…म्हणून धोनी प्रत्येक सामन्यात तीन बॅट वापरतो

सध्याच्या विश्वचषकात धोनी कुठल्याही सामन्यादरम्यान फलंदाजी करताना तीन वेगवेगळ्या बॅट वापरतो. या तिन्ही बॅट वेगवेगळ्या स्पॉन्सरच्या असतात. धोनी कधी SS, SG तर कधी  BAS कंपनीच्या बॅटने खेळताना दिसतो. धोनी सामन्यात तीन वेगवेगळ्या बॅटने का खेळतो, याचं रहस्य त्याचे मॅनेजर अरुण पांडे यांनी आता उघड केलं आहे.

...म्हणून धोनी प्रत्येक सामन्यात तीन बॅट वापरतो
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 9:33 PM

लंडन : आयसीसी विश्वचषक 2019 मध्ये भारताने उपांत्यफेरीत मजल मारली आहे. मात्र, यंदाचा हा विश्चचषक भारतीय क्रिकेट चाहत्यांचा आवडता खेळाडू महेंद्र सिंग धोनीचा शेवटचा विश्वचषक ठरु शकतो. यंदाच्या विश्वचषकात धोनी फलंदाजीमध्ये काही खास कामगिरी करु शकला नाही. सात सामन्यांमध्ये 93 च्या स्ट्राईक रेटने अवघे 223 धावा काढल्या आहेत. त्यामुळे अनेक क्रिकेट समीक्षकांकडून त्याच्या या मंद खेळीवर टीका केली जात आहे.

हा विश्वचषक धोनीचा शेवटचा विश्वचषक ठरला, तरी तो तुमच्या-आमच्या मनातून कधीही आऊट होणार नाही. त्याचं कारण म्हणजे धोनीचा स्वभाव. मैदानावर कितीही बिकट परिस्थिती असली, तरी धोनी ती अगदी सहज सांभाळतो. मैदानावर असो किंवा मैदानाबाहेर धोनी नेहमीच सर्वांची मनं जिंकतो. त्याच्या नम्रपणाचे अनेक किस्से आपण आजवर ऐकले असेल. अशीच एक गोष्ट सध्या विश्वचषकात घडत आहे.

सध्याच्या विश्वचषकात धोनी कुठल्याही सामन्यादरम्यान फलंदाजी करताना तीन वेगवेगळ्या बॅट वापरतो. या तिन्ही बॅट वेगवेगळ्या स्पॉन्सरच्या असतात. धोनी कधी SS, SG तर कधी  BAS कंपनीच्या बॅटने खेळताना दिसतो. धोनी सामन्यात तीन वेगवेगळ्या बॅटने का खेळतो, याचं रहस्य त्याचे मॅनेजर अरुण पांडे यांनी आता उघड केलं आहे.

धोनीच्या जीवनातील संघर्ष, त्याचा एक क्रिकेटर होण्याचा प्रवास आपण त्याच्या बायोपिक ‘एमएस धोनी द अनटोल्ड स्टोरी’मध्ये पाहिला आहे. त्यामध्ये त्याला एक बॅट मिळवण्यासाठी किती प्रयत्न करावे लागतात, त्याचा मित्र त्यासाठी कंपनीमालकाकडे किती विनवण्या करतो, हेही आपण त्या सिनेमात पाहिलं आहे. याचं कंपनींच्या उपकाराचं कर्ज फेडण्यासाठी धोनी या तीन वेगवेगळ्या बॅटने खेळतो.

‘धोनीचं मनं खूप मोठं आहे. त्याला पैशांची गरज नाही. त्याच्याजवळ खूप पैसा आहे. तो सामन्यादरम्यान तीन वेगवेगळ्या स्पॉन्सर्सच्या बॅट वापरतो, त्यामागे एक चांगली भावना आहे. BAS ही कंपनी धोनीच्या क्रिकेटमधील करिअरच्या सुरुवातीपासून त्याच्यासोबत आहे. तर SG, SS या कंपनीनेही त्याला खूप मदत केली आहे. त्यामुळे तो या तीनही कंपनीच्या बॅटने तो विश्वचषकात खेळतो आहे आणि त्यासाठी तो पैसेही घेत नाही’, असं मॅनेजर अरुण पांडे यांनी सांगितलं.

2004 मध्ये जेव्हा धोनीने एक दिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पदार्पण केलं होतं. तेव्हा तो BAS च्या बॅटने खेळायचा. त्यानंतर तो अनेक कंपन्याच्या बॅटने खेळला. मात्र, ज्या तीन कंपन्यांनी त्याच्या सुरुवातीच्या काळात त्याला मदत केली, आज क्रिकेट करिअरच्या शेवटच्या दिवसांमध्ये तो त्याचं कंपनींच्या बॅटने खेळतो आहे.

विश्वचषक 2011च्या अंतिम सामन्यात श्रीलंका विरुद्ध षटकार ठोकून धोनीने भारताला जिंकवलं होतं. त्याची त्या बॅटचा 1.11 कोटी रुपयांमध्ये लिलाव झाला होता. क्रिकेटच्या इतिहासात ती बॅट सर्वात महाग बॅट पैकी एक समजली जाते.

गेल्या वर्षीपर्यंत धोनी SG आणि BAS व्यतिरिक्त स्पार्टनची बॅटही वापरायचा. मात्र, त्या कंपनीने धोनीला निश्चित रकम दिली नाही. त्यानंतर धोनीने त्या कंपनीवर केस केली.

क्रिकेटमध्ये खेळाडुच्या शरिरावर, बॅटवर जे काही स्टीकर असतात, ते स्‍पॉन्‍सरशिपचे असतात. त्यासाठी खेळाडूला 4 ते 5 कोटी रुपये मिळतात. विराट कोहलीला बॅटवर MRF चं स्टीकर लावण्यासाठी वर्षाला 8 ते 9 कोटी रुपये मिळतात.

संबंधित बातम्या :

जिंकण्यासाठी खेळले की नाही? धोनी-केदारच्या फलंदाजीवर प्रश्नचिन्ह

भारताचा विश्वचषकातला अंतिम सामना धोनीचाही अंतिम सामना ठरणार?

“धोनीच्या बळावर संघ चालतो, त्याच्याशिवाय विश्वचषक जिंकणं अशक्य”

भारताची चिंता वाढली, सेमीफायनलपूर्वी विराटवर कारवाईची शक्यता

Non Stop LIVE Update
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.