AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BSNLचा ‘हा’ प्लॅन 150 रुपयांनी स्वस्त, Jio-Airtel ला देऊ शकतो टक्कर

299 रुपयांमध्ये बीएसएनएल एक उत्तम प्रीपेड प्लॅन देत आहे जो एअरटेल आणि रिलायन्स जिओला कडक स्पर्धा देणार आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला कोणते फायदे मिळतील आणि हा प्लॅन जिओ आणि एअरटेलशी कसा स्पर्धा करेल ते आपण जाणून घेऊयात...

BSNLचा 'हा' प्लॅन 150 रुपयांनी स्वस्त, Jio-Airtel ला देऊ शकतो टक्कर
फाईल फोटो
| Edited By: | Updated on: May 10, 2025 | 4:15 PM
Share

आपल्याकडे चर्चेत असलेल्या टेलिकॉम कंपन्या त्यांच्या ग्राहकांसाठी नवनवीन प्लॅन ऑफर्स देत असतात. अशातच आता रिलायन्स जिओ आणि एअरटेलशी स्पर्धा करण्यासाठी सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलकडे एक उत्तम रिचार्ज प्लॅन आहे जो या दोन्ही कंपन्यांपेक्षा 150 रुपये स्वस्त आहे. बीएसएनएलचा 299 रुपयांचा प्लॅन आहे ज्यामध्ये डेटा, कॉलिंग आणि एसएमएस सारख्या सुविधा आहेत, या प्लॅनमध्ये किती जीबी डेटा उपलब्ध आहे आणि किती एसएमएस दिले जातात? ते आपण आजच्या या लेखात जाणून घेऊयात…

बीएसएनएल 299 प्लॅन

बीएसएनएलचा 299 रुपयांचा प्लॅन कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर प्लॅन एक्सटेंशन कॅटेगरीत लिस्ट करण्यात आलेला आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना दररोज 3 जीबी हाय स्पीड डेटा, अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि 100 एसएमएस मिळतात. डेटा मर्यादा संपल्यानंतर, वेग मर्यादा 40 केबीपीएस पर्यंत कमी केली जाईल. 299 रुपये खर्च केल्यावर, कंपनी तुम्हाला 30 दिवसांची वैधता देते.

जिओ 449 प्लॅन

रिलायन्स जिओच्या 449 रुपयांच्या प्लॅनमध्ये प्रीपेड युजर्सना दररोज 3 जीबी डेटा, दररोज 100 एसएमएस आणि अमर्यादित कॉलिंगचा फायदा मिळतो. बीएसएनएल प्लॅनप्रमाणे, हा प्लॅन देखील 28 दिवसांच्या वैधतेसह येतो.

अतिरिक्त फायद्यांबद्दल बोलायचे झाले तर, या प्लॅनमध्ये 90 दिवसांसाठी जिओ हॉटस्टार सारख्या जिओ अनलिमिटेड ऑफर, 50 जीबी क्लाउड स्टोरेज आणि 50 दिवसांसाठी जिओ फायबर/एअरफायबर सेवा यांचाही फायदा मिळतो.

एअरटेल 449 प्लॅन

एअरटेल कंपनीच्या या 449 रुपयांच्या प्लॅनमध्ये 28 दिवसांच्या वैधतेसह अमर्यादित कॉलिंग, दररोज 100 एसएमएस आणि दररोज 3 जीबी हाय स्पीड डेटाचा फायदा देखील मिळतो. या प्लॅनमध्ये स्पॅम अलर्ट, अमर्यादित 5G डेटा, 22 हून अधिक OTT अॅप्सचा मोफत अॅक्सेस, अपोलो 24/7 सर्कल मेंबरशिप आणि मोफत हॅलोट्यूनचा फायदा मिळतो.

फरक

बीएसएनएलच्या तुलनेत रिलायन्स जिओ आणि एअरटेल कंपनीचे हे प्लॅन 150 रुपये महाग आहेत. केवळ किंमतीतच नाही तर अतिरिक्त फायद्यांमध्येही फरक आहे, बीएसएनएल प्लॅन तुम्हाला कोणतेही अतिरिक्त फायदे देत नाही तर एअरटेल आणि जिओमध्ये तुम्हाला अतिरिक्त फायदे मिळत आहेत.

आम्ही चहापाण्याला कशासाठी जायचं? भास्कर जाधव आक्रमक
आम्ही चहापाण्याला कशासाठी जायचं? भास्कर जाधव आक्रमक.
लाडकी बहिणीच्या सुरक्षितेकडे सरकारचं दुर्लक्ष; वडेट्टीवारांची टीका
लाडकी बहिणीच्या सुरक्षितेकडे सरकारचं दुर्लक्ष; वडेट्टीवारांची टीका.
तपोवन सुंदर आहे...फक्त 'हे' बोलले पाहिजेत
तपोवन सुंदर आहे...फक्त 'हे' बोलले पाहिजेत.
शेतकऱ्यांना तारीख पे तारीख! विजय वडेट्टीवार यांचा सरकारवर हल्लाबोल
शेतकऱ्यांना तारीख पे तारीख! विजय वडेट्टीवार यांचा सरकारवर हल्लाबोल.
शिंदे, दादांचा मालक एकच! उद्धव ठाकरेंची शिंदेसेनेवर खोचक टीका
शिंदे, दादांचा मालक एकच! उद्धव ठाकरेंची शिंदेसेनेवर खोचक टीका.
मुंबई महापौरपदावरून भाजप-शिंदे सेना आमने-सामने; लोढांच्या दाव्याने वाद
मुंबई महापौरपदावरून भाजप-शिंदे सेना आमने-सामने; लोढांच्या दाव्याने वाद.
फडणवीसांचा मी लाडका मंत्री, त्यामुळे... ; नितेश राणे यांचं मोठं विधान
फडणवीसांचा मी लाडका मंत्री, त्यामुळे... ; नितेश राणे यांचं मोठं विधान.
टोमणे मारणे हाच उद्योग राहिलाय! शिरसाट यांचं ठाकरेंना खोचक प्रत्युत्तर
टोमणे मारणे हाच उद्योग राहिलाय! शिरसाट यांचं ठाकरेंना खोचक प्रत्युत्तर.
सुप्रिया सुळेंनी लोकसभेत मांडले राईट टू डिस्कनेक्ट विधेयक
सुप्रिया सुळेंनी लोकसभेत मांडले राईट टू डिस्कनेक्ट विधेयक.
रुपाली पाटील पक्ष सोडणार? अजित पवारांच्या राष्ट्रवादीत वाद
रुपाली पाटील पक्ष सोडणार? अजित पवारांच्या राष्ट्रवादीत वाद.