Amazon Apple days sale | Valentine’s Day साठी गिफ्ट घ्यायचंय, Iphone वर भरघोस सूट

अमेझॉन ही ई-कॉमर्स कंपनी त्यांच्या ‘अ‍ॅपल डेज’ सेल (Apple Day’s Sale) अंतर्गत ग्राहकांना जबरदस्त ऑफर देत आहे.

Amazon Apple days sale | Valentine’s Day साठी गिफ्ट घ्यायचंय, Iphone वर भरघोस सूट

मुंबई : प्रेमाचा दिवस म्हणजे ‘व्हॅलेंटाईन डे’ उद्यावर (रविवार) येऊन ठेपला आहे. या दिवशी अनेकजण त्यांच्या प्रिय व्यक्तीला खास गिफ्ट देतात. तुमच्या प्रिय व्यक्तीला iPhone गिफ्ट करण्याची चांगली संधी अमेझॉन या ई-कॉमर्स साईटने सर्वांना दिली आहे. अमेझॉन इंडिया (Amazon India) लेटेस्ट आयफोन 12 मिनी (iPhone 12 Mini), आयफोन 11 प्रो सिरीज आणि आयफोन 7 सह अन्य डिव्हाईवर शानदार ऑफर्स देत आहे. (Amazon Apple Days Sale gets huge discounts on iPhone 12 Mini and other Apple devices)

अमेझॉन ही ई-कॉमर्स कंपनी त्यांच्या ‘अॅपल डेज’ सेल (Apple Day’s Sale) अंतर्गत ग्राहकांना जबरदस्त ऑफर देत आहे. ही ऑफर 17 फेब्रुवारीपर्यंत सुरु राहील. अमेझॉनने याबाबत म्हटले आहे की, आयफोन मिनीवर ग्राहकांना 5,410 रुपयांची सूट देण्यात आली आहे. त्यामुळे हा फोन तुम्ही 64,490 रुपयांमध्ये खरेदी करु शकता. तसोच कंपनीने आयफोन 11 प्रो वरही सूट दिली आहे. त्यामुळे हा फोन तुम्ही 82,900 रुपयांमध्ये खरेदी करू शकता.

कंपनीने व्हॅलेंटाईन-डे (Valentine’s Day) निमित्त विशेष ऑफर सादर केली आहे. अमेझॉन एचडीएफसी बँकेच्या (HDFC Bank) क्रेडिट कार्डसह शॉपिंग करणाऱ्या ग्राहकांना 9,000 रुपयांची अतिरिक्त सूट देत आहे. ही ऑफर 14 फेब्रुवारीपर्यंत लागू असेल. कंपनीने म्हटलंय की, ‘अॅपल डेज’ सेलदरम्यान ग्राहक आयपॅड मिनीवरही 6 हजार रुपयांची बचत करु शकतात. तसेच एचडीएफसी बँकेच्या क्रेडीट कार्डद्वारे शॉपिंग केल्यास तुम्हाला 3 हजार रुपयांची अतिरिक्त सूट मिळेल.

आयफोन 12 चे फिचर्स

Apple ने आयफोन 12 पाच नवीन रंगांमध्ये लाँच केला आहे. ज्यामध्ये निळा, लाल, काळा, पांढरा आणि हिरवा या रंगांचा समावेश आहे. आयफोन 12 मध्ये सुपर रेटिना XDR डिस्प्ले देण्यात आला आहे. कंपनीचा दावा आहे की, ही आतापर्यंतची सर्वात टिकाऊ आणि सर्वोत्कृष्ट स्क्रीन आहे.

आयफोन 12 सिरेमिक शील्डने सुसज्ज आहे ज्यामुळे हा फोन पूर्वीपेक्षा टिकाऊ बनला आहे. आयफोन 12 हा स्मार्टफोन 12 मेगापिक्सल अल्ट्रा वाइड कॅमेरा + 12 मेगापिक्सलच्या वाइड अँगल लेन्ससह लाँच करण्यात आला आहे.

आयफोन 12 मध्ये डुअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. तर आयफोन 12 प्रो मध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. आयफोन 12 मध्ये 12 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. जो वाइड आणि अल्ट्रा वाइड लेन्सने सुसज्ज आहे.

आयफोन 12 प्रो मध्ये 12 मेगापिक्सलचा F1.6 प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. सोबत 12 मेगापिक्सलचा टेलिफोटो कॅमेरा आणि 12 मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड कॅमेरादेखील देण्यात आला आहे. सोबत 7 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरादेखील देण्यात आला आहे.

लो-लाईट कॅमेरा

‘आयफोन 12 मिनी’ आणि ‘आयफोन 12’मध्ये 12 मेगापिक्सेल सेन्सरचा कॅमेरा देण्यात आला आहे. याचबरोबर 12 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. तर, ‘आयफोन 12 प्रो’ आणि ‘आयफोन 12 प्रो मॅक्स’मध्येही  12 मेगापिक्सेल सेन्सरसह ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला असून, या कॅमेरा सेन्सरमुळे कमी प्रकाशातही उत्तम फोटो काढता येणार आहेत.

हेही वाचा

व्हॅलेंटाईनआधी शाओमीने या वस्तूची किंमत केली कमी, आता 3 हजार रुपयांनी स्वस्त मिळणार ही वस्तू

एकदा चार्ज केल्यास 40 तास चालणार, Boat Rockerz 255 Pro+ चं भारतात लाँचिंग, किंमत फक्त…

अ‍ॅपल वॉचला टक्कर देणार फेसबुकचे स्मार्टवॉच, पुढील वर्षी स्मार्टवॉच बाजारात आणण्याची फेसबुकची योजना

(Amazon Apple Days Sale gets huge discounts on iPhone 12 Mini and other Apple devices)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI