Vodafone ची बंपर ऑफर, 1 वर्ष दररोज 1.5GB डेटा आणि कॉलिंग मोफत

वोडाफोनने आपल्या ग्राहकांसाठी एक बंपर ऑफर (Bumper Offer) आणली आहे. टेलीकॉम ऑपरेटर वोडाफोन (Vodafone) आयडियाने (Idea) सीटीबँकेसोबत (Citibank) भागेदारी केली आहे. या अंतर्गत वोडाफोन आणि आयडियाच्या ग्राहकांना 365 दिवसांसाठी दररोज 1.5GB डेटा आणि कॉलिंग मोफत मिळणार आहे.

Vodafone ची बंपर ऑफर, 1 वर्ष दररोज 1.5GB डेटा आणि कॉलिंग मोफत

मुंबई: वोडाफोनने आपल्या ग्राहकांसाठी एक बंपर ऑफर (Bumper Offer) आणली आहे. टेलीकॉम ऑपरेटर वोडाफोन (Vodafone) आयडियाने (Idea) सीटीबँकेसोबत (Citibank) भागेदारी केली आहे. या अंतर्गत वोडाफोन आणि आयडियाच्या ग्राहकांना 365 दिवसांसाठी दररोज 1.5GB डेटा आणि कॉलिंग मोफत मिळणार आहे. मात्र, ही ऑफर केवळ सिटीबँकेचे क्रेडिट कार्ड घेणाऱ्यांसाठीच मर्यादित आहे. सीटीबँकेच्या कार्डधारकांना 4,000 रुपयांच्या खर्चानंतर अनलिमिटेड कॉलिंग आणि इंटरनेट डेटा मिळेल.

खरंतर वर्षभर मोफत कॉलिंग आणि दररोज 1.5GB डेटा हा वोडाफोन आणि आयडियाचा 1,699 रुपयांचा प्रीपेड प्लॅन आहे. मात्र, सीटीबँकेशी झालेल्या भागीदारीनंतर सीटीबँक क्रेडिट कार्ड धारकांना हा प्लॅन मोफत मिळणार आहे. त्यामुळे ज्यांना या ऑफरचा लाभ घ्यायचा आहे, त्यांना अगोदर सीटीबँकेचे क्रेडिटकार्ड घ्यावे लागणार आहे. विशेष म्हणजे वोडाफोनसोबतच आयडियाच्या ग्राहकांनाही याचा लाभ घेता येईल.

ऑफरच्या अटी काय?

या ऑफरचा लाभ घेण्यासाठी काही अटी देखील ठेवण्यात आल्या आहेत. वोडाफोन आयडियाने याबाबत माहिती दिली आहे. यानुसार ज्या ग्राहकांना या ऑफरचा फायदा घ्यायचा आहे त्यांना वोडाफोनच्या ऑफर पेजवर जाऊन सीटीबँक क्रेडिट कार्डसाठी नोंदणी करावी लागणार आहे. त्यानंतर संबंधित ग्राहकाला सीटीबँकेचे क्रेडिट कार्ड मिळाल्यानंतर कमीतकमी 4,000 रुपये खर्च करायचे आहेत. ही रक्कम ग्राहक कार्ड मिळाल्यानंतर एकदाच किंवा 30 दिवसांमध्ये खरेदी करुन खर्च करु शकतो. हे निकष पूर्ण केल्यानंतरच मोफत कॉलिंग आणि इंटरनेट डेटाचा उपयोग घेता येणार आहे.

या ऑफरचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांनी त्याचे नियम आणि अटी बारकाईने पाहणे गरजेचे आहे. ही ऑफर केवळ प्रीपेड ग्राहकांनाच लागू आहे. त्यामुळे कंपनीचे पोस्टपेड ग्राहक या ऑफरचा लाभ घेऊ शकणार नाही. सिटी बँक क्रेडिट कार्डची ही ऑफर केवळ 31 जुलैपर्यंतच मर्यादित आहे. तसेच ग्राहकांचे वय 23 वर्षापर्यंत असावे आणि ग्राहक दिल्ली, नोएडा, गुरूग्राम, मुंबई, बेंगळुरू, पुणे, हैदराबाद, कोलकाता, अहमदाबाद, सिकंदराबाद, चेन्नई, वडोदरा, कोयंबतूर, जयपूर आणि चंडीगडचे असावेत. या सर्व निकषांमध्ये बसणाऱ्या ग्राहकांना 45 दिवसांमध्ये ऑफरचा लाभ मिळेल.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *