एका दिवसापूर्वी निवृत्तीची घोषणा, आता पुन्हा भारताकडून हे 2 खेळाडू मैदान गाजवण्यास सज्ज

या स्पर्धेतील सर्व सामन्यांच आयोजन रायपूरमध्ये करण्यात आलं आहे. एकूण 6 संघ या स्पर्धंत सहभागी होणार आहेत.

एका दिवसापूर्वी निवृत्तीची घोषणा, आता पुन्हा भारताकडून हे 2 खेळाडू मैदान गाजवण्यास सज्ज
या स्पर्धेतील सर्व सामन्यांच आयोजन रायपूरमध्ये करण्यात आलं आहे. एकूण 6 संघ या स्पर्धंत सहभागी होणार आहेत.
Follow us
| Updated on: Feb 27, 2021 | 5:14 PM

रायपुर : टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज आर विनय कुमार (R Vinay KUmar) आणि अष्टपैलू खेळाडू युसूफ पठाणने (Yusuf Pathan) शुक्रवारी 26 फेब्रुवारीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. पण आता हे दोघे खेळाडू पुन्हा टीम इंडियाकडून क्रिकेट खेळण्यास सज्ज झाले आहेत. या दोन्ही खेळाडूंची आज शनिवारी टीम इंडियामध्ये निवड करण्यात आली आहे. युसूफ आणि आर विनयची भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. हे दोन्ही खेळाडू भारतीय टीमकडून रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिज स्पर्धेत (Road Safety World Series) खेळताना दिसणार आहेत. या स्पर्धेत हो दोन्ही खेळाडू इंडिया लीजेंड्सचं (India legends) प्रतिनिधित्व करणार आहेत. (yusuf pathan and r vinay kumar play will in Road Safety World Series)

स्पर्धेंच स्वरुप आणि वेळापत्रक

या स्पर्धेत एकूण 6 संघ सहभागी होणार आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेले खेळाडू या स्पर्धेत खेळणार आहेत. या स्पर्धेचं आयोजन 5 ते 21 मार्चदरम्यान करण्यात आलं आहे. म्हणजे एकूण 16 दिवस या स्पर्धेचा थरार रंगणार आहे. या स्पर्धेतील सर्व सामने रायपूरमधील शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहेत. या स्पर्धेमध्ये भारत, श्रीलंका, वेस्टइंडीज, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, बांगलादेश संघातून निवृत्ती घेतलेले खेळाडू सहभागी होणार आहेत.

नमन ओझा सज्ज

युसूफ आणि कुमारच्या आधी विकेटकीपर नमन ओझाने काही दिवसांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला होता. नमनही या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी उत्सुक आहे. नमन या संघात विकेटकीपरची भूमिका बजावणार आहे.

विविध संघातील माजी खेळाडू या स्पर्धेत खेळताना दिसणार आहेत. यामुळे क्रिकेट चाहत्यांना पुन्हा एकदा आपल्या आवडत्या खेळाडूला मैदानात खेळताना पाहण्याची संधी मिळणार आहे. यामुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे.

श्रीलंकेकडून हे खेळाडू खेळणार

श्रीलंका लीजेंड्स संघात 2 नव्या खेळाडूंची एंट्री झाली आहे. उपुल थरंगाने काही दिवसांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला होता. या स्पर्धेत थरंगा श्रीलंकेच्या संघाकडून सलामी करताना दिसणार आहे. थरंगासह या संघात सनथ जयासूर्या, रसेल आर्नल्ड आणि तिलकरत्ने दिलशान यांचा ही समावेश आहे.

इंडिया लीजेंड्स टीम :- सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, युवराज सिंह, मोहम्मद कॅफ, प्रज्ञान ओझा, नोएल डेव्हिड, मुनाफ पटेल, इरफान पठान, मनप्रीत गोनी, युसूफ पठान, नमन ओझा, एस. बद्रीनाथ आणि विनय कुमार.

संबंधित बातम्या :

Vijay Hazare Trophy | IPL च्या AUCTION मध्ये अनसोल्ड, विजय हजारे स्पर्धेत 6 षटकारांसह खणखणीत शतक, फ्रँचायजींना चोख उत्तर

Yusuf Pathan Retirement : तडाखेबाज फलंदाज युसूफ पठाणचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा

(yusuf pathan and r vinay kumar play will in Road Safety World Series)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.