पुढील वर्षी 5G नेटवर्क भारताचं नशीब बदलणार? सरकारचे प्रयत्न सुरु

जगभर कोरोना साथीचा रोग पसरत असताना दूरसंचार नेटवर्क आणि तंत्रज्ञानाने लोकांना एकत्र ठेवले. लॉकडाऊन असूनही 4 जी नेटवर्कने जागतिक अर्थव्यवस्था टिकवून ठेवली.

पुढील वर्षी 5G नेटवर्क भारताचं नशीब बदलणार? सरकारचे प्रयत्न सुरु

नवी दिल्ली : यंदाचं वर्ष संपायला तीन दिवस बाकी आहे. तीन दिवसांनी हे जग नव्या दशकात प्रवेश करणार आहे. 2020 हे वर्ष मानवी जीवनातील सर्वात वाईट वर्षांपैकी एक म्हणून लक्षात ठेवलं जाईल. जगभर कोरोना साथीचा रोग पसरत असताना दूरसंचार नेटवर्क आणि तंत्रज्ञानाने लोकांना एकत्र ठेवले. लॉकडाऊन असूनही 4 जी नेटवर्कने जागतिक अर्थव्यवस्था टिकवून ठेवली. लोक त्यांच्या घरी बसून इंटरनेटद्वारे आरोग्य सेवा, शिक्षण, माहिती आणि करमणुकीचा आनंद घेत आहेत. (5G technology will change India fortunes next year)

वेगवान दूरसंचार सेवांसाठी हा महत्त्वपूर्ण काळ आहे. उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, आता भारतातील टेलिकॉम क्षेत्राला पुनरुज्जीवित करण्यासाठी आणि भविष्यातील तंत्रज्ञानाच्या मागणीबाबत लोकांची मानसिकता बदलली आहे. या महिन्याच्या सुरुवातीला Department of Telecommunications विभागातील सदस्य के. रामचंद यांनी सांगितले की, लिलावासाठी 5 जी स्पेक्ट्रम बँडची घोषणा केली जाणार आहे. हा एक स्पष्ट संकेत आहे की 5 जी स्वीकारणे आता आपल्या सरकारसाठी अत्यंत महत्त्वाचे आणि प्राधान्याचे आहे. बर्‍याच भारतीय टेलिकॉम सर्व्हिस प्रदात्यांकडे सध्या 5 जी इकोसिस्टमसाठी गुंतवणूक आणि निर्मिती यासंबंधीच्या अनेक आर्थिक अडचणी आहेत, परंतु सरकारने त्यासंबंधीची प्रक्रिया सुरू करण्यास तयार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.

सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे (सीओएआय) महासंचालक लेफ्टनंट जनरल डॉ. एस. पी. कोचर म्हणाले की, 5 जी टेक्नोलॉजी बिझनेस मॉडलच्या बाबतीत अनेक शक्यता सादर करण्यास तयार आहे. त्यांचे असे म्हणणे आहे की, याचा प्रत्येकाच्या जीवनशैलीवरही परिणाम होईल. ते म्हणाले, आम्ही विकास आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासंदर्भात विशेष भूमिका बजावण्यासाठी उद्योगांना सक्षम करण्यात आम्हाला सरकारच्या पाठिंब्याची गरज आहे. 5 जी तंत्रज्ञान खूप शक्तीशाली आहे. भारतीय अर्थव्यवस्थेची गती वाढवण्याची त्यात क्षमता आहे. मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया, आत्मनिर्भर भारत यांसारख्या सरकारी मोहिमांसाठी ते लाभदायी ठरु शकतं.

सइएंटचे प्रमुख आणि सीओओ कार्तिक नटराजन म्हणाले की, “संचार नेटवर्कच्या क्षेत्रात लक्षणीय गुंतवणूक होत आहे. होऊ घातलेले डिजिटल परिवर्तन युजर्सचा एक्सपिरियन्स वाढवेल. ऑपरेशनल कार्यक्षमता (operational efficiency) वाढवेल आणि उद्यम व्यवसायांसाठी प्रतिस्पर्धा वाढेल. जागतिक स्तरावर नेटवर्क इन्फ्रास्ट्रक्चरचे डिझाईन वितरण, परिनियोजन, स्थलांतर आणि आणि जागतिक स्तरावरील पायाभूत सुविधांना आधार देण्याचा आमचा अनुभव आम्हाला 5 जीची सुरुवात (रोलआऊट) करण्यासाठी प्रेरणा देत आहे.

हेही वाचा

काय आहे 5G? तुम्हाला किती स्पीड मिळेल?

दक्षिण कोरिया : जगातील पहिला 5G सेवा सुरु करणार देश

ट्रिपल कॅमेरा आणि जबरदस्त बॅटरीसह भारतातला सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन विक्रीस उपलब्ध

(5G technology will change India fortunes next year)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI