Whatsapp वरुन पैसे ट्रान्सफर करा; भारतात UPI आधारित पेमेंट सेवा सुरू करण्याची परवानगी

भारत आता रोखीच्या व्यवहारांवार फार अवलंबून राहिलेला नाही. गेल्या काही वर्षांमध्ये देश हळूहळू डिजिटल इकॉनॉमीकडे वाटचाल करु लागला आहे.

Whatsapp वरुन पैसे ट्रान्सफर करा; भारतात UPI आधारित पेमेंट सेवा सुरू करण्याची परवानगी
हे नवं फिचर लाँच करण्यामागे लोकांची प्रायव्हसी अबाधित राहावी, युजर्समधील बातचित त्यांच्यातच सिमित राहावी हा एकमेव उद्देश असल्याचे फेसबुकने म्हटले आहे.
Follow us
| Updated on: Nov 06, 2020 | 10:31 AM

मुंबई : भारत आता रोखीच्या व्यवहारांवार फार अवलंबून राहिलेला नाही. गेल्या काही वर्षांमध्ये देश हळूहळू डिजिटल इकॉनॉमीकडे वाटचाल करु लागला आहे. त्यातही प्रामुख्याने गेल्या वर्षभरात डेबिट, क्रेडिट कार्डसह मोबाइल पेमेंटने होणारे व्यवहारही वाढले आहेत. डिजिटल व्यवहारांमध्ये युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) आधारित व्यहारांचे प्रमाण अधिक आहे. फोन पे(PhonePe), गुगल पे (Google Pay), पेटीएमसारख्या (Paytm) युपीआय आधारित अॅप्सचा देशात मोठ्या प्रमाणात वापर होतो. त्यांना टक्कर देण्यासाठी आता व्हॉट्सअॅप मैदानात उतरणार आहे. (WhatsApp Pay gets green signal from NPCI to go live on UPI)

व्हॉट्सअॅपवरुन (Whatsapp) आता पैसे ट्रान्सफर करता येणार आहेत. व्हॉट्सअॅपच्या यूपीआय पेमेंट सुविधेमुळे पैसे ट्रान्सफर करणं शक्य होणार आहे. नुकतीच व्हॉट्सअ‍ॅपला भारतात यूपीआय (UPI) आधारित पेमेंट सेवा सुरू करण्याची परवानगी मिळाली आहे. याबाबत नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) अहवाल सादर केला आहे.

व्हॉट्सअॅपने जून महिन्यामध्ये त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी ही सेवा सुरु केली आहे. तसेच काही व्हॉट्सअॅप युजर्ससाठी ही सेवा उपलब्ध होती. याद्वारे कंपनीने त्यांची पेमेंट सेवा गेल्या काही महिन्यात तपासून पाहिली. लवकरच ही सेवा सर्वांना मिळणार आहे. NPCI ने सध्या काही मोजक्या मोबाईल क्रमांकासाठी व्हॉट्सअॅप मनी ट्रान्सफरची सेवा वापरण्याची परवानगी दिली आहे. लवकरच ही मर्यादा वाढवली जाणार आहे.

NPCI ने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, “WhatsApp पेमेंट सिस्टिमसाठी Go Live ची परवानगी देण्यात आली आहे. कंपनी या परवानगीची वाट पाहात होती”. दरम्यानच्या काळात व्हॉट्सअॅपने त्यांच्या पेमेंट सर्व्हिसची तपासणी केली आहे.

भारतात WhatsApp चे 400 मिलियनपेक्षा (40 कोटी) अधिक युजर्स आहेत. सुरुवातीला त्यापैकी केवळ 20 मिलियन युजर्सना (दोन कोटी ग्राहक) व्हॉट्सअॅपची पेमेंट सुविधा वापरता येईल. तसेच काही कालावाधीत ही मर्यादा वाढवली जाईल आणि लवकरच ही सुविधा सर्वांसाठी उपलब्ध होईल.

Paytm च्या संस्थापकांचा WhatsApp Pay ला विरोध

Paytm चे संस्थापक विजय शेखर शर्मा यांनी WhatsApp Pay ला विरोध केला आहे. शर्मा यांनी म्हटलं आहे की, “WhatsApp Pay सुरक्षित नाही. त्याद्वारे फसवणुकीचे प्रमाण वाढेल”. WhatsApp युजर्सची देशात मोठी संख्या असल्याने त्याचा पेटीएम, फोन पे आणि गुगल पे या यूपीआय बेस्ड अॅप्सना फटका बसणार आहे.

WhatsApp Pay की Facebook Pay?

काही महियांपूर्वी Facebook Pay ची घोषणा करण्यात आली होती. युनिफाइड पेमेंट सिस्टिम फेसबुकच्या सर्व प्लॅटफॉर्मसाठी सज्ज आहे. त्यामुळे WhatsApp मध्ये Facebook Pay चा सपोर्ट मिळेल की, WhatsApp Pay नावाने नवीन सर्व्हिस सुरु होणार याबाबत कोणतीही स्पष्टता नाही.

WhatsApp Pay ही सर्व्हिस WhatsApp मध्येच दिली जाणार आहे. UPI आधारित पेमेंट्स WhatsApp वरुनच होतील. WhatsApp कंपनी कोणतंही वेगळं अॅप लाँच करणार नाही. दरम्यान WhatsApp ने याबाबत अद्याप कोणतीही माहिती जाहीर केलेली नाही.

संबंधित बातम्या

WhatsApp चं नवं फीचर, स्टोरेज कमी करणं आणि फाईल्स डिलीट करणं आणखी सोपं

अँड्रॉईड युजर्सना Whatsapp मध्ये फेस अनलॉक फिचर मिळणार!

(WhatsApp Pay gets green signal from NPCI to go live on UPI)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.