Black Friday Sale in India | बंपर धमाका, छप्परफाड डील्स, ॲमेझॉन, क्रोमा, नायकावर खरेदीची लूट

Black Friday Sale in India | आज खरेदीदारांसाठी बिग डील्स आहे. दिवाळीनंतर खरेदीदारांची चंगळ होणार आहे. मेट्रोसह इतर अनेक शहरातील मॉल्स, ऑनलाईन प्लॅटफॉर्म, ई-कॉमर्स साईटवर सवलतींचा पाऊस पडला आहे. अनेक वस्तूंवर मोठ्या प्रमाणात डिस्काऊंट मिळत आहे. काय आहे हा Black Friday Sale...

Black Friday Sale in India | बंपर धमाका, छप्परफाड डील्स, ॲमेझॉन, क्रोमा, नायकावर खरेदीची लूट
Follow us
| Updated on: Nov 24, 2023 | 4:21 PM

नवी दिल्ली | 24 नोव्हेंबर 2023 : आजचा शुक्रवार हा खरेदीदारांसाठी लकी ठरणार आहे. दिवाळी संपून अजून दहा दिवस उलटत नाही तोच पुन्हा खरेदीदारांसाठी Black Friday Sale ने धमाल उडवून दिली. टॉप ब्रँड्सने ग्राहकांचा दिवाळीचा आनंद कमी होऊ दिला नाही. या ब्रँडने अनेक तगड्या ऑफर्सचा भडीमार केला आहे. आज, 24 नोव्हेंबर 2023 रोजी भारतभर खरेदीची धूमच धूम उडाली आहे. त्यामागे कारण आहे ते टॉप ब्रँड्सच्या सवलतीचे. मेट्रो शहरातील रिटेलर्स, मॉल इतकेच नाही तर ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर खरेदीदारांसाठी आकर्षक योजना, सवलतींचा पाऊस पडला आहे. तुम्हाला पण त्याचा फायदा घेता येईल.

नाताळापूर्वीच धमाका

आज 24 नोव्हेंबर आहे. पुढील 24 डिसेंबर रोजी नाताळ येईल. त्याची तयारी अनेक ब्रँड्सने आतापासूनच केली आहे. ॲमेझॉन, क्रोमा, नायका, एच अँड एम, मिंत्रा, प्युमा, आदिदास इत्यादी ब्रँड्सने त्यांच्या उत्पादनांवर भरघोस सूट दिली आहे. आज भारतातच नाही तर अमेरिका, इंग्लंड आणि युरोपीयन देशांमध्ये पण ब्लॅक फ्रायडेची धमाल उडाली आहे. अनेक तगड्या ब्रँड्सनी सवलतींचा पाऊस पाडला आहे.

हे सुद्धा वाचा

50-70% डिस्काऊंट

पश्चिमी देशात ब्लॅक फ्रायडेने खरेदीदारांची चंगळ केली आहे. तिकडे तर कुपन्स आणि इतर अनेक सवलतींचा पाऊस ग्राहकांना पडतो. एकतरी मंदीचे वारे वाहत आहे. त्यामुळे कंपन्या मोठ्या प्रमाणात सवलत, सूट, आकर्षक योजना राबवून ग्राहकांना माफक किंमतीत वस्तूंची विक्री करत आहे. त्यातून त्यांचा मोठा साठा संपणार तर आहेच पण त्यासाठीचा लागणारा खर्चही वाचणार आहे. भारतात या कंपन्यांनी 50-70% डिस्काऊंट ठेवले आहे. यामध्ये सौंदर्य प्रसाधने, पुरुष, महिला, मुलांची कपडे, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर बंपर डिस्काऊंट देण्यात येत आहे.

क्रोमावर मोठी सवलत

इलेक्ट्रॉनिक ब्रँड Croma वर मोठी सूट देण्यात आली आहे. ब्लॅक फ्रायडे सेलनिमित्ताने या वर्षात ग्राहकांची चंगळ होणार आहे. क्रोमाची ही ऑफर 24 ते 26 नोव्हेंबर अशी आहे. त्यामुळे ग्राहकांना इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर बंपर सवलत मिळणार आहे. यामध्ये स्मार्टफोन, होम अप्लायन्सेस, गॅझेट आणि इतर वस्तूंवर ही सवलत मिळेल.

इतर अनेक ब्रँड्सवर भरघोष सूट

  • ॲमेझॉन या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर सवलतीचा पाऊस पडला आहे. अनेक उत्पादनावर भरघोस सूट देण्यात येईल. यामध्ये टॅबलेट, स्पीकर्स, घड्याळं, फोन, लॅपटॉप यासह इतर अनेक वस्तूंवर ही सवलत देण्यात येत आहे.
  • नायका या सौंदर्यप्रसाधन उत्पादन करणाऱ्या कंपनीने पण सवलतीचा पाऊस पाडला आहे. त्यांनी ब्लॅक फ्रायडे सेलवर 50 टक्के सवलत आहे. कंपनीने एकावर एक मोफत अशी सवलत दिली आहे. याशिवाय इतर सौंदर्यप्रसाधनांवर पण सूट देण्यात आली आहे.
  • आदिदासने त्यांच्या उत्पादनावर 60 टक्के सवलत दिली आहे. खरेदीवर हे बंपर डिस्काऊंट ग्राहकांना मिळेल. तसेच काही उत्पादनावर 20 टक्के अतिरिक्त सूट मिळेल. एच अँड एम या ब्रँडने त्यांच्या उत्पादनावर 20-60% सवलत जाहीर केली आहे. अजिओ या ब्रँडने 50 ते 90% सवलत जाहीर केली आहे. 24 ते 27 नोव्हेंबरपर्यंत ही सवलत असेल.
Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.