10 जून नव्हे, ‘या’ तारखेला लाँच होणार Battlegrounds Mobile India

जगातील सर्वात लोकप्रिय मोबाईल गेम म्हणजेच प्लेयर अननोन बॅटलग्राउंड (PlayerUnknown's Battlegrounds) भारतात परत येत आहे.

10 जून नव्हे, 'या' तारखेला लाँच होणार Battlegrounds Mobile India
Pubg Battlegrounds Mobile India
Follow us
| Updated on: May 27, 2021 | 4:09 PM

मुंबई : भारत-चीन तणावाच्या (India-China tension) पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने काही महिन्यांपूर्वी चीनला मोठा झटका दिला. केंद्र सरकारने भारतात PUBG या लोकप्रिय गेमिंग अ‍ॅपसह 118 चिनी अ‍ॅप बॅन केले होते. दरम्यान, पबजी गेम भारतात परतणार आहे, यावर शिक्कामोर्तब झाले आहे. हा गेम नव्या नावासह लवकरच भारतात लाँच केला जाणार आहे. कंपनीने या गेमसंबधीचा ट्रेलर यूट्यूबवर शेअर केला आहे. तसेच हा गेम आता प्री-रजिस्ट्रेशनसाठी गुगल प्ले-स्टोरवर उपलब्ध झाला आहे. (Battlegrounds Mobile India release date leaked, PubG India an launch on 18 june)

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून अशी चर्चा होती की, हा गेम भारतात 10 जून रोजी लाँच केला जाईल. परंतु या गेमची लाँचिंग डेट थोडी पुढे ढकलली जाण्याची शक्यता आहे. Ghatak या नावाने प्रसिद्ध असलेल्या अभिजीत अंधारे यांनी ट्वीट केले आहे की, बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडिया पुढील महिन्याच्या तिसर्‍या आठवड्यात लाँच केला जाईल. त्यामुळे अशी चर्चा आहे की, 13 जून ते 19 जून दरम्यान हा गेम लाँच होऊ शकते.

Ghatak टीम Solomid ची प्रशिक्षक आहे आणि त्यांचे स्वतःचे यूट्यूब चॅनेलही आहे. काही अहवालांमध्ये असेही म्हटले आहे की, बॅटलग्राउंड मोबाईल इंडिया 18 जून रोजी लाँच केला जाऊ शकतो. याच दिवशी हा गेम लाँच होण्याची अधिक शक्यता आहे, कारण या तारखेपासून मागील महिन्यात प्री रजिस्ट्रेशन सुरु करण्यात आलं होतं.

पालकांच्या परवानगीशिवाय गेम खेळता येणार नाही

क्राफ्टनने आपल्या प्रायव्हसी पॉलिसी डॉक्यूमेंटमध्ये सांगितलं आहे की, जे गेमर्स 18 वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत, त्यांना आपल्या पालकांचा कॉन्टॅक्ट नंबर द्यावा लागेल. म्हणजेच पालकांचा कॉन्टॅक्ट नंबर न देता ही मुलं पबजी गेम खेळू शकणार नाहीत. ते या गेममध्ये साईन अपच करु शकणार नाहीत. पालकांच्या परवानगीनंतरच ही मुलं पबजी गेम साईन अप करु शकतील.

परंतु येथे कंपनीची सर्वात मोठी चिंता ही आहे की, गेमर्स जो फोन नंबर देतील तो फोन नंबर बरोबर असेल का? कारण कोणताही युजर कोणाचाही फोन नंबर देऊन कंपनीची फसवणूक करु शकतात. अशा परिस्थितीत, कंपनी त्याबद्दल काय विचार करतेय, याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

नवा गेम खास भारतीयांसाठी

त्याचबरोबर, या गेमची स्वतःची एसपोर्ट इकोसिस्टम असेल जी टुर्नामेंट आणि लीगसह सुसज्ज असेल. हा गेम मोबाईल डिव्हाइसवर फ्रूी टू प्ले उपलब्ध असेल. दरम्यान, असे म्हटले जात आहे की, बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडिया सध्या केवळ भारतीय बाजारातच लाँच केला जाईल. म्हणजेच हा गेम खास भारतीयांसाठीच असणार आहे. हा गेम लॉन्च होण्यापूर्वी प्री रजिस्ट्रेशनसाठी उपलब्ध असेल. निर्मात्यांनी यामध्ये ट्राय कलर (तिरंगी) थीम दिली आहे, जेणेकरुन भारतीय युजर्स याकडे आकर्षित होतील.

युजर्सचा डेटा सुरक्षित

गेम लॉन्च होण्यापूर्वी कंपनीने स्पष्ट केले आहे की, गेमरचा डेटा कुठेही पाठवला जाणार नाही आणि तो पूर्णपणे सुरक्षित असेल. त्याचबरोबर कंपनी सरकारच्या सर्व महत्त्वपूर्ण मार्गदर्शक सूचनांचे पालन करेल. यात डेटा गोपनीयता आणि युजर्सच्या सुरक्षेचा समावेश असेल. कारण गेल्या सप्टेंबरमध्ये याच कारणास्तव या गेमवर भारतात बंदी घालण्यात आली होती.

जबरदस्त गेमप्ले

दरम्यान, PUBG Corporation ने म्हटलं आहे की, आमचं नवं गेमिंग अॅप युजर्सना जास्तीत जास्त सुरक्षा आणि जबरदस्त गेम प्ले प्रदान करेल. भारतीय प्लेयर्सशी सहज कम्युनिकेशन व्हावे यासाठी कंपनी एक सबसिडरी तयार केली जाणार आहे. तसेच कंपनी भारतात 100 कर्मचाऱ्यांना नोकरी देणार आहे. यासाठी कंपनी भारतात काही ठिकाणी लोकल कार्यालय सुरु केली जाणार आहे. कंपनी भारतात लोकल बिझनेससह गेमिंग सर्व्हिस देणार आहे.

Krafton Inc (PUBG Corporation ची पॅरेंट कंपनी) या कंपनीने भारतात 100 मिलियन डॉलर्सची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. ही गुंतवणूक मनोरंजन, लोकल गेम्स, ई-स्पोर्ट्स आणि आयटी इंडस्ट्रीसाठी असेल. PUBG Corporation च्या म्हणण्यानुसार ही कोणत्याही कोरियन कंपनीने भारतात केलेली सर्वात मोठी गुंतवणूक आहे.

काही मीडिया रिपोर्ट्सनुसार भारतीय प्लेअर्सना अधिक चांगला अनुभव प्रदान करण्यासाठी PUBG कॉर्पोरेशनने त्यांचा गेमिंग कॉन्टेंट अपडेट आणि अधिक अॅडव्हान्स केला आहे. भारतीय प्लेअर्सच्या इच्छेनुसार आणि मागणीनुसार नवा गेम कस्टमाईज करण्यात आला आहे.

कसा बनला पबजी गेम?

एक जपानी चित्रपट ‘बॅटल रोयाल’ पासून प्रेरणा घेऊन Pubg हा गेम बनवण्यात आला आहे. या चित्रपटात सरकार विद्यार्थ्यांच्या एका ग्रूपला बळजबरी करून मृत्यूशी लढायला पाठवतं. त्याच गोष्टीला धरून हा गेम बनवण्यात आला आहे.

हा गेम दक्षिण कोरियाची व्हीडिओ गेम कंपनी ब्लूहोलनं विकसित केला आहे. या कंपनीनं या गेमचं डेस्कटॉप व्हर्जन तयार केलं होतं. परंतु, चीनची कंपनी Tenncent ने काही बदल करून या गेमचं मोबाईल व्हर्जन लाँच केलं. डेस्कटॉप व्हर्जनपेक्षा मोबाईल व्हर्जनला जगभरात खूप प्रसिद्धी मिळाली. भारतात हा गेम सर्वात यशस्वी ठरला. जगभरात पब्जी खेळणाऱ्यांपैकी जवळपास 25 टक्के लोक भारतातील आहेत, 17 टक्के चीनमध्ये तर 6% गेमर्स अमेरिकेत आहेत. जगभरात हा गेम 60 कोटींपेक्षा अधिक लोकांनी डाऊनलोड केला आहे.

संबंधित बातम्या

लाँचिंगआधीच PUBG वर बंदीची मागणी, ‘या’ आमदाराचं थेट पंतप्रधानांना पत्र

भारतात बॅन तरीही PUBG चा जगभरात डंका, 100 कोटींहून अधिक युजर्सकडून गेम डाऊनलोड

100 कोटींहून जास्त युजर्सनी डाऊनलोड केलेला PubG अद्याप ‘या’ दोन गेम्सच्या मागे

बोंबला! PUBG खेळण्यासाठी मोबाईल नंबरसह पालकांची परवानगी आवश्यक, गेमर्समध्ये नाराजी

(Battlegrounds Mobile India release date leaked, PubG India an launch on 18 june)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.