PUBG खेळणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, बंदीनंतरही खेळता येणार

PUBG Mobile हा गेम दक्षिण कोरियन कंपनी 'ब्लूहोल'ने तयार केला आहे.

PUBG खेळणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, बंदीनंतरही खेळता येणार

मुंबई : भारत-चीन सीमारेषा भागातील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारकडून चीनला पुन्हा (Play PUBG After Ban) एकदा दणका देण्यात आला. सरकारने तब्बल 118 चिनी अ‍ॅप वापरण्यावर बंदी घालली आहे. देशात सर्वाधिक डाऊनलोड झालेल्या PUBG मोबाईल गेमचाही समावेश आहे. यामुळे अनेक तरुण-तरुणी PUBG युझर्स नाराज झाले आहेत. मात्र, आता चिंता करण्याची काहीही गरज नाही. कारण तुम्ही अजून एका मार्गाने तुम्हाला आवडणारा PUBG गेम खेळू शकता (Play PUBG After Ban).

PUBG Mobile हा गेम दक्षिण कोरियन कंपनी ‘ब्लूहोल’ने तयार केला आहे. असं असलं तरी PUBG Mobile या फिचरमध्ये काही चिनी कंपन्यांची भागीदारी आहे. त्यामुळे डेटा लिक होण्याची सर्वाधिक शक्यता आहे. या एकमेव कारणामुळे PUBG mobile गेमवर भारतभरात बंदी घालण्यात आली.

PUBG desktop याच्या माध्यमातून तुम्ही आताही PUBG गेम खेळू शकता. कारण देशभरात या गेमवर अद्याप बंदी घातलेली नाही. PUBG desktop या फिचरचे राईट्सदेखील दक्षिण कोरियन कंपनी ‘ब्लूहोल’ यांच्याकडेच आहेत. मात्र यात कोणत्याही चिनी कंपनीची भागीदारी नाही. त्यामुळे या फिचरवर भारतात बंदी घातलेली नाही (Play PUBG After Ban).

गेल्या काही दिवसांपासून चिन आणि भारत सिमेवर मोठ्या घडामोडी घडत आहे. त्यामुळे भारतात असलेल्या अनेक चिनी मालावर बंदी घालण्याचा सरकारचा प्रयत्न दिसून येत आहे. आत्मनिर्भर भारत या योजनेअंतर्गत देशी मालावर मोठ्या प्रमाणात भर दिला जात आहे, त्याचाच एक भाग म्हणून चिन कंपन्यांनी तयार केलेल्या एकूण 177 (आधी 59 आणि आता 118) अ‍ॅपवर बंदी घालण्यात आली आहे.

Play PUBG After Ban

संबंधित बातम्या :

तुमच्या मोबाईलमधील PubG सह Banned Chinese अ‍ॅप्सचं पुढे काय होणार?

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *