कर्ज देणारी ॲप्स, खरी की बनावट ? कसे ओळखाल ? अशी करा खात्री

रिझर्व्ह बँकेने दिलेल्या महितीनुसार, ॲंड्रॉइड युझर्ससाठी असलेल्या वेगवेगळ्या ॲप स्टोअरवर 600 हून अधिक बनावट ॲप्स आहेत. या ॲपच्या जाळ्यात लाखो नागरिक अडकू शकतात. त्यामुळे कोणतेही ॲप डाऊनलोड करण्यापूर्वी त्याचे रेटिंग, रिव्ह्यू ही माहिती काळजीपूर्वक वाचावी.

कर्ज देणारी ॲप्स, खरी की बनावट ? कसे ओळखाल ? अशी करा खात्री
कर्ज देणारी ॲप्स, खरी की बनावट ? कसे ओळखाल ? अशी करा खात्री Image Credit source: twitter
Follow us
| Updated on: Jul 19, 2022 | 5:26 PM

सध्याचा काळ एकदम फास्ट, इन्स्टंट कामांचा आहे. सर्व गोष्टी पटापट व्हाव्यात असं सर्वांना वाटतं. याचाच फायदा घेण्यासाठी इंटरनेटच्या जगातही अनेक जण टपलेले असतात. सध्या असे अनेक ॲप्स आले आहेत जे स्वस्त आणि जलदरित्या कर्ज देण्याचा (online loan) दावा करतात. मात्र त्यापैकी कोणते ॲप्स खरे आणि कोणते बनावट (true or fake app) हे सर्वसामान्यांना लगेच कळत नाही. अनेक जण या ॲप्सच्या माध्यमातून ग्राहकांना लाखो रुपयांचा गंडा घालतात आणि पश्चाताप करण्याशिवाय आपल्या हातात काहीच उरत नाही. कोणत्याही धोकादायक ॲपपासून सावध राहा. स्वस्त आणि जलद कर्ज घेण्याच्या नादात नंतर रिकव्हरी एजंटकडून त्रास होतो आणि कर्जापेक्षा जास्त रक्कम वसूल केली जाते. त्याचा त्रास तुम्हाला आणि तुमच्या घरच्यांनाही होऊ शकतो. त्यामुळे या सर्व मनस्तापापासून वाचण्यासाठी सावधानता (be safe) बाळगणे अतिशय आवश्यक आहे.

बाकी सर्व ॲप्सप्रमाणेच कर्ज देणारी ॲप्सही डाऊनलोड झाल्यावर युजर्सचे कॉन्टॅक्ट डिटेल्स घेतात. म्हणजेच ग्राहकांची कॉन्टॅक्ट लिस्टमधील सर्व माहिती ॲप कंपनीला मिळते. कर्ज घेणआऱ्या व्यक्तीने वेळेवर पैसे परत केले नाहीत अथवा पैसे घेऊन पोबारा केला, तर ॲप कंपनी त्या व्यक्तीच्या कॉन्टॅक्ट लिस्टमधील लोकांना त्रास देऊ शकते. एवढेच नव्हे तर कर्जाऊ दिलेली रक्कम लवकरात लवकर परत मिळावी यासाठी अनेक वेळा धमकीही दिली जाते. असे अनेक धक्कादायक प्रकार आत्तापर्यंत समोर आले असून त्यामुळे लाखो नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला आहे. त्यामुळेच कोणतेही ॲप डाऊनलोड करताना सावधानता बाळगा. विशेषत: (ऑनलाइन) कर्ज देणाऱ्या ॲप्सबद्दल रेटिंग्ज, रिव्ह्यू वाचून व्यवस्थित माहिती मिळाल्यावर, खात्री पटल्यावरच ते ॲप डाऊनलोड करावीत.

ॲप खरे आहे की बनावट कसे ओळखाल ?

– रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ( RBI) दिलेल्या माहितीनुसार, ॲंड्रॉइड युझर्ससाठी असलेल्या वेगवेगळ्या ॲप स्टोअरवर 600 हून अधिक अवैध, बनावट ॲप्स आहेत. त्यांनी लाखो ग्राहकांची फसवणूक केली आहे. त्यामुळे कमी व्याजदरांत कर्ज देणाऱ्या व्यक्ती तसेच संस्थांच्या प्रलोभनांपासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कर्ज देणारे कोणतेही ॲप डाऊनलोड करण्यापूर्वी काही गोष्टींची खात्री करून घेणे आवश्यक आहे. एखादे ॲप डाऊनलोड करण्यापूर्वी त्याबद्दलचे सर्व रिव्ह्यू, त्या ॲपला मिळालेले रेटिंग्ज ही सर्व माहिती बारकाईने वाचा. प्ले-स्टोअरवर ही सगळी माहिती उपलब्ध असते.

हे सुद्धा वाचा

– लोन (कर्ज) देणारे हे ॲप नक्की कोणती कंपनी चालवते आणि ते (ॲप) कोणी डेव्हलप केले आहे, हेही नीट तपासून पहा. ती सर्व माहिती नीट मिळाली, ट्रॅक रेकॉर्ड नीट असेल तरच ते ॲप डाऊनलोड करावे. मात्र थोडीशी जरी शंका आली तर त्या ॲपपासून सावधान रहा. कंपनीची वेबसाईट, कॉन्टॅक्ट डिटेल्स, ऑफीसचा पत्ता या सर्व गोष्टींचीही संपूर्ण माहिती काढून त्याची नीट पडताळणी करा. बनावट किंवा खोटी ॲप्स अशी माहिती हमखास लपवतात.

– कर्ज देणाऱ्या या ॲप्ससोबत कोणती बँक जोडलेली आहे की नाही हे समजणे सर्वात महत्वाचे आहे. कर्ज देणाऱ्या ॲपसोबत नॉन बँकिंग फायनॅन्शियल कंपनी (एनबीएफसी- NBFC) संलग्न असते. गूगल पॉलिसीनुसार, कर्ज देणाऱ्या ॲपसोबत एनबीएफसी (NBFC) संलग्न असणे आवश्यक आहे. तसे नसल्यास अशा ॲप्सपासून चार हात लांब राहिलेलेच बरं. त्यांच्यासोबत कोणते ॲप जोडलेले आहे, हे एनबीएफसनेही जाहीर करणे अनिवार्य आहे. त्यावरूनच कर्ज देणारे ॲप खरे आहे की बनावट हे लगेच कळू शकते.

– जी ॲप्स बनावट असतात, ती युजर्सकडून अनेक प्रकारची माहिती मागतात, युजरच्या परवानगीद्वारे ( परमिशन) ती माहिती घेतली जाते. जी ॲप्स युजरकडून कमीत कमी परमिशन्स मागतात, ती ॲप्स चांगली, वैध मानली जातात. यामुळे युजर्सची वैयक्तिक माहिती चोरी होण्याचा धोका कमी होतो. विशेषत: बनावट ॲप्सद्वारे युजर्सची कॉन्टॅक्ट लिस्टमधील माहिती चोरी करून त्यांना त्रास दिला जाऊ शकतो.

– कर्ज देणारी जी ॲप्स खरी असतात, ती ॲप्स कर्ज देण्यापूर्वी ग्राहकांना ( त्यांची) संपूर्ण, खरी माहिती देतात. कोणत्याही कामात पारदर्शकता असणे अतिशय महत्वाचे असते. कर्ज देणारी कंपनी आणि ग्राहक यांच्यात एक करारही होतो. बनावट ॲप्स या कोणत्याही सुविधा नसतात. ते ग्राहकांना कोणतीही माहिती देत नाहीत, त्यांच्यासोबत कोणताही करारही करत नाहीत. कोणतेही ॲप कर्ज देत नाही, तर ते फक्त कर्ज देणारी कंपनी व ग्राहक यांच्यामधील माध्यम असते. कर्ज घेण्यापूर्वी प्रोसेसिंग फी, व्याज दर, दंड आणि रीपेमेंट या सर्व बाबींबद्दलही पूर्ण माहिती जाणून घ्या.

Non Stop LIVE Update
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.