AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IndvsSL : श्रीलंकेची बॅटिंग, जाडेजा- कुलदीप भारतीय संघात

विश्वचषकात भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात आज सामना होत आहे. भारताने सेमीफायनलमध्ये आधीच धडक मारली आहे. भारत सध्या गुणतालिकेत दुसऱ्या नंबरवर आहे.

IndvsSL : श्रीलंकेची बॅटिंग, जाडेजा- कुलदीप भारतीय संघात
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Jul 06, 2019 | 2:41 PM
Share

लंडन :  विश्वचषकात भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात आज सामना होत आहे. या सामन्यात श्रीलंकेने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारताने आजच्या सामन्यात दोन बदल केले आहेत.  मोहम्मद शमी आणि युजवेंद्र चहल यांना विश्रांती देण्यात आली असून, त्यांच्याऐवजी रवींद्र जाडेजा आणि कुलदीप यादवला संधी देण्यात आली. केदार जाधवला या सामन्यातूनही वगळण्यात आलं आहे. बांगलादेशविरुद्ध संघात स्थान मिळालेल्या दिनेश कार्तिकला पुन्हा संधी देण्यात आली आहे.

भारत नंबर एकचं स्थान पटकावण्यासाठी लीड्सच्या हेडिंग्ले मैदानात उतरत आहे. भारताने सेमीफायनलमध्ये आधीच धडक मारली आहे. भारत सध्या गुणतालिकेत दुसऱ्या नंबरवर आहे. मात्र श्रीलंकेला हरवून आज अव्वलस्थानी पोहोचण्याचा भारताचा इरादा आहे. असं असलं तरी भारताला अव्वलस्थानी पोहोचण्यासाठी सध्या पहिल्या नंबरवर असलेल्या ऑस्ट्रेलियाला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात पराभव स्वीकारावा लागणार आहे.

दरम्यान, भारताचा या विश्वचषकात केवळ एक पराभव झाला आहे. भारताने 6 विजय मिळवले असले, तरी सेमीफायनलच्या तोंडावर भारताला मधल्या फळीची चिंता सतावत आहे. केदार जाधव, महेंद्रसिंह धोनी, हार्दिक पंड्या यांच्यावर मधल्या फळीची जबाबदारी आहे. मात्र धोनी आणि केदार जाधवने आतापर्यंत निराशा केली आहे. त्यामुळे केदार जाधवला बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात बाहेर बसावं लागलं.

ICC World Cup 2019 : मुंबई इंडियन्सकडून एकत्र खेळले, आता बुमराहबद्दल मलिंगा म्हणतो….   

टीम इंडियाला मीडल ऑर्डरची चिंता सतावत आहे. विजय शंकरला दुखापतीमुळे माघारी धाडून त्याजागी मयांक अग्रवालला संघात घेतल्यानं कदाचित आजच्या सामन्यात सलामीला मयांक अग्रवाल आणि रोहित शर्मा उतरवण्याची शक्यता आहे. तर, केएल राहुलला मीडल ऑर्डर म्हणजे चौथ्या क्रमांकावर उतरण्याची शक्यता आहे.

श्रीलंकेचे वनडे वर्ल्डकपमधील आव्हान भले संपुष्टात आले असेल. मात्र आपला स्पर्धेचा समारोप भारतावर विजय मिळवूनच करू, असे आत्मविश्वासाने परिपूर्ण उद्गार काढले आहेत ते या संघाचा ऑफस्पिनर धनंजय डीसिल्वानं. मुळात स्पर्धेतील आव्हानच संपुष्टात आल्यानं श्रीलंकेकडे गमावण्यासारखं काहीच नाही. पण, या सामन्यात जर भारत हरला तर भारताची लढत इंग्लंडसारख्या बलाढ्य संघाशी होणार आहे. वर्ल्डकपच्या सामन्यात इंग्लंडनं भारतावर 31 धावांनी विजय मिळवला होता.  त्यामुळे नक्कीच हा सामना भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.

चौथ्या नंबरशी लढत

भारत श्रीलंकेविरुद्धचा सामना जिंकला तर, भारत 15 अंकांसोबत गुणतालिकेत पहिल्या स्थानावर पोहचेल आणि भारताची लढत चौथ्या नंबरवरील संघाशी होणार. पण, यासाठीही आणखी एक अडथळा असणार तो म्हणजे सध्या गुणतालिकेत नंबर एकला असणारा ऑस्ट्रेलियाचा संघ. शनिवारी ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेचा होणाऱ्या सामन्यात जर दक्षिण आफ्रिकेनं ऑस्ट्रेलियाला हरवलं तर, ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानी जाईल आणि भारताची थेट लढत चौथ्या स्थानी असलेल्या न्यूझीलंड संघाशी होईल.

विश्वचषकातील गुणतालिका

देश विजय गुण
ऑस्ट्रेलिया 7 14
भारत 6 13
इंग्लंड 6 12
न्यूझीलंड 5 11

संबंधित बातम्या 

ICC World Cup 2019 : मुंबई इंडियन्सकडून एकत्र खेळले, आता बुमराहबद्दल मलिंगा म्हणतो….   

भारताची चिंता वाढली, सेमीफायनलपूर्वी विराटवर कारवाईची शक्यता  

पाकिस्तानचा पत्ता कट, भारताचा सेमीफायनल इंग्लंड किंवा न्यूझीलंडविरुद्ध  

…म्हणून धोनी प्रत्येक सामन्यात तीन बॅट वापरतो

Follow Us
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी...
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी नाकारली तरी मनोज जरांगे ठाम
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना...
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना दिले महत्त्वाचे आवाहन
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही
Lalbag Cha Raja : अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही उपस्थित
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी..
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी घेतले गणपती बाप्पांचे दर्शन
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... फडणवीसांचं मराठा आंदोनलनाबाबत
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... देवेंद्र फडणवीस यांचे मराठा आरक्षणावर मोठे विधान
राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
Parag Shah | गुरूंच्या आदेशाने राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक गणेश मूर्ती