AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BJP Politics : त्यांनी ‘कल्याण’ करण्याचा निर्णय घेतलाय, तर मग आपण..सुधीर मुनगंटीवार यांचा भाजपच्या बड्या नेत्यावर निशाणा

BJP Politics : "या जिल्ह्याच्या प्रश्नांबद्दल आता मला कधीच मत व्यक्त करायचं नाही. फिजिक्सच्या पुस्तकात केमिस्ट्रीचा पाठ वाचू नका. तुम्हाला बातमी पाहिजे का? पण मी सांगितलं मी बोलणार नाही, मी आता प्रतिज्ञा घेतली आहे"

BJP Politics : त्यांनी 'कल्याण' करण्याचा निर्णय घेतलाय, तर मग आपण..सुधीर मुनगंटीवार यांचा भाजपच्या बड्या नेत्यावर निशाणा
Sudhir Mungantiwar
| Updated on: Jul 04, 2026 | 1:14 PM
Share

भाजपचे बडे नेते सुधीर मुनगंटीवार आणि आमदार किशोर जोरगेवार यांच्यातील मतभेद दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील हा राजकीय संघर्ष आता राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय बनला आहे. चंद्रपुरातील अनेक मुद्यांवरुन दोन्ही नेत्यांमध्ये तीव्र मतभेद आहेत. काही महिन्यांपूर्वी मुनगंटीवार आणि जोरगेवार वादावर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सुद्धा हतबलता प्रगट केली होती. शुक्रवारी महापालिकेची सर्वसाधारण सभा रद्द करण्यावरूनही दोन्ही नेत्यांच्या समर्थक नगरसेवकांमधील वाद समोर आला. शाब्दीक बाचाबाची झाली. चंद्रपूर जिल्ह्यातील या अंतर्गत वादावर सुधीर मुनगंटीवार यांना विचारलं असता, “मला माहित नाही. कारण आता चंद्रपूर जिल्हा हा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण चालवत आहेत” असं त्यांनी उत्तर दिलं. “यावर काही विचारायचं असेल तर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारावं” असं मुनगंटीवार म्हणाले.

“या जिल्ह्याच्या प्रश्नांबद्दल आता मला कधीच मत व्यक्त करायचं नाही. रवींद्र चव्हाण साहेब जिल्ह्याची आमची संघटना चालवत आहेत, तर तुम्हाला अधिक जास्तची माहिती पाहिजे असेल तर फिजिक्सच्या पुस्तकात केमिस्ट्रीचा पाठ वाचू नका. तुम्हाला बातमी पाहिजे का? पण मी सांगितलं मी बोलणार नाही, मी आता प्रतिज्ञा घेतली आहे. तुम्हाला जर जास्तीची माहिती पाहिजे असेल तर मी पुस्तकाच्या दुकानाचं नाव सांगतो आहे, तुम्ही त्या बुक डेपो मध्ये जा आणि माहिती घ्या” असं उपरोधिकपणे मुनगंटीवार म्हणाले.

मी संघटनेवर लक्ष घालणार नाही

“रवींद्र चव्हाण संघटना चालवत आहेत ते जिल्ह्याचे नेतृत्व करत आहेत. मी संघटनेवर लक्ष घालणार नाही पण लोकांच्या प्रश्नावर, या ठिकाणच्या उद्योग क्षेत्रातल्या बेरोजगारांच्या संदर्भात, पिण्याचे पाणी, शेतकऱ्यांचे प्रश्न मी मांडणार आहे. कारण तो जनतेने मला अधिकार दिला आहे, पक्षाने तिकीट दिलं आहे. जनतेने निवडून दिलं आहे” असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

‘कल्याण’ शब्दाचा अर्थ कसा घ्यायचा तो तुम्ही घ्या

“मी विदर्भाच्या जनतेचे प्रश्न मांडणार. माननीय अध्यक्ष म्हणून चंद्रपूरच्या संघटनेचा त्यांनी ‘कल्याण’ करण्याचा निर्णय घेतला असेल तर वाट पाहिली पाहिजे आपण. त्यांनी निर्णय केला. त्यांनी निर्णय केल्यावर पुढचं सर्व काही ते पाहतील. ‘कल्याण’ शब्दाचा अर्थ कसा घ्यायचा तो तुम्ही घ्या, कल्याण या शब्दात दोन्ही आहे, त्यांच्यावर आम्ही पूर्ण जबाबदारी दिली आहे” असं सुधीर मुनगंटीवार यांनी बोलून दाखवलं

Follow Us
नानांची अखेरची इच्छा पूर्ण होणार; डोंजेतील स्वतःच्या शेतजमिनीवर....
Nana Patekar Funeral : नानांची अखेरची इच्छा पूर्ण होणार; डोंजेतील स्वतःच्या शेतजमिनीवर होणार शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
नाना पाटेकर यांचं पार्थिव गोव्यातील घरी अत्यंदर्शनासाठी ठेवलं
Nana Patekar Passes Away : नाना पाटेकर यांचं पार्थिव गोव्यातील घरी अत्यंदर्शनासाठी ठेवलं
दोन दिवस पोलिसांनी रोखलं, तरी इंडिया आघाडी पुन्हा मैदानात; राहुल गांधी
Rahul Gandhi : दोन दिवस पोलिसांनी रोखलं, तरी इंडिया आघाडी पुन्हा मैदानात; राहुल गांधींसह, खरगेंची राजघाटकडे कूच
MPSC आंदोलनाचा आठवा दिवस अन् पोलिसांचा मोठा इशारा; आंदोलनस्थळ रिकामं..
MPSC Protest : MPSC आंदोलनाचा आठवा दिवस अन् पोलिसांचा मोठा इशारा; आंदोलनस्थळ रिकामं करण्याच्या दिल्या सूचना, मात्र रुपाली पाटील म्हणाल्या...
सत्ताधाऱ्यांना सद्बुद्धी मिळावी म्हणून राजघाटावर जाणार; खरगे आक्रमक...
Mallikarjun kharge : सत्ताधाऱ्यांना सद्बुद्धी मिळावी म्हणून राजघाटावर जाणार; खरगे आक्रमक, मत चोरीवरून केंद्र सरकारवर गंभीर आरोप
नानांसोबत दोन फिल्म केल्या, तिसरी करायची होती पण…; ममता कुलकर्णी....
Mamata Kulkarni on Nana Patekar : नानांसोबत दोन फिल्म केल्या, तिसरी करायची होती पण…; ममता कुलकर्णी यांनी नाना पाटेकरांच्या आठवणींना दिला उजाळा
दिल्लीत इंडिया आघाडीचं आंदोलन; राहुल गांधी आंदोलनस्थळी दाखल
Delhi India Alliance Morcha : दिल्लीत इंडिया आघाडीचं आंदोलन; राहुल गांधी आंदोलनस्थळी दाखल
नाना पाटेकरांचा हृदयविकाराच्या झटक्यानं मात्र निधन मध्यरात्री काय...
नाना पाटेकरांचे हृदयविकाराच्या झटक्यानं मात्र निधन मध्यरात्री काय घडलं होतं? डॉक्टरांनी सर्व सांगितलं
विचार जुळतात, तसं जॅकेटही फिट्ट झालं; नानांच्या आठवणीने गडकरी भावुक...
Nitin Gadkari On Nana Patekar : विचार जसे जुळतात, तसं जॅकेटही फिट्ट झालं; नाना पाटेकरांच्या आठवणीने नितीन गडकरी भावुक, म्हणाले...
नाना पाटेकर यांच्या ‘नानाची वाडी’त होणार अंत्यसंस्कार; अंतिम...
नाना पाटेकर यांच्या ‘नानाची वाडी’त होणार अंत्यसंस्कार; अंतिम यात्रेची तयारी सुरू