AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ASUSने 9,000 mAh बॅटरी आणि मीडियाटेक प्रोसेसर असलेला नवीन टॅबलेट केला लाँच

ASUS ने अनेक वर्षांनंतर त्यांचा नवीन टॅबलेट ASUS Pad (T3201) बाजारपेठेत सादर केला आहे, ज्यामध्ये Android 16, 12.2-इंचाचा 2.8K ड्युअल-लेयर OLED डिस्प्ले आणि MediaTek Dimensity 8300 चिपसेट आहे. चला तर मग या टॅबलेटचे खास फिचर्स जाणून घेऊयात.

ASUSने 9,000 mAh बॅटरी आणि मीडियाटेक प्रोसेसर असलेला नवीन टॅबलेट केला लाँच
ASUSImage Credit source: Tv9 Network
| Edited By: | Updated on: Jun 04, 2026 | 2:46 PM
Share

तुम्ही जर नवीन टॅबलेट फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर असूस कंपनीने त्यांचा नवीन टॅबलेट ASUS पॅड (T3201) बाजारपेठेत लाँच केला आहे. ज्यामुळे अनेक वर्षांनंतर कंपनीने टबलेट सेगमेंटमध्ये पुनरागमन केले आहे. हा टॅबलेट अँड्रॉइड 16 वर चालतो आणि प्रीमियम डिस्प्ले टेक्नॉलॉजी, स्मार्ट इकोसिस्टम कनेक्टिव्हिटी व उत्कृष्ट पोर्टेबिलिटी देतो. कंपनीच्या मते, नवीन आसुस पॅड अशा वापरकर्त्यांसाठी आहे ज्यांना मनोरंजन, प्रोड‍क्टिव्हिटी आणि मल्टीटास्किंगसाठी एक प्रीमियम टॅब्लेट हवा आहे. चला तर मग आजच्या लेखात आपण या टॅबलेटच्या सर्व वैशिष्ट्याबद्दल जाणून घेऊयात.

ASUS पॅड (T3201) ची माहिती

ASUS पॅड (T3201) चे सर्वात उल्लेखनीय वैशिष्ट्य म्हणजे त्याचा 12.2-इंचाचा 2.8K ड्युअल-लेयर OLED डिस्प्ले देण्यात आलेला आहे, जो 144Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. या टॅबलेटच्या ड्युअल-लेयर आर्किटेक्चरमध्ये एकावर एक असे दोन OLED लेअर्स लावण्‍यात आले आहेत.

डिझाइनच्या बाबतीत बोलायचे झाल्यास या टॅबलेटमध्ये मॅग्नेशियम चेसिस आणि फायबरग्लास रिअर पॅनल वापरले आहे, ज्यामुळे ते मजबूत आणि वजनाने हलके बनते. याचे वजन 523 ग्रॅम असून ते फक्त 6.5mm जाड आहे. ही खास डिझाईन पारंपरिक सिंगल-लेयर OLED डिस्प्लेच्या तुलनेत वीज वाचवण्यासाठी आणि पॅनलचे आयुष्य वाढवण्यासाठी तयार करण्यात आली आहे. या टॅब्लेटमध्ये 600 निट्सची कमाल ब्राइटनेस देखील आहे. तसेच कंपनी असूस पेन 2.0 स्टायलस आणि ब्लूटूथ कीबोर्डसाठी देखील सपोर्ट देते.

कार्यक्षमता आणि बॅटरी लाईफ

या टॅबलेटमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 8300 चिपसेट आहे, जो कार्यक्षमता आणि ऊर्जा कार्यक्षमतेत संतुलन साधण्यासाठी 4nm प्रक्रियेवर तयार करण्यात आला आहे. हा टॅबलेट 8GB LPDDR5x रॅम आणि 128GB किंवा 256GB UFS 3.1 स्टोरेज पर्यायांसह येतो.

वायरलेस कनेक्टिव्हिटीसाठी हा टॅबलेट वायफाय 6E आणि ब्लूटूथ 5.3 ला सपोर्ट करतो, ज्यामुळे क्लाउड-आधारित ॲप्ससाठी हाय-स्पीड इंटरनेट ॲक्सेस आणि कमी लेटन्सी मिळते. तर या टॅबलेट फोनच्या कॅमेऱ्याच्या बाबतीत या टॅबलेटमध्ये 5MP चा फ्रंट आणि 13MP चा रियर कॅमेरा देण्यात आलेला आहे.

याव्यतिरिक्त या टॅब्लेटमध्ये विविध दैनंदिन कामे हाताळण्यासाठी डिझाइन केलेली मोठी 9000mAh बॅटरी आहे. हा टॅबलेट 45W USB-C फास्ट चार्जिंगला देखील सपोर्ट करतो, ज्यामुळे बॅटरी अंदाजे 30 मिनिटांत 50% चार्ज होते. तथापि कंपनीने अद्याप किंमत किंवा उपलब्धतेबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही.

Follow Us
राजकारण पुन्हा तापलं! गडकरींनी तात्काळ राजीनामा... पुन्हा नव्या मागणी
राजकारण पुन्हा तापलं! गडकरींनी तात्काळ राजीनामा...  पुन्हा नव्या मागणीने मोठी खळबळ
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विद्यार्थ्यांशी संवाद, तब्बल
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विद्यार्थ्यांशी संवाद, तब्बल 400...
लाडक्या बहिणींना अखेर ती खुशखबर आलीच, आदिती तटकरेंनी थेट घोषणाच केली;
लाडक्या बहिणींना अखेर ती खुशखबर आलीच, आदिती तटकरेंनी थेट घोषणाच केली; लाखो महिलांन होणार फायदा!
मोदींच्या निवासस्थानाबाहेर... इंदिरा गांधींचा उल्लेख करत एकनाथ शिंदें
मोदींच्या निवासस्थानाबाहेर... इंदिरा गांधींचा उल्लेख करत एकनाथ शिंदेंचा मोठा दावा!
आंदोलन संपलं मात्र अभिजीत दीपकेची तब्येत खालावली; रुग्णालयातील फोटोंनी
आंदोलन संपलं मात्र अभिजीत दीपकेची तब्येत खालावली; रुग्णालयातील फोटोंनी वाढवलं टेन्शन
आम्ही फेस टु फेस वाले, तुम्ही... भर मंचावरून एकनाथ शिंदे काय म्हणाले?
आम्ही फेस टु फेस वाले, तुम्ही... भर मंचावरून एकनाथ शिंदे असं का म्हणाले?
मोठी बातमी! लालू प्रसाद यादव यांच्या मुलाला थेट अटक, नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! लालू प्रसाद यादव यांच्या मुलाला थेट अटक, नेमकं काय घडलं?
ठाकरेंच्या सभेत बोलक्या बाहुल्याचाही सरकावर वर हल्लाबोल; थेट म्हणाला,
ठाकरेंच्या सभेत बोलक्या बाहुल्याचाही सरकावर वर हल्लाबोल; थेट म्हणाला, धुरंधर 3 मध्ये पंतप्रधान...
खड्डामंत्री म्हणत मोदी सरकारवर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, एकाच...
खड्डामंत्री म्हणत मोदी सरकारवर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, एकाच शब्दाने उडवली खळबळ
दिल्लीत जाण्याच्या चर्चांवर स्वतः मुख्यमंत्री फडणवसीचं स्पष्टीकरण
दिल्लीत जाण्याच्या चर्चांवर स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवसीचं स्पष्टीकरण, म्हणाले...