अवघ्या 55,900 रुपयांत खरेदी करा नवा iPhone 13, जाणून घ्या कुठे मिळतेय शानदार ऑफर

Apple च्या अधिकृत पुनर्विक्रेत्यांपैकी (ऑथोरायज्ड रीसेलर) एका रिसेलरने शानदार डील सादर केली आहे जी तुम्हाला सवलतीच्या दरात स्मार्टफोन खरेदी करण्यात मदत करेल.

अवघ्या 55,900 रुपयांत खरेदी करा नवा iPhone 13, जाणून घ्या कुठे मिळतेय शानदार ऑफर
Iphone 13 Series
Follow us
| Updated on: Nov 06, 2021 | 6:32 PM

मुंबई : नवीन लाँच झालेला iPhone 13 मोठ्या सवलतींसह उपलब्ध आहे. सप्टेंबरमध्ये लॉन्च झालेली iPhone 13 सिरीज खरेदीदारांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाली आहे. स्मार्टफोनची किंमत जास्त आहे परंतु Apple च्या अधिकृत पुनर्विक्रेत्यांपैकी (ऑथोरायज्ड रीसेलर) एका रिसेलरने शानदार डील सादर केली आहे जी तुम्हाला सवलतीच्या दरात स्मार्टफोन खरेदी करण्यात मदत करेल. (Buy apple iPhone 13 in just 55900 rupees in India iStore Diwali Offer)

Apple iPhone 13 भारतात बेस 128GB व्हेरिएंटसाठी 79,900 रुपयांमध्ये लॉन्च करण्यात आला होता. iPhone 13 सोबत Apple ने iPhone 13, iPhone 13 Mini, iPhone 13 Pro आणि iPhone 13 Pro Max देखील लॉन्च केले आहेत. दरम्यान, जर तुम्ही आयफोन 13 खरेदी करण्याचा विचार करत असाल परंतु त्याच्या महागड्या किंमतीमुळे तुम्ही खरेदी करू शकत नसाल, तर आम्ही तुम्हाला सवलतीच्या दरात स्मार्टफोन कसा खरेदी करू शकता ते सांगणार आहोत.

Apple चे अधिकृत पुनर्विक्रेता India iStore iPhone 13 वर आकर्षक सूट देत आहे. तुम्ही 55,900 रुपयांच्या किमतीत हा स्मार्टफोन खरेदी करू शकता. स्टोअर HDFC बँक कार्डांवर रु.6000 ची सूट देत आहे आणि तुम्ही EMI पर्याय निवडल्यास ही ऑफर देखील लागू होईल. यामुळे किंमत 73,900 रुपयांपर्यंत खाली आली आहे.

आता तुमच्याकडे ट्रेड करण्यासाठी जुना iPhone असल्यास, पुनर्विक्रेता तुम्हाला सुमारे 18,000 रुपयांची सूट देईल. साइट सांगते की जुन्या iPhone XR 64GB ची किंमत 18,000 रुपयांपर्यंत असेल. तुम्ही तुमचा जुना फोन एक्सचेंज केल्यास तुम्हाला रु.3000 चा एक्सचेंज बोनस देखील मिळेल. त्यामुळे किंमत आणखी कमी होऊन 55,900 रुपये होईल. तुम्ही तुमच्या जुनं iPhone 11 किंवा हाय मॉडेल एक्सचेंज केल्यास, तुम्ही किंमत आणखी खाली आणू शकता.

iPhone 13 सिरीजचे स्पेसिफिकेशन्स

नवीन आयफोन मागील मॉडेल आयफोन 12 पासून इन्स्पायर्ड आहे. यात नवीन A15 बायोनिक चिप, रिडिजाइन केलेले कॅमेरा मॉड्यूल आणि 120Hz रिफ्रेश रेटसह दमदार डिस्प्ले देण्यात आला आहे. आयफोन 13 सिरीज एक वाईड नॉच, IP68 रेटिंग, मेटल-ग्लास बॉडी आणि फेस आयडी बायोमेट्रिक सिस्टम सह येतो.

मिनी व्हेरियंटमध्ये 5.4-इंच फुल एचडी+ (1080 × 2340 पिक्सल) ओएलईडी स्क्रीन आहे, तर आयफोन 13 आणि 13 प्रो मध्ये 6.1-इंच फुल एचडी+ (1170 × 2532 पिक्सल) ओएलईडी डिस्प्ले 120 हर्ट्ज रिफ्रेश रेट आहे. प्रो मॅक्स मॉडेलमध्ये 120Hz, 6.7-इंच फुल-एचडी+ (1284 × 2778 पिक्सेल) OLED पॅनल आहे.

आयफोन 13 मिनी आणि आयफोन 13 मध्ये 12MP प्रायमरी सेन्सर आहे आणि रियर कॅमेरा 12 एमपीच्या अल्ट्रा-वाइड लेन्ससह आहे. दोन्ही प्रो मॉडेल मागील बाजूस ट्रिपल कॅमेरासह येतात.

इतर बातम्या

Twitter:”ट्विटरने लोकांच्या भावनांचा आदर करणे गरजेचं,” दिल्ली उच्च न्यायालयचे आदेश

दिवाळीत अवघ्या 1999 रुपयांत खरेदी करा JIOPHONE NEXT, सोबत सोपे EMI पर्याय

Metaverse म्हणजे काय? Virtual Reality द्वारे जग बदलून Facebook कोणती क्रांती करु पाहतंय?

(Buy apple iPhone 13 in just 55900 rupees in India iStore Diwali Offer)

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.