Novak Djokovic | टेनिस स्टार नोव्हाक जोकोविचला कोरोना, पत्नीही पॉझिटिव्ह

जगातील सर्वोतकृष्ट टेनिस खेळाडू नोव्हाक जोकोविचला कोरोनाची लागण झाली आहे. जोकोविचची कोरोना चाचणी करण्यात आली होती.

Novak Djokovic | टेनिस स्टार नोव्हाक जोकोविचला कोरोना, पत्नीही पॉझिटिव्ह

बेलग्रेड : जगातील सर्वोत्कृष्ट टेनिस खेळाडू  (Novak Djokovic Tested Positive For Corona) नोव्हाक जोकोविचला कोरोनाची लागण झाली आहे. जोकोविचची कोरोना चाचणी करण्यात आली होती. या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. जोकोविच व्यतिरिक्त त्याच्या पत्नीलाही कोरोनाची लागण झाली (Novak Djokovic Tested Positive For Corona) आहे.

जोकोविचने क्रोएशिया येथील टेनिस स्पर्धेत भाग घेतला होता. या स्पर्धेत सहभागी झालेले अनेक खेळाडू हे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते. त्यानंतर जोकोविचनेही स्वत:ची कोरोना चाचणी करवून घेतली. या चाचणीत जोकोविचलाही कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं.

यापूर्वी टेनिसचे बडे खेळाडू ग्रिगोर दिमित्रोव्ह, बोर्ना कॉरिक आणि विक्टर ट्रायकी यांनाही कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर क्रोएशिया येथे आयोजित टेनिस स्पर्धेला रद्द करण्यात आलं. या स्पर्धेच्या दुसर्‍या टप्प्यातील अंतिम सामन्यात नोव्हाक जोकोविच रशियाच्या आंद्रे रुबलेव्हशी खेळणार होता.

या स्पर्धेचं आयोजन जोकोविचच्या भावाने केलं होतं. यावेळी स्टेडियमध्ये सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन करण्यात आलेलं नव्हतं. त्यामुळे या स्पर्धेवर टीकाही करण्यात आली होती.

सर्बियाचे विक्टर ट्रायकी आणि त्यांच्या गर्भवती पत्नीलाही कोरोनाची लागण झाली आहे, असं ट्रायकी यांनी सांगितलं (Novak Djokovic Tested Positive For Corona).

संबंधित बातम्या :

Mohammad Irfan’s death rumours | पाक क्रिकेटर मोहम्मद इरफानच्या अपघाती मृत्यूची अफवा

BCCI अध्यक्ष सौरव गांगुलीच्या घरापर्यंत कोरोनाची मजल

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *