Xiaomi च्या स्मार्टफोन खरेदीवर बंपर ऑफर

चीनची स्मार्टफोन कंपनी Xiaomi ने पुन्हा एकदा स्मार्टफोनवर बंपर ऑफर दिली आहे. कंपनीने 17 जून ते 21 जून दरम्यान सुरु केलेल्या Mi Super Sale मध्ये खरेदीवर मोठी सूट दिली आहे.

Xiaomi च्या स्मार्टफोन खरेदीवर बंपर ऑफर

मुंबई : चीनची स्मार्टफोन कंपनी Xiaomi ने पुन्हा एकदा स्मार्टफोनवर बंपर ऑफर दिली आहे. कंपनीने 17 जून ते 21 जून दरम्यान सुरु केलेल्या Mi Super Sale मध्ये खरेदीवर मोठी सूट दिली आहे.

या सेलमध्ये Mi A2 आणि POCO F1 वर एक्स्चेंज ऑफरही देण्यात आली आहे. त्यात 3,000 रुपयांपर्यंतची सूट मिळेल. सेलमध्ये या दोन स्मार्टफोन व्यतिरिक्त आणखी स्मार्टफोन्सवरही सूट दिली आहे. रेडमीच्या 10,499 रुपये किमतीच्या Redmi 6 स्मार्टफोनवर 3,000 हजार रुपयांची सूट आहे. हा स्मार्टफोन केवळ 7,499 रुपयांमध्ये खरेदी करता येणार आहे. या फोनमध्ये ऑक्टाकोर प्रॉसेसरसह ड्युअल रियर कॅमरा देखील आहे. याचा नवा व्हेरियन्ट Redmi 7 देखील लॉन्च झाला आहे.

कंपनीने Redmi 6 Pro स्मार्टफोनवर 3,500 रुपयांची सूट दिल्याचा दावा केला आहे. हा स्मार्टफोन सवलतीसह 8,999 रुपयांध्ये खरेदी करता येईल. या स्मार्टफोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आणि 4,000mAh क्षमतेची बॅटरी आहे. तसेच Qualcomm Snapdragon 625 ऑक्टाकोर प्रॉसेसरही देण्यात आला आहे. नुकताच Xiaomi ने भारतात Redmi Y3 स्मार्टफोन लॉन्च केला. या सिरीजमधील फोन खास सेल्फी स्मार्टफोन आहेत. Mi Super Sale मध्ये या स्मार्टफोनची किंमत 7,999 रुपये आहे. या स्मार्टफोनची मुळ किंमत 10,499 रुपये आहे.

Mi A2 हा Android One वर चालणारा स्मार्टफोन 10,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. या फोनच्या खरेदीवर 2,000 रुपयांपर्यंतची सूट देण्यात आली आहे. POCO F1 हा कंपनीचा वरच्या श्रेणीतील स्मार्टफोन आहे. यात Qualcomm Snapdragon 845 प्रॉसेसर देण्यात आला आहे. Mi Super Sale दरम्यान हा फोन 17,999 रुपयांमध्ये खरेदी करता येणार आहे.


Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI