AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

AI ‘या’ लोकांच्या नोकऱ्या नक्की खाणार? Fiverr च्या CEO चा मोठा इशारा!

AI तुमच्या नोकरीच्या मागे आहे... आणि माझ्याही! मार्क झुकेरबर्गनंतर आता अजून एका दिग्गज उद्योजकाने कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वाढत्या प्रभावावर चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे या बदलांना सामोरे जाण्यासाठी कर्मचाऱ्यांनी काय करणे अत्यावश्यक आहे.कोणती क्षेत्रं AI च्या थेट प्रभावाखाली येणार आहेत आणि या बदलांचा सामना कसा करायचा, हे समजून घेणं आता काळाची गरज आहे.

AI 'या' लोकांच्या नोकऱ्या नक्की खाणार? Fiverr च्या CEO चा मोठा इशारा!
Micha Kaufman on AIImage Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: May 13, 2025 | 1:42 PM
Share

AI म्हणजे आता फक्त सिनेमातली किंवा भविष्यातली गोष्ट राहिलेली नाही. ती आपल्या रोजच्या आयुष्यात आणि कामाच्या ठिकाणी वेगाने बदल घडवून आणत आहे. काही दिवसांपूर्वी फेसबुकचे मार्क झुकेरबर्ग यांनी AI च्या क्षमतेबद्दल आणि त्याच्या संभाव्य परिणामांबद्दल भाष्य केलं होतंच, पण आता फ्रीलान्सिंग क्षेत्रातील मोठी कंपनी Fiverr चे CEO मायका कॉफमॅन यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना एक सडेतोड आणि स्पष्ट संदेश दिला आहे, जो ऐकून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

काय म्हणाले Fiverr चे CEO?

एका अंतर्गत ईमेलमध्ये, जो नंतर सोशल मीडियावर व्हायरल झाला, मायका कॉफमॅन यांनी आपल्या टीमला एक प्रकारे इशाराच दिला आहे. ते म्हणाले, “AI तुमच्या नोकरीच्या मागे आहे… आणि माझ्याही!” हा संदेश खूप काही सांगून जातो. त्यांनी स्पष्ट केलं की AI मुळे अनेक क्षेत्रांतील नोकऱ्या धोक्यात येऊ शकतात किंवा त्यांचं स्वरूप पूर्णपणे बदलू शकतं.

कॉफमॅन यांच्या मते, अनेक व्यावसायिक क्षेत्रं लवकरच ऑटोमेशनच्या कचाट्यात सापडू शकतात. यात प्रामुख्याने Programmers आणि Software Developers, विविध प्रकारचे Designers, Product Managers आणि Data Scientists यांचा समावेश आहे. इतकंच नाही, तर वकील आणि कायदेशीर सल्लागार, Customer Support Teams, सेल्स आणि मार्केटिंगमधील लोक, तसेच Finance आणि अकाउंटिंग क्षेत्रातील अनेक नियमित कामं आता AI च्या मदतीने होण्याची शक्यता आहे. त्यांनी हेही नमूद केलं की, हा धोका फक्त Fiverr पुरता मर्यादित नाही, तर प्रत्येक कंपनी आणि प्रत्येक Industry ला याचा सामना करावा लागणार आहे. अनेक कामं जी पूर्वी सोपी आणि नियमित मानली जायची, ती आता AI च्या मदतीने आपोआप होत आहेत.

यासाठी स्वत: मध्ये बदल कराल?

कॉफमॅन यांनी कर्मचाऱ्यांना घाबरून न जाता या नवीन टेक्नॉलॉजीला स्वीकारण्याचं आणि नवीन कौशल्ये शिकण्याचं आवाहन केलं आहे. त्यांनी काही AI Tools चा उल्लेखही केला, जे आजच्या काळात आत्मसात करणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ, डेव्हलपर्ससाठी Cursor, कस्टमर सर्व्हिससाठी Intercom Fin आणि कायदेशीर व्यावसायिकांसाठी Lexis+ AI. त्यांनी कर्मचाऱ्यांना त्यांच्या टीममधील AI Experts ओळखण्यास, उत्पादकतेची व्याख्या नव्याने समजून घेण्यास आणि लार्ज लँग्वेज मॉडेल्स (LLMs) सोबत काम करण्यात निपुणता मिळवण्यास सांगितलं. इतकंच नाही, तर ते म्हणाले की जर तुम्ही ‘Prompt Engineering’ मध्ये माहीर नसाल, तर तुमच्यासाठी गुगल सारखे पारंपरिक सर्च इंजिनही कमी उपयोगी ठरतील!

कंपन्यांसाठी काय संदेश?

कॉफमॅन यांचं म्हणणं आहे की, कंपन्यांनी नवीन लोकांना कामावर घेण्यापूर्वी हा विचार करायला हवा की AI च्या मदतीने सध्याच्या टीमची Efficiency कशी वाढवता येईल. त्यांच्या मते, आजच्या काळात AI चा वापर करणं हा काही पर्याय नाही, तर ती एक गरज बनली आहे.

शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत....
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप.
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं.
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा.
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का.
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल.
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी.
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ.
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट.