youTube | आता यूट्यूबवर व्हिडीओ आणि कॅप्शन टाकताना यूजर्सना व्हावं लागणार नाही हैराण

गूगलच्या मालकीचे असणाऱ्या यूट्यूबने आता एक नविन फिचर लॉन्च करणार आहे. यामध्ये व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये बदल करण्यात येणार आहेत. येत्या काही महीन्यात हा बदल होईल अशी माहीती समोर येत आहे.

youTube | आता यूट्यूबवर व्हिडीओ आणि कॅप्शन टाकताना यूजर्सना व्हावं लागणार नाही हैराण


मुंबई :  गूगलच्या मालकीचे असणाऱ्या यूट्यूबने आता एक नविन फिचर लॉन्च करणार आहे. यामध्ये व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये बदल करण्यात येणार आहेत. येत्या काही महीन्यात हा बदल होईल अशी माहीती समोर येत आहे. यूट्यूबर्सना आता लाइव-स्ट्रीमिंग करताना इंग्रजीभाषे शिवाय भाषा उपलब्ध होणार आहेत . याशिवाय ऑटो कॅप्शनचा पर्याय उपलब्ध होणार आहे. या सुविधेचा लाइव-स्ट्रीमिंगला समावेशक आणि एक्सेसिबल करण्यासाठी फायदा होईल.

काय आहे नविन फिचर

YouTube आता अँड्रॉइड आणि आईओएसवर एक नविन फिचर लॅन्च करणार आहे. या फिचरमध्ये कॅप्शनमध्ये ऑटो ट्रांसलेशन सुरू करण्यात येणार आहे. साध्या ही सेवा फक्त डेक्सटॉपवर उपलब्ध आहे. परंतू यूट्यूबने केलेल्या या बदलामुळे आता यूजर्स त्यांच्या मोबईलवरून सुद्धा कॅप्शन देऊ शकतात.

पहिले हे फिचर 1000 पेक्षा आधिक

या आधी हे फिचर 1,000 पेक्षा अधिक यूट्यूब सब्सक्राइबर चॅनेलसाठी उपलब्ध होते परंतू आता यात बदल करण्यात आले आहेत. येत्या काही महिन्यांत यूट्यूबर्सना लाइव-स्ट्रीमिंग करताना इंग्रजीभाषे शिवाय इतर भाषांमध्ये ऑटो कॅप्शनचा पर्याय उपलब्ध होणार आहे. लाइव-स्ट्रीमिंगला समावेशक आणि एक्सेसिबल करण्यासाठी फायदा होईल. सध्या हे फिचर फक्त डेस्कटॉपवर उपलब्ध आहे. YouTube सध्या व्हिडीओमध्ये ऑडिओ ट्रॅक जोडण्याचासुद्धा प्रयत्न करात आहे. यूट्यूबने यासंबधीच्या चाचण्या केल्या असून आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांसाठी किंवा अंध किंवा दृष्टिहीन व्यक्तिसाठी यूट्यूबची ही सेवा एक वरदानच ठरणार आहे. याशिवाय, यूट्यूब यूजर्सना प्लॅटफॉर्मवरील सामग्री सहजपणे शोधण्यसाठी सुद्धा नवीन पर्याय उपलब्ध करत आहे.

काय आहे युट्युब शॉर्ट्स?

युट्युब शॉर्ट्स हा युट्युबवरच्या कमी कालावधीच्या व्हिडीओंचा फॉरमॅट आहे. यामध्ये जास्तीत जास्त 60 सेकंदांपर्यंत व्हिडीओ तयार करायचा असतो. भारतासह जगभरात टिकटॉक (TikTok) व्हिडीओची क्रेझ निर्माण झाली होती. पण टिकटॉकवर बंदी आणल्यानंतर छोट्या व्हिडीओची बाजारपेठ काबीज करण्यासाठी युट्युबने युट्युब शॉर्ट्स हा फॉरमॅट लॉन्च केला होता. गुगलच्या (Google) दाव्यानुसार युट्यूब शॉर्ट्स अल्पावधितच जगभरात हिट झाला आहे. मार्च महिन्यात युट्युब शॉर्ट्स व्हिडीओची व्ह्युअरशिप दररोज 6.5 बिलियनच्या जवळपास होती. ती आता 15 बिलियनच्या पुढे गेली आहे. हा फॉरमॅट आणखी प्रमोट करण्यासाठी युट्युबकडून 2021 आणि 2022 या दोन वर्षांसाठी 100 मिलीयन युट्युब शॉर्ट्स फंड देण्यात आला आहे.

इतर बातम्या :

गूगल प्ले स्टोरवरील ‘हे’ अ‍ॅप वापरत असाल तर सावधान ! अ‍ॅपमधून झाला यूजर्सचा डेटा लिक

रिअलमी जीटी निओ 2 भारतात ‘या’ तारखेला होणार लाँच, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

15 कोटी वापरकर्त्यांसाठी गूगल आणणार हे नवीन वैशिष्ट्य, येथे जाणून घ्या तपशील

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI