भारतात 5G सेवा सुरु होणार, सरकारकडून जोरदार तयारी

| Updated on: Feb 09, 2021 | 5:40 PM

भारतात 5G मोबाईल नेटवर्किंग सेवा 2022 पर्यंत सुरु होण्याची शक्यता आहे. 5G सेवेमुळे भारतीय टेलिकॉम क्षेत्रात मोठी क्रांती होणार आहे.

भारतात 5G सेवा सुरु होणार, सरकारकडून जोरदार तयारी
Follow us on

नवी दिल्ली : संसदेत सोमवारी 5 जी सेवेसंबंधित पॅनेल रिपोर्ट सादर करण्यात आला. सरकारने सांगितले की 6 महिन्यांनंतर आणखी एक स्पेक्ट्रम लिलाव होईल, त्यानंतर 2022 च्या सुरूवातीस 5 जी सेवा सुरू (रोलआउट) केली जाईल. दूरसंचार मंत्रालयाने 1 मार्चपासून 3.92 लाख कोटी रुपयांच्या स्पेक्ट्रमचा लिलाव जाहीर केला आहे. तथापि, 5 जी सेवेसाठी कोणता फ्रीक्वेन्सी बँड वापरला जाईल, हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेलं नाही. (India will get 5G network in 2022)

माहिती तंत्रज्ञानाविषयी नेमलेल्या स्थायी समितीने दूरसंचार विभागावर (DoT) 5G सेवांच्या शुभारंभास उशीर होत असल्यामुळे जोरदार टीका केली. आतापर्यंत अनेक देशांद्वारे 5G सेवा व्यावसायिकपणे सुरू करण्यात आली आहे, परंतु या बाबतीत भारत मात्र पिछाडीवर आहे. लोकसभेचे खासदार शशी थरूर यांच्या अध्यक्षतेखालील संसदीय समितीने सांगितले की, समितीला कळविण्यात आले आहे की भारतात काही प्रमाणात 5 जी सेवा सुरू केली जाईल आणि 2021 अखेर किंवा 2022 च्या सुरुवातीस ही सेवा सुरु करणे शक्य आहे. त्याचबरोबर, 4 जी सेवा पुढील 4-5 वर्षे सुरू राहील.

या समितीने सध्या असा निष्कर्ष काढला आहे की, भारतात 5 जी सेवा सुरू करण्यासाठी पुरेशी तयारी करण्यात आलेली नाही. भारत जगातील इतर देशांच्या तुलनेत थोडीफार सुरवात करण्यापलिकडे कोणतीही प्रगती करू शकलेला नाही. पॅनेलने म्हटले आहे की, 5 जी सेवा सुरू होण्यास उशीर होणे देशाच्या तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील प्रगतीमधील अडथळा आहे.

अशा परिस्थितीत असे म्हटले जात आहे की, 2G, 3G आणि 4G नंतर भारत आता लवकरात लवकर 5G लाँच करण्याची संधी गमावू शकतो. कारण अशी अनेक क्षेत्र आहेत जिथे सरकारची आवश्यकता आहे. National Informatics Centre services incorporated (NICSI) च्या एका कार्यक्रमात इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद म्हणाले की, “आपण 2 जी, 3 जी आणि 4 जी मध्ये मागे राहिलो मात्र 5 जी च्या बाबतीत तरी भारताने जगापेक्षा वेगाने प्रगती करायला हवी.” दरम्यान, गेल्या वर्षी रिलायन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) मुकेश अंबानी म्हणाले होते की, “जिओ 2021 च्या उत्तरार्धात भारतात 5 जी सेवा सुरू करणार आहे.”

हेही वाचा

काय आहे 5G? तुम्हाला किती स्पीड मिळेल?

दक्षिण कोरिया : जगातील पहिला 5G सेवा सुरु करणार देश

ट्रिपल कॅमेरा आणि जबरदस्त बॅटरीसह भारतातला सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन विक्रीस उपलब्ध

5G नेटवर्क भारताचं नशीब बदलणार? सरकारचे प्रयत्न सुरु

(5G in India may not roll out in 2021 as country still in beginning phase, says parliamentary panel)