boAt ने लॉन्च केले नवीन दमदार स्मार्टवॉच, किंमत इतकी कमी की सगळ्यांना परवडेल

boAt कंपनीने एक नवीन स्मार्टवॉच बाजारात आणले आहे. ज्याची किंमत खूपच कमी ठेवण्यात आली आहे. हे स्मार्टवॉच नवीन डिझाईन आणि वैशिष्ट्यांसह लॉन्च करण्यात आले आहे.

boAt ने लॉन्च केले नवीन दमदार स्मार्टवॉच, किंमत इतकी कमी की सगळ्यांना परवडेल
Follow us
| Updated on: Mar 28, 2023 | 2:12 PM

मुंबई : boAt ने एक नवीन स्मार्टवॉच लॉन्च केले आहे. boAt Wave Armour Rugged  असं या स्मार्टवॉचचं नाव आहे. ज्यामध्ये एक नवीन आणि युनीक अशी डिझाईन देण्यात आली आहे. हे घड्याळ दिसायलाही खूप मजबूत दिसते. महत्त्वाचं म्हणजे त्याची किंमत देखील खूप कमी आहे. चला जाणून घेऊया boAt Wave Armor Rugged Smartwatch ची किंमत आणि वैशिष्ट्ये काय आहेत.

boAt Wave Armor Rugged स्मार्टवॉचची वैशिष्टे

boAt Wave Armor Rugged स्मार्टवॉचमध्ये 240×284 रिझोल्यूशन देण्यात आले आहे. ज्यामध्ये 1.83-इंचचा HD डिस्प्ले आणि 550 nits चा ब्राइटनेस लेव्हल देण्यात आलाय. यामुळे सूर्यप्रकाशातही स्क्रीन व्यवस्थित दिसतेय. या घड्याळामध्ये स्प्लिट-स्क्रीन विजेट देखील आहे, जे युजर्सला एकाच वेळी अनेक फीचर वापरण्यास सक्षम करते.

boAt Wave Armor Rugged स्मार्टवॉच डिझाइन

boAt Wave Armor Rugged स्मार्टवॉचची रचना रफ आहे आणि ती सर्वात कठीण परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयार केली आहे. यात जस्त मिश्र धातुचे वापरले आहे. ज्यामुळे घड्याळ्याचे नुकसान होण्याची शक्यता कमी आहे. हे घड्याळ IP67-रेट केलेले आहे, याचा अर्थ ते धूळ आणि पाणी प्रतिरोधक आहे. फिटनेस उत्साहींसाठी ते परिपूर्ण आहे.

क्रिकेट आणि हायकिंगसह 20+ स्पोर्ट्स मोड आहेत, जे फिटनेस प्रेमींसाठी आवडीचे ठरते. स्मार्टवॉचची बॅटरी लाइफ प्रभावी आहे, एका चार्जवर 7 दिवसांपर्यंत किंवा ब्लूटूथ कॉलिंगसह 2 दिवस टिकते. याचा अर्थ युजर सतत चार्जिंगची काळजी न करता घड्याळ घालू शकतात. कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत, स्मार्टवॉचमध्ये ब्लूटूथ आवृत्ती 5.2 आणि ब्लूटूथ कॉलिंग आहे. माइक आणि स्पीकर देण्यात आला आहे. ज्यामुळे युजर्स सहज कॉलिंग फीचर वापरू शकतात.

boAt Wave Armor Rugged स्मार्टवॉच किंमत

boAt Wave Armor Rugged स्मार्टवॉच आता फक्त boAt-lifestyle.com आणि Amazon.in वर उपलब्ध आहे. ज्याची किंमत फक्त Rs.1,899 रुपये आहे. अॅक्टिव्ह ब्लॅक आणि ऑलिव्ह ग्रीन या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये ते उपलब्ध आहे.

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.