पासवर्ड न सांगता तुमचे वायफाय कसं शेअर कराल?

आज इंटरनेट आपल्या सर्वांची गरज आहे. आपल्या मोबाईलमध्ये आपण बऱ्याचदा डेटा ऑन करतो आणि उपलब्धतेनुसार वाय-फाय (Wi-Fi) चा वापर करतो.

पासवर्ड न सांगता तुमचे वायफाय कसं शेअर कराल?

मुंबई : आज इंटरनेट आपल्या सर्वांची गरज आहे. आपल्या मोबाईलमध्ये आपण बऱ्याचदा उपलब्धतेनुसार वाय-फाय (Wi-Fi) चा वापर करतो. अनेकांनी आपल्या घरात वायफाय कनेक्शन जोडले आहेत. अशावेळी आपल्याला अनेकदा मित्र आणि नातेवाईकांना घरातील वायफायचा पासवर्ड द्यावा लागतो. पासवर्ड दिल्यामुळे तुमच्यासाठी हे धोकादायक ठरु शकते. या अडचणीपासून तुमचा बचाव करण्यासाठी आम्ही एक साधी पद्धत सांगणार आहोत. या पद्धतीमुळे तुम्हाला तुमच्या मित्र आणि नातेवाईकांना पासवर्ड देण्याची गरज लागणार नाही आणि पासवर्ड न देता तुम्ही त्यांना वायफायसोबत कनेक्ट करु शकता.

QR कोडच्या माध्यमातून वायफाय पासवर्ड शेअर करु शकता

तुम्ही तुमच्या वायफायचा पासवर्ड QR कोडच्या माध्यमातून शेअर करु शकता. यामुळे तुमच्या वायफायचा पासवर्ड इतरांना कळणार नाही. वायफाय कनेक्ट करण्यासाठी तुम्हाला तुमच्या मित्र किंवा नातेवाईकांना QR कोड स्कॅन अॅप डाऊनलोड करावा लागेल. आता तुम्ही विचार करत असाल, पासवर्डला QR कोडच्या माध्यमातून कसा शेअर करु शकतो. ही प्रक्रिया खूप सोपी आहे. अँड्रॉईंड आणि आयओएस दोन्ही यूजर्ससाठी हे खूप सोपे आहे.

तुम्हाला तुमच्या वायफाय आणि पासवर्डला QR कोडमध्ये कनव्हर्ट करण्यासाठी अनेक वेबसाईट्स आहेत. यामध्ये www.qrstuff.com आणि zxing.appspot.com/generator सारख्या प्रसिद्ध वेबसाईट्स आहेत.

स्टेप 1 : वर सांगितलेल्या दोन्ही वेबसाईटवर जावा. तेथे वायफाय लॉगिन किंवा वायफाय नेटवर्क निवडा

स्टेप 2 : येथे SSID कनेक्शनमध्ये तुमच्या वायफाय नेटवर्कचे नाव टाईप करा

स्टेप 3 : दिलेल्या सेक्शनमध्ये पासवर्ड टाका

स्टेप 4 : नेटवर्क टाईप निवडा, बऱ्याचदा वायफायमध्ये WPA असते.

स्टेप 5 : आता QR कोड जनरेट आणि डाऊनलोडवर क्लिक करा.

डाऊनलोड केल्यानंतर तुम्ही QR कोडची सॉफ्ट कॉपी ठेवू शकता किंवा याची प्रिंट आऊट ठेवू शकता. यामुळे तुमचे मित्र किंवा नातेवाईक सहजपणे स्कॅन करुन वायफाय कनेक्ट करु शकतात. Iphone यूजर्सला आपला कॅमेरा अॅप ओपन करुन QR कोड स्कॅन करावा लागणार. यानंतर तुमच्याकडे नेटवर्कसोब जोडण्यासाठी मेसेज येईल. बऱ्याचदा अँड्रॉईड फोनही आपल्या मोबाईलच्या कॅमेराने QR कोड ऑटोमॅटिक डिटेक्ट करतात. जर कोणत्या अँड्रॉईंड फोनमध्ये हा फीचर नसेल, तर यूजर गुगल प्लेस्टोअरवरुन QR कोड स्कॅनिंग अॅप डाऊनलोड करु शकता. अशा पद्धतीने तुम्ही दुसऱ्या व्यक्तीला आपला वायफाय पासवर्ड न सांगता त्याला नेटवर्कसोबत कनेक्ट करु शकता.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *