5G विरोधात अभिनेत्री जूही चावलाची हायकोर्टात याचिका, 2 जूनला सुनावणी, जाणून घ्या काय आहे प्रकरण?

अभिनेत्री जूही चावला हिने (Juhi Chawla) देशात 5 जी (5G) नेटवर्क उभारण्याच्या विरोधात दिल्ली उच्च न्यायालयात (Delhi High Court) धाव घेतली आहे.

5G विरोधात अभिनेत्री जूही चावलाची हायकोर्टात याचिका, 2 जूनला सुनावणी, जाणून घ्या काय आहे प्रकरण?
Juhi Chawla Against 5G Networks
Follow us
| Updated on: Jun 01, 2021 | 8:08 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री जूही चावला हिने (Juhi Chawla) सोमवारी देशात 5 जी (5G) वायरलेस नेटवर्क स्थापित करण्याच्या विरोधात दिल्ली उच्च न्यायालयात (Delhi High Court) धाव घेतली आहे. नागरिक, प्राणी, वनस्पती आणि इतर जीवांवरील किरणोत्सर्गाच्या परिणामांशी संबंधित विविध मुद्दे उपस्थित करुन तिने न्यायालयाचं दार ठोठावलं आहे. (Bollywood Actress Juhi Chawla Files Case Against 5G Networks In Delhi High Court)

हा खटला न्यायमूर्ती सी हरीशंकर यांच्याकडे सुनावणीसाठी आला व त्यांनी हे प्रकरण दुसर्‍या खंडपीठाकडे सुनावणीसाठी हस्तांतरित केले आहे. यावर 2 जूनला सुनावणी होणार आहे. जुही चावला म्हणाली की, टेलिकॉम उद्योगाच्या योजना पूर्ण झाल्या तर कोणतीही व्यक्ती, कोणताही प्राणी, पक्षी, कोणताही कीटक आणि पृथ्वीवरील कोणत्याही वनस्पती त्याच्या परिणामांपासून सुटू शकणार नाहीत.

जूही चावलाचा 5 जी तंत्रज्ञानाला विरोध का?

जूही चावला म्हणाली की, या 5जी योजनांमुळे मानवांवर गंभीर, अपरिवर्तनीय परिणाम होतो आणि पृथ्वीवरील पर्यावरणाचे कायमचे नुकसान होण्याचा धोका आहे. अ‍ॅडव्होकेट दीपक खोसला यांच्यामार्फत दाखल करण्यात आलेल्या याचिकेत अधिकाऱ्यांना निर्देश देण्याची विनंती केली आहे की, 5 जी तंत्रज्ञान मानवजातीसाठी, पुरुष, स्त्री, प्रौढ, लहान मुलं, अर्भक, प्राणी आणि सर्व प्रकारच्या जीव-जंतुंसाठी सुरक्षित आहे का हे स्पष्ट करावं.

Jio, Airtel सह बड्या कंपन्यांना स्पेक्ट्रम मंजूर

दरम्यान, देशात 5G चाचणी सुरू करण्यासाठी दूरसंचार विभागाने (DoT) रिलायन्स, एअरटेल आणि एमटीएनएलसह निवडक दिग्गज कंपन्यांच्या चाचण्यांना परवानगी दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विभागाने यासाठी दूरसंचार ऑपरेटर्सना स्पेक्ट्रमचे वाटप केले आहे.

बिझनेस स्टँडर्डच्या अहवालानुसार, दूरसंचार क्षेत्राशी संबंधित सूत्रांनी सांगितले आहे की, दिल्ली, मुंबई, कोलकाता, बंगळुरू, गुजरात, हैदराबादसह विविध ठिकाणी 5G च्या चाचण्या घेण्यात येतील. या संदर्भात टेलिकॉम कंपनीच्या अधिकाऱ्याने सांगितले की, टेलिकॉम ऑपरेटरला 700 मेगाहर्ट्झ बँड, 3.3-3-6 गीगाहर्ट्झ (GHz) बँड आणि 24.25-28.5 GHz बँडमधील विविध ठिकाणी स्पेक्ट्रमचे वाटप करण्यात आले आहे.

दूरसंचार मंत्रालयाने 4 मे रोजी रिलायन्स जिओ, भारती एअरटेल, व्होडाफोन आयडिया आणि एमटीएनएलच्या अर्जांना मंजुरी दिली होती. विभागाने त्यांना चिनी कंपन्यांच्या तंत्राचा वापर न करता 5 जी चाचणी घेण्यास सांगितले आहे. दूरसंचार विभागाने एरिक्सन, नोकिया, सॅमसंग आणि सी-डॉटसह 5 जीच्या चाचणीस मान्यता दिली होती. याशिवाय रिलायन्स जिओ इन्फोकॉम (Reliance Jio Infocomm) आपल्या स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करुन चाचणी घेणार आहे.

शहरांसह ग्रामीण भारतातही 5G च्या चाचण्या

सध्या चाचणीचा कालावधी 6 महिने असेल. त्यापैकी उपकरणे खरेदी आणि स्थापनेसाठी 2 महिन्यांचा कालावधी असेल. दूरसंचार विभागाच्या म्हणण्यानुसार प्रत्येक ऑपरेटरला शहरी सेटिंगव्यतिरिक्त ग्रामीण आणि अर्ध-शहरी सेटिंग्जमध्येही चाचणी घ्यावी लागेल, जेणेकरून 5 जी तंत्रज्ञानाचा फायदा देशभरातील नागरिकांना मिळेल. ही सेवा केवळ शहरी भागात मर्यादित नसावी. तथापि, आणखी एक उद्योग स्त्रोत असा दावा करतो की, कोणत्याही दूरसंचार ऑपरेटरला पंजाब, हरियाणा आणि केंद्रशासित प्रदेश चंदीगडमध्ये स्पेक्ट्रम वाटप करण्यात आलेले नाही.

इतर बातम्या

5G बाबत अफवा पसरवणाऱ्यांची खैर नाही, सरकारचे कडक कारवाईचे आदेश

PHOTOS : 5G आल्यानं तुमचं आयुष्य बदलून जाणार, केवळ फोनच नाही तर यावरही परिणाम होणार

5G म्हणजे काय? भारतात कधी सुरु होणार? तुम्हाला कोणते फायदे मिळणार? जाणून घ्या सर्वकाही

(Bollywood Actress Juhi Chawla Files Case Against 5G Networks In Delhi High Court)

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.