iPhone 12 Pro वर 25000 रुपयांचा डिस्काऊंट, AirPods Pro स्वस्तात खरेदीची संधी, कुठे मिळतेय शानदार डील

आयफोन खरेदी करायचा आहे, मात्र कमी बजेटमुळे हा फोन खरेदी करता येत नाही, अशी तक्रार असणाऱ्या ग्राहकांसाठी चांगली बातमी आहे. अमेझॉन या ई-कॉमर्स साईटवर आयफोनवर शानदार डील्स उपलब्ध आहेत.

iPhone 12 Pro वर 25000 रुपयांचा डिस्काऊंट, AirPods Pro स्वस्तात खरेदीची संधी, कुठे मिळतेय शानदार डील
Iphone 12 Pro
Follow us
| Updated on: Dec 05, 2021 | 11:49 AM

मुंबई : आयफोन खरेदी करायचा आहे, मात्र कमी बजेटमुळे हा फोन खरेदी करता येत नाही, अशी तक्रार असणाऱ्या ग्राहकांसाठी चांगली बातमी आहे. अमेझॉन या ई-कॉमर्स साईटवर आयफोनवर शानदार डील्स उपलब्ध आहेत. त्यातही प्रामुख्याने ज्या युजर्सना Apple iPhone 12 Pro खरेदी करायचा आहे, त्यांच्यासाठी चांगली ऑफर अमेझॉनने सादर केली आहे. अमेझॉन इंडिया Apple iPhone 12 Pro मॉडेल्सवर उत्तम डील आणि सूट देत आहे. (Amazon sale : up to 25000 rupees discount on Iphone 12 series)

जर तुम्ही iPhone 12 Pro खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही Amazon वरील ही डील चुकवू नका. iPhone 12 Pro 25,000 रुपयांच्या सवलतीत उपलब्ध आहे. ही सवलत सर्व स्टोरेज व्हेरिएंटवर उपलब्ध आहे. ऑफरमध्ये 15,000 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनसदेखील समाविष्ट आहे. याचा अर्थ युजर्स त्यांच्या जुना फोन ट्रेडिंग करून iPhone 12 Pro ची किंमत आणखी कमी करू शकतात.

2020 मध्ये आयफोन 12 सीरीज लाँच झाली होती. या सीरीजमध्ये iPhone 12, iPhone 12 Pro, iPhone 12 Pro आणि iPhone 12 Pro Max यांचा समावेश आहे. आता iPhone 12 Pro Amazon वर 128GB मध्ये 95,900 रुपयांना विकला जात आहे, ज्याची किंमत 1,19,000 रुपये आहे. 256GB व्हेरिएंट 99,900 रुपयांमध्ये आणि 512GB व्हेरिएंट 1,07,900 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. 25,000 रुपयांच्या सवलतीसह, खरेदीदारांना त्यांच्या जुन्या फोनवर 14,900 रुपये देखील मिळू शकतात. iPhone 12 Pro हे सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या सर्वात उत्तम डिव्हाईसेसपैकी एक आहे.

स्वस्तात AirPods Pro खरेदीची संधी

तुम्ही iPhone 12 Pro सोबत AirPods Pro देखील खरेदी करू शकता आणि त्यासाठी तुम्हाला Amazon वर फक्त 1,15,395 रुपये मोजावे लागतील. मुळात iPhone 12 Pro सोबत या डिव्हाईसची किंमत 1,44,800 रुपये आहे, परंतु जर तुम्ही ते सध्याच्या डीलअंतर्गत विकत घेतले तर तुमचे 28,910 रुपये वाचतील.

iPhone 12 Pro चे स्पेसिफिकेशन्स

iPhone 12 Pro मध्ये 6.1 इंचाचा सुपर रेटिना XDR डिस्प्ले आहे आणि तो सिरॅमिक शील्ड कोटिंगसह येतो. iPhone 12 Pro A14 बायोनिक चिपवर चालतो. स्मार्टफोनमध्ये 12MP अल्ट्रा वाइड, टेलिफोटो लेसन्स, 4x ऑप्टिकल झूम रेंजसह प्रो कॅमेरा सिस्टीम, कॅमेरा नाईट मोड, डीप फ्यूजन, स्मार्ट HDR 3, Apple ProRAW, 4K डॉल्बी व्हिजन HDR रेकॉर्डिंग आणि अनेक फोटोग्राफी फीचर्स यामध्ये मिळतील. त्याच वेळी, iPhone 12 च्या फ्रंटला 12 मेगापिक्सेलचा कॅमेरा आहे.

इतर बातम्या

Redmi Note 10S चं नवीन स्टोरेज व्हेरिएंट भारतात लाँच, किंमत…

8GB/128GB, 50MP कॅमेरासह Vivo Y55s बाजारात, लाँचिंगसाठी उरले फक्त काही तास

Iphone 12 vs Iphone 13 : फक्त किंमत आणि कॅमेराच नव्हे तर आणखी बरेच फरक, जाणून घ्या तुमच्यासाठी परफेक्ट मॉडेल कोणतं?

(Amazon sale : up to 25000 rupees discount on Iphone 12 series)

Non Stop LIVE Update
महायुतीकडून नार्वेकर लोकसभा लढणार? दक्षिण मुंबईच्या जागेसाठी मोठी खळी?
महायुतीकडून नार्वेकर लोकसभा लढणार? दक्षिण मुंबईच्या जागेसाठी मोठी खळी?.
मिलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरेंची साथ सोडणार? महायुतीची मोठी ऑफर काय?
मिलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरेंची साथ सोडणार? महायुतीची मोठी ऑफर काय?.
ठाकरे नालायक तर आदित्य ठाकरेंची लायकी काय?, भाजपच्या नेत्याचा हल्लाबोल
ठाकरे नालायक तर आदित्य ठाकरेंची लायकी काय?, भाजपच्या नेत्याचा हल्लाबोल.
धनगर आरक्षणास मोठा झटका, सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली अन्...
धनगर आरक्षणास मोठा झटका, सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली अन्....
यंदा इतिहास घडणार,18 वर्षानंतर राज ठाकरे 'धनुष्यबाणा'साठी प्रचार करणार
यंदा इतिहास घडणार,18 वर्षानंतर राज ठाकरे 'धनुष्यबाणा'साठी प्रचार करणार.
पहाटेच्या त्या शपथविधीवरून अजितदादांचा धमाका, ...आणि शरद पवार पलटले
पहाटेच्या त्या शपथविधीवरून अजितदादांचा धमाका, ...आणि शरद पवार पलटले.
ठाकरेंना वेड लागलं... ठाकरेंच्या गौप्यस्फोटावर फडणवीसांचं प्रत्युत्तर
ठाकरेंना वेड लागलं... ठाकरेंच्या गौप्यस्फोटावर फडणवीसांचं प्रत्युत्तर.
सर्व साहेबांनी केलं, मग 32 वर्ष मी काय... अजित पवारांचा कुणावर निशाणा?
सर्व साहेबांनी केलं, मग 32 वर्ष मी काय... अजित पवारांचा कुणावर निशाणा?.
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.