू नका सांगितंल होतं! अजितदादांच्या त्या विधानाची चर्चा.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वसंतराव नाईक पुतळ्याचे अनावरण
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वसंतराव नाईक पुतळ्याचे अनावरण.
भाजपने आता अमेरिकेत जाऊन निवडणूक लढवावी! आदित्य ठाकरेंचा टोला
भाजपने आता अमेरिकेत जाऊन निवडणूक लढवावी! आदित्य ठाकरेंचा टोला.
युती करायची आहे, त्यांच्यासोबत...; युतीच्या चर्चेवर निलेश राणेंचे मोठे
युती करायची आहे, त्यांच्यासोबत...; युतीच्या चर्चेवर निलेश राणेंचे मोठे.