Amazon चा 48 तासांसाठी बंपर सेल, ऑफरचा फायदा घेण्यासाठी ‘या’ 12 टिप्स

अॅमेझॉनचा सोमवारपासून (15 जुलै) प्राईम डे सेल (Amazon Prime Day Sale) सुरु होत आहे. हा सेल 48 तासांसाठी मर्यादित असणार आहे.

Amazon चा 48 तासांसाठी बंपर सेल, ऑफरचा फायदा घेण्यासाठी ‘या’ 12 टिप्स

मुंबई : अॅमेझॉनचा सोमवारपासून (15 जुलै) प्राईम डे सेल (Amazon Prime Day Sale) सुरु होत आहे. हा सेल 48 तासांसाठी मर्यादित असणार आहे. यात ग्राहकांना स्मार्टफोन, ऑडिओ प्रॉडक्ट्स, टीव्ही आणि अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करता येणार आहेत.

अॅमेझॉनच्या या सेलचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला काही महत्त्वाच्या टिप्सही लक्षात ठेवाव्या लागणार आहेत. या टिप्स लक्षात ठेवल्यास तुम्हाला बंपर डिस्काउंटही मिळेल.

 1. अनेकदा अॅमेझॉनच्या वेबसाईटच्या तुलनेत अॅपवर जास्त चांगल्या ऑफर मिळतात. काहीवेळा तर खास ऑफर अॅपसाठीच लाँच केल्या जातात. त्यामुळे सर्वात आधी अॅमेझॉन अॅप डाऊनलोड करा.
 2. अॅप डाऊनलोड केल्यानंतर त्याच्या सेटिंग ऑप्शनमध्ये जा आणि तेथे नोटिफिकेशन्सवर क्लिक करा.
 3. ‘पर्सनलाईज्ड नोटिफिकेशन्स’चा पर्याय निवडा. त्यामुळे तुम्हाला तुम्ही शोधलेल्या अथवा खरेदीच्या यादीत टाकलेल्या प्रॉडक्ट्सचे अलर्ट मिळतील.
 4. अॅमेझॉनचा हा सेल 15 जुलैला रात्री 12 वाजता सुरु होणार आहे. त्यामुळे तुम्ही जी वस्तू खरेदी करायची आहे ती ‘अॅड टु कार्ट’ करुन ठेऊ शकता. त्यामुळे तुम्हाला कमीतकमी वेळेत खरेदी करता येईल. तुम्ही अगोदरच कार्डमध्ये वस्तू टाकली तरी सेलच्या दिवशी तुम्हाला ती वस्तू ऑफरमध्येच घेता येईल. सेलच्या दिवशी तुम्हाला त्या वस्तूची डिस्काऊटसह किंमत दिसेल.
 5. अॅमेझॉनने सेलच्या आधीच काही प्रोडक्ट आणि कॅटिगरीची यादी केली आहे. त्यात तुम्हाला कोणत्या प्रॉडक्टवर किती सवलत मिळणार आहे. ते पाहता येईल.
 6. या सेलमध्ये अशा काही ऑफर असतील ज्या केवळ अॅपवर उपलब्ध होतील. त्यामुळे एकदा अॅपवर नजर टाकणे केव्हाही फायदेचे ठरेल.
 7. जर तुम्ही अॅमेझॉन अॅप वापरत नसाल, तर तुम्ही तुमच्या कम्प्युटरवर अॅमेझॉन असिस्टंट डाऊनलोड करु शकता.
 8. सेल सुरु होण्याआधीच तुम्ही तुमच्या डेबिट/क्रेडिट कार्ड/यूपीआयच्या डिटेल्स सेव्ह करुन ठेऊ शकता.
 9. प्रत्येकवेळी प्रमाणे यावेळीही अॅमेझॉनने काही निवडक वस्तूवरील ऑफर्सची माहिती देते. त्यावरुन तुम्ही तुमची ‘विश लिस्ट’ अपडेट करु शकता.
 10. वेळ वाचवण्यासाठी तुम्ही अॅमेझॉन पे अकाऊंटवर पैसे अॅड करुन ठेऊ शकता.
 11. काही प्रोडक्ट्सच्या खरेदीसाठी ‘अॅमेझॉन पे’चा उपयोग केल्यास तुम्हाला अतिरिक्त सुट मिळते. त्यामुळे तुम्ही या पर्यायाचाही उपयोग करु शकता.
 12. या सेलमध्ये तुम्हाला कोणत्याही ऑफरचा फायदा घेण्यासाठी अॅमेझॉनची प्राईम मेंबर असणे अत्यावश्यक आहे.  जर तुम्ही प्राईम मेंमर नसाल तर तुम्ही केवळ 129 रुपये देऊन 1 महिन्यासाठी मेंबरशीप घेऊ शकता.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *