AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फोन अपडेट करताना ‘या’ 5 चुका करणे टाळा, नाहीतर तुमचा स्मार्टफोन होईल हँग

तुमचा स्मार्टफोन अपडेट करताना होणाऱ्या काही चुकांमुळे तुमचे डिव्हाइस हळू होऊ शकते, हँग होऊ शकते किंवा बंदही पडू शकते. चला तर मग फोन अपडेट करताना कोणत्या चुका टाळल्या पाहिजे.

फोन अपडेट करताना 'या' 5 चुका करणे टाळा, नाहीतर तुमचा स्मार्टफोन होईल हँग
PhoneImage Credit source: Freepik
| Edited By: | Updated on: Mar 26, 2026 | 8:50 AM
Share

आजकाल स्मार्टफोन कंपन्या दर महिन्याला सॉफ्टवेअर अपडेट्स जारी करतात. त्यामुळे प्रत्येक स्मार्टफोन हा उत्तमरित्या काम करतो. अशातच फोन अपडेट करणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच ते काळजीपूर्वक करणेही महत्त्वाचे आहे. कारण नवीन सॉफ्टवेअर अपडेटमुळे तुमच्या डिव्हाइसची कार्यक्षमता, सुरक्षा आणि फिचर्स सुधारू शकतात. मात्र अपडेट प्रक्रियेत तुमच्याकडून काही छोट्या चुका झाल्यास तुमचे डिव्हाइस स्लो होऊ शकते, हँग होऊ शकते किंवा डेटा गमावून क्रॅश देखील होऊ शकते. म्हणून अपडेट करण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात ठेवा. चला आजच्या लेखात आपण स्मार्टफोन अपडेट करताना कोणत्या चुका करणे टाळल्या पाहिजेत ते जाणून घेऊयात.

आपल्यापैकी अनेकजण घाईगडबडीत फोनची बॅटरी कमी असतानाही अपडेट प्रोसेस सुरू करतात. अपडेट चालू असताना फोन बंद झाल्यास, सिस्टम क्रॅश होऊ शकते. याकरिता डिव्हाईस किमान 50 ते 60 % बॅटरी असताना किंवा फोन चार्जरला जोडलेला असतानाच अपडेट सुरू करा.

खराब इंटरनेट कनेक्शन

फोनमध्ये येणारे सॉफ्टवेअर अपडेट्स कधीकधी मोठे असू शकतात. अशा परिस्थितीत स्लो किंवा इंटरनेट नेटवर्क कमकुवत असल्यावर फोन अपडेट करताना समस्या येऊ शकतात. फाईल योग्यरित्या डाउनलोड झाली नसली तरीही, इन्स्टॉलेशनमध्ये समस्या येऊ शकतात.

डेटाचा बॅकअप न घेणे

अनेक लोकं अपडेट करण्यापूर्वी त्यांच्या फोनचा बॅकअप घेणे महत्वाचं समजत नाहीत आणि यामुळे कधीकधी अपडेट प्रक्रियेदरम्यान डेटा डिलीट होऊ शकतो किंवा फोन रीसेट देखील होऊ शकतो, ज्यामुळे तुमचे फोटो, व्हिडिओ आणि महत्त्वाच्या फाइल्स डिलीट होण्याची शक्यता असते.

स्टोरेज रिकामी न करणे

तुमच्या डिव्हाइसमध्ये पुरेशी मोकळी जागा म्हणजेच स्टोरेज नसल्यास फोन अपडेट करताना समस्या निर्माण होऊ शकतात आणि अपडेट व्यवस्थित इन्स्टॉल होण्यास अडथळा येऊ शकतो. यामुळे फोन हळू चालण्याची शक्यताही असते. म्हणून अपडेट करण्यापूर्वी अनावश्यक फाइल्स आणि ॲप्स डिलीट करून जागा मोकळी करा.

अपडेट चालू असताना फोन वापरणे

अपडेट चालू असताना अनेकजण फोन वापरतात किंवा ॲप्स उघडतात. यामुळे इन्स्टॉलेशन प्रक्रियेत व्यत्यय येऊ शकतो आणि अपडेट अयशस्वी होण्याचीही शक्यता असते. म्हणून, अपडेट पूर्ण होईपर्यंत फोनकडे लक्ष न देणेच उत्तम.

Follow Us
ही चोरी नाही, राम मंदिरावर दरोडा; संजय राऊतांचा सर्वात मोठा हल्लाबोल!
Sanjay Raut UNCUT | ही चोरी नाही, राम मंदिरावर दरोडा; संजय राऊतांचा सर्वात मोठा हल्लाबोल! नेमकं काय म्हणाले?
शिंदे गटात प्रवेश करताच महिला पदाधिकाऱ्याला पक्षाकडून मोठं गिफ्ट?
शिंदे गटात प्रवेश करताच महिला पदाधिकाऱ्याला पक्षाकडून मोठं गिफ्ट? मध्यरात्री 1:15  वाजता पार पडलेल्या पक्षप्रवेशात...
पर्यटनासाठी चालेले आहात? ही बातमी तुमच्यासाठीच, महाबळेश्वरमध्ये जमीन
पर्यटनासाठी चालेले आहात? ही बातमी तुमच्यासाठीच, महाबळेश्वरमध्ये जमीन खचली, चक्क 233...
Power Corrupts...; ठाकरेंची पोस्ट व्हायरल! साटम प्रकरणावर सरकारला घेरल
Raj Thackeray | Power Corrupts...; राज ठाकरेंची पोस्ट व्हायरल! अमित साटम प्रकरणावर सरकारला घेरलं
मुसळधार पावसाने अंधेरी ठप्प! वीरा देसाई रोडने घेतले नदीचे रूप
Andheri Veera Desai Road | मुसळधार पावसाने अंधेरी ठप्प! वीरा देसाई रोडने घेतले नदीचे रूप, दुकानदारांचे मोठे नुकसान
मोठी घडमोड! ठाकरेंना धक्का देत शिंदे गटात प्रवेश करताच पदाधिकाऱ्याचं
मोठी घडमोड! ठाकरेंना धक्का देत शिंदे गटात प्रवेश करताच महिला पदाधिकाऱ्याचं मोठं विधान; थेट नाव...
हाहाकार! मुसळधार पावसामुळे विरार महापालिका परिसर पाण्याखाली; थेट मुख्य
हाहाकार! मुसळधार पावसामुळे विरार महापालिका परिसर पाण्याखाली; थेट मुख्य कार्यालयात...
मुंबईत पावसाची तुफान बॅटिंग! प्रशासनाचा घराबाहेर न पडण्याचा इशारा....
धो धो येतो आणि झोडतच राहतो... मुंबई उपनगरात पावसाची तुफान बॅटिंग! प्रशासनाचा घराबाहेर न पडण्याचा इशारा
मोठी अपडेट समोर! उपमुख्यमंत्री रात्री उशीरा 1 वाजेपर्यंत सुरू असलेल्या
DCM Health Update | मोठी अपडेट समोर! उपमुख्यमंत्री रात्री उशीरा 1 वाजेपर्यंत पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात असतानाच...
दादर फुल मार्केटवर कोसळला 100 वर्ष जुना वड! तक्रारी करूनही BMC झोपेत
Mumbai | दादर फुल मार्केटवर कोसळला 100 वर्ष जुना वड! वारंवार तक्रारी करूनही BMC झोपेत; थोडक्यात...