आलिशान गाडी देण्याची प्रशिक्षकाची इच्छा, यशस्वी जयस्वालचं उत्तर ऐकून ज्वाला सिंह अचंबित

यशस्वी जयस्वालला अलिशान गाडी गिफ्ट द्यावी, अशी इच्छा त्याचे प्रशिक्षक ज्वाला सिंह यांची होती (Yashasvi Jaiswal refuses car as a gift).

आलिशान गाडी देण्याची प्रशिक्षकाची इच्छा, यशस्वी जयस्वालचं उत्तर ऐकून ज्वाला सिंह अचंबित

मुंबई : आयसीसी अंडर 19 विश्वचषकात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या यशस्वी जयस्वालला अलिशान गाडी गिफ्ट द्यावी, अशी इच्छा त्याचे प्रशिक्षक ज्वाला सिंह यांची होती. मात्र यशस्वीने ही गाडी घेण्यास नकार दिला. जर कारच गिफ्ट द्यायची असेल तर तुमची जुनी कार द्या, असं यशस्वीने ज्वाला यांना सांगितलं. यशस्वीचा हा सल्ला ऐकून आपण अचंबित झाल्याची माहिती ज्वाला सिंह यांनी ‘नवभारत टाइम्स’ला दिली (Yashasvi Jaiswal refuses car as a gift).

“यशस्वीला एका कारची नितांत आवश्यकता होती. तो आपली वजनदार किटबॅग घेऊन स्टेडिअमला जायचा. ते पाहुन मला प्रकर्षानं जाणवायचं की, त्याला एक कार घेऊन द्यायला हवी. मात्र, त्यावेळी त्याचं वय 18 वर्ष पूर्ण नव्हतं. यशस्वीने 28 डिसेंबर 2019 रोजी आपला 18 वा वाढदिवस साजरा केला. आता यशस्वी आपलं ड्रायव्हिंग लायसन्स बनवू शकेल. त्यामुळे वाढदिवसाचं औचित्यसाधत त्याला कार गिफ्ट करायची हीच योग्य वेळ आहे, असं मला वाटलं. मात्र, तोपर्यंत यशस्वी वर्ल्डकपच्या तयारीला लागला होता”, असं ज्वाला सिंह यांनी सांगितलं.

अंडर 19 वर्ल्डकपसाठी यशस्वी दक्षिण आफ्रिकेला निघाला तेव्हा ज्वाला सिंह यांनी त्याला चांगली कामगिरी केल्यास कार गिफ्ट देऊ, असं आश्वासन दिलं होतं. यशस्वीने वर्ल्ड कपमध्ये धडाकेबाज कामगिरी करत कुणालाही नाराज केलं नाही. त्याने पूर्ण स्पर्धेत 400 धावा केल्या. अंतिम सामन्यातही यशस्वीने 84 धावा केल्या. मात्र तरीही सामना हातातून निसटल्यामुळे यशस्वी जयस्वाल नाराज आहे (Yashasvi Jaiswal refuses car as a gift).

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI