AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

5G Launch : 5G सेवा कधी मिळणार, किंमत किती असणार, खर्च किती वाढणार?

5G Spectrum Auction : दूसरंचार कंपन्यांनी यापूर्वीच 5G च्या चाचणी बँडवर स्पीड चाचण्या केल्या आहेत. लिलाव पूर्ण झाल्यानंतर आणि स्पेक्ट्रम वाटप झाल्यानंतर वापरकर्त्यांना ही सेवा मिळेल. जाणून घ्या...

5G Launch : 5G सेवा कधी मिळणार, किंमत किती असणार, खर्च किती वाढणार?
5G LaunchImage Credit source: social
| Updated on: Jul 26, 2022 | 3:24 PM
Share

मुंबई :  जीओ (Jio), वोडाफोन आयडीया (Vodafone Idea) आणि एअरटेल 5G स्पेक्ट्रम लिलावात (5G Spectrum Auction) सहभागी होत आहेत. स्पेक्ट्रम लिलाव प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कंपन्या 5G सेवा सुरू करतील. रोलआउटसह, योजनांची किंमत देखील उघड केली जाईल. कंपन्यांनी योजनांचा तपशील शेअर केला नसला तरी त्याबद्दल काही माहिती आवश्यक आहे. एअरटेलने 5G प्लॅन्सच्या किमतीबाबत फार पूर्वीच विधान केले होते. त्याचे तपशील जाणून घेऊया. 5G स्पेक्ट्रमचा लिलाव सुरू झाला आहे. यामध्ये जीओ, vodafone आणि एअरटेल सहभागी झाले आहेत. तीन दूरसंचार कंपन्यांशिवाय अदानीच्या अदानी डेटा नेटवर्क्सनेही या लिलावात भाग घेतला आहे. त्यांची थेट स्पर्धा नसली तरी स्पेक्ट्रमच्या किमतीवर त्याचा परिणाम होऊ शकतो. त्याच वेळी, सामान्य वापरकर्त्यांसाठी 5Gचे फायदे काय आहेत यावर बरीच चर्चा झाली आहे. युजर्स म्हणून 5G वापरण्यासाठी तुम्हाला किती पैसे खर्च करावे लागतील, हा एक मोठा प्रश्न आहे. 5G सेवेची योजना आणि किंमत उद्याप जाहीर केलेली नाही. लिलाव संपल्यानंतर आणि रोलआऊट झाल्यानंतर, कंपन्या याबद्दल तपशील देतील.

सेवा कधी मिळणार?

तशी कोणतीही निश्चित तारीख जाहीर केलेली नाही.पण, अनुमानांबद्दल बोलताना, सेवा ऑक्टोबरपर्यंत थेट होईल. दूसरंचार कंपन्यांनी यापूर्वीच 5G च्या चाचणी बँडवर स्पीड चाचण्या केल्या आहेत. लिलाव पूर्ण झाल्यानंतर आणि स्पेक्ट्रम वाटप झाल्यानंतर वापरकर्त्यांना ही सेवा मिळेल. ऑक्टोबरपर्यंत ही सेवा सर्वसामान्य वापरकर्त्यांसाठी सुरू होईल,असा अंदाज आहे.

4Gची किंमत किती?

जिओचा 84 दिवसांचा रोज दोन जीबी डेटा असलेला प्लॅन सध्या 719मध्ये येतो. त्याचवेळी, एअरटेलचा प्लॅन 839 रुपयांचा आहे. वोडाफोन-आयडीयाचा प्लॅन देखील 719 रुपयांचा आहे. यामध्ये यूजर्सला दीड जीबी डेटा मिळतो. तिन्ही प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंग आणि एसएमएस फायदे देखील उपलब्ध असतील. काही अतिरिक्त फायदे देखील आहेत, जे सर्व ब्रॅडपेक्षा वेगळे आहेत.

5Gची किंमत किती?

5Gची सेवेची किंमत किती असेल, त्याची नेमकी माहिती सध्या उपलब्ध नाही. पण, टेलिकॉम कंपन्यांवर विश्वास ठेवला तर 4Gच्या तुलनेत या सेवेसाठी जास्त पैसे खर्च करावे लागणार नाहीत. एअरटेलमध्ये सीटीओ रणदीप सेखोन यांनी भारतातील 5Gची किंमत उदाहरणासह स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सांगितले होते की 5G सेवा उपलब्ध असलेल्या इतर बाजारपेठांमध्ये 4Gच्या तुलनेत ग्राहकांना कोणतेही प्रीमियम शु्ल्क भरावे लागत नाही. म्हणजेच 5G सेवेसाठी तुम्हाला जास्त पैसे खर्च करावे लागणार नाहीत.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.