लाँचिंगआधीच Jio Phone Next चे फीचर्स लीक, किंमत फक्त…

रिलायन्स जिओचा आगामी फोन अर्थात जिओ फोन नेक्स्ट लाँच होण्यास एक महिन्यापेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे. कंपनीने यासाठी गुगलसोबत भागीदारी केली आहे.

लाँचिंगआधीच Jio Phone Next चे फीचर्स लीक, किंमत फक्त...

मुंबई : देशातील सर्वात मोठ्या कंपनीचे बिरुद मिरवणाऱ्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या ( Reliance Industries Limited- RIL) नुकत्याच पार पडलेल्या 44 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (RIL AGM 2021) मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी अनेक महत्वपूर्ण घोषणा केल्या होत्या. यावेळी त्यांनी भारताला 2G मुक्त करण्याची घोषणा केली होती. यावेळी कंपनीने देशातील सर्वात स्वस्त 5 जी फोन लाँच करण्याची घोषणा केली होती. जिओ फोन नेक्स्ट असं या फोनचं नाव आहे. (All the features of Jio Phone Next leaked before its launch, check price)

रिलायन्स जिओचा आगामी फोन अर्थात जिओ फोन नेक्स्ट लाँच होण्यास एक महिन्यापेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे. कंपनीने यासाठी गुगलसोबत भागीदारी केली आहे. अशा परिस्थितीत आता या फोनचे काही स्पेसिफिकेशन लीक झाले आहेत. एक्सडीए डेव्हलपर्सचे संपादक मिशाल रहमान यांनी ट्विटरवर याचा खुलासा केला आहे. हा फोन 10 सप्टेंबरला लॉन्च होईल. कंपनीला येथील ग्राहकांना सर्वात स्वस्त 4G अँड्रॉइड फोन द्यायचा आहे.

जिओ फोन नेक्स्टमध्ये गुगल अँड्रॉइड गो ऑपरेटिंग सिस्टिम दिली जाईल जी अँड्रॉइड 11 वर आधारित असेल. अँड्रॉइड गोच्या मदतीने ग्राहक अँड्रॉइड फोनच्या मूलभूत अनुभवाचा आनंद घेऊ शकतील. येथे त्यांना गुगलच्या सर्व्हिसचाही अॅक्सेस मिळेल, ज्याद्वारे सॉफ्टवेअर अपडेट, गुगल असिस्टंट आणि गुगल प्ले स्टोअरवरून अॅप्स डाउनलोड करण्याची परवानगी मिळेल. युजर्स या फोनमध्ये सर्व लोकप्रिय गेम डाउनलोड करण्यास सक्षम असतील.

कोणते फीचर्स मिळणार?

जिओ फोन नेक्स्टमध्ये क्वालकॉम द्वारे लो एंड चिपसेट देण्यात येईल. रहमान यांच्या ट्विटनुसार, डिव्हाइसमध्ये क्वालकॉम QM215 प्लॅटफॉर्म दिला जाईल. यात 64 बिट CPU आणि ड्युअल ISP सपोर्ट असेल. फोनमध्ये 2 जीबीपेक्षा कमी रॅम देण्यात येईल. त्याच वेळी, स्टोरेजच्या बाबतीत, त्यात 32 जीबी आणि 64 जीबी असे दोन पर्याय मिळू शकतात. याशिवाय यात मायक्रो एसडी कार्ड स्लॉटचा पर्यायही दिला जाईल.

इतर स्पेक्स

डिव्हाइसमध्ये 5.5 इंच आणि 6 इंच डिस्प्ले दिला जाऊ शकतो. रिझोल्यूशनबद्दल बोलायचे झाले तर, त्यात 1440 * 720 पिक्सलचे HD रिझोल्यूशन दिले जाईल. बॅटरीबद्दल माहिती मिळालेली नाही, परंतु या फोनची बॅटरी 3000 ते 4000mAh च्या दरम्यान असू शकते. त्याचबरोबर फोनमध्ये ड्युअल सिम सपोर्ट दिला जाईल. फोनमध्ये वायफाय आणि ब्लूटूथ सपोर्टही दिला जाईल. त्याचबरोबर फोनची किंमत 3500 रुपयांच्या आसपास असू शकते.

इतर बातम्या

25 हजार रुपयांहून कमी किंमतीत बेस्ट 5G स्मार्टफोन्स, पाहा संपूर्ण यादी

डेल्टा व्हेरिएंटची भीती, गुगल, अमेझॉननंतर Facebook कडून कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये बोलावण्याचा निर्णय स्थगित

(All the features of Jio Phone Next leaked before its launch, check price)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI