AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Amazon Great Indian Festival : Redmi चा शानदार स्मार्टफोन अवघ्या 7,020 रुपयात, जाणून घ्या ऑफर

Amazon ग्रेट इंडियन फेस्टिव्हलमध्ये दरवर्षी उत्तम स्मार्टफोन डील्स सादर केल्या जातात. यावर्षी देखील 40 टक्क्यांपर्यंत डिस्काऊंटसह स्मार्टफोन सादर करण्यात आले आहेत.

Amazon Great Indian Festival : Redmi चा शानदार स्मार्टफोन अवघ्या 7,020 रुपयात, जाणून घ्या ऑफर
Redmi 9A
| Edited By: | Updated on: Oct 13, 2021 | 3:35 PM
Share

मुंबई : Amazon ग्रेट इंडियन फेस्टिव्हलमध्ये दरवर्षी उत्तम स्मार्टफोन डील्स सादर केल्या जातात. यावर्षी देखील 40 टक्क्यांपर्यंत डिस्काऊंटसह स्मार्टफोन सादर करण्यात आले आहेत. या डील्स स्मार्टफोनच्या सर्व सेगमेंट्समध्ये उपलब्ध आहेत. जेणेकरून तुम्ही तुमच्या बजेटची पर्वा न करता चांगली डील मिळवू शकता. तुम्ही जर एंट्री-लेव्हल डिव्हाइस शोधत असाल तर, Redmi 9A या स्मार्टफोनवर अनेक चांगल्या ऑफर्स आहेत. (buy Redmi 9A in 7020 rupees in Amazon Great Indian Festival sale 2021)

Redmi 9A चे 3GB रॅम मॉडेल 7,799 रुपयांना विकले जात आहे. तथापि, ग्राहक सिटीबँक क्रेडिट कार्डवर 779 रुपयांची अतिरिक्त सूट मिळवू शकतात, ज्यामुळे स्मार्टफोनची किंमत 7,020 रुपयांपर्यंत कमी होते. ही बँक ऑफर आज संपत आहेत, त्यामुळे तुम्हाला ही डील क्लेम करण्यासाठी घाई करावी लागेल. भारतात शाओमीचा Redmi 9A हा स्मार्टफोन सप्टेंबर 2020 मध्ये लाँच करण्यात आला होता. या स्मार्टफोनचे दोन व्हेरिएंट उपलब्ध आहेत. या स्मार्टफोनची मूळ किंमत 6 हजार 999 रुपये इतकी निश्चित करण्यात आली होती. या किंमतीत 2 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची विक्री केली जाते. तर 3 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत 7 हजार 779 रुपये इतकी आहे.

हा मोबाईल MediaTek Helio G25 octa-core प्रोसेसरवर आधारित आहे. या मोबाईलमध्ये 6.53 इंचांचा HD+ TFT-IPS डिस्प्ले आहे. या मोबाईलची बॅटरी 5000mAh इतकी आहे. विशेष म्हणजे फास्ट चार्जिंग हे या मोबाईलचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. या स्मार्टफोनला 10W फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. या फोनमध्ये सेल्फीसाठी 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे तर याचा रियर कॅमेरा 13 मेगापिक्सलचा इतका आहे.

Redmi 9 Power चे फिचर्स आणि किंमत

रेडमी 9 पॉवर च्या 4 जीबी रॅम प्लस 64 जीबी इनबिल्ट स्टोरेजवाल्या फोनची किंमत 10 हजार 999 रुपये इतकी आहे. तर 4 जीबी रॅम प्लस 128 जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत 11 हजार 999 रुपये आहे. स्मार्टफोन ब्लेजिंग ब्लू, इलेक्ट्रिक ग्रीन, फेयरी रेड आणि मायटी ब्लॅक कलर मध्ये मिळणार आहे. हा फोन अॅमेझॉन आणि Mi.com वर ऑनलाइन उपलब्ध आहे. तसेच एमआय होम्स स्टूडियोज आणि मी स्टोर्सवर ऑफलाइन उपलब्ध आहे आहे.

ड्यूल सिम सपोर्टेड रेडमी 9 पॉवर हा स्मार्टफोन अँड्रॉयड 10 बेस्ड MIUI 12 वर चालतो. फोनमध्ये 6.53 इंचाचा एचडी प्लस डॉट ड्रॉप स्क्रीन दिली आहे. स्क्रीनचा आस्पेक्ट रेश्यो 19.5:9 इतका आहे. डिस्प्ले प्रोटेक्शनसाठी या फोनमध्ये कॉर्निंग गोरिला ग्लास 3 देण्यात आला आहे. यामध्ये ऑक्टा कोर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 662 प्रोसेसर देण्यात आला आहे. या फोनची स्टोरेज स्पेस मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने 512 जीबी पर्यंत वाढवता येईल.

इतर बातम्या

एकाच आठवड्यात फेसबुक, इंस्टाग्राम दुसऱ्यांदा डाऊन, कंपनीकडून दिलगिरी

youTube | आता यूट्यूबवर व्हिडीओ आणि कॅप्शन टाकताना यूजर्सना व्हावं लागणार नाही हैराण

गूगल प्ले स्टोरवरील ‘हे’ अ‍ॅप वापरत असाल तर सावधान ! अ‍ॅपमधून झाला यूजर्सचा डेटा लिक

(buy Redmi 9A in 7020 rupees in Amazon Great Indian Festival sale 2021)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.