
मोबाईल ही आता माणसाची गरज झाली आहे. प्रत्येकाच्या हाती मोबाईल पाहायला मिळतो. क्वचितच काही जण मोबाईलपासून दूर राहात असतील. पण जवळपास सर्वांच्या मोबाईल दिसतो. पण पोस्टपेड वापरणाऱ्या ग्राहकांची चिंता काही वेगळीच असते. कारण कधी कधी आवाक्याबाहेर बिल आलं की घाम फुटतो. दुसरीकडे, प्रीपेड कार्ड वापरणाऱ्यांचा रिचार्ज मोक्याच्या क्षणी संपल्याने फजिती होते. तसेच महत्त्वाचं काम रखडल्याने चिडचिड होते. त्यामुळे अनेक जण स्विच करण्यासाठी धडपड करतात. पण त्याचा अवधीही जास्त असल्याने टेन्शन वाढतं. पण आता दूरसंचार विभागाने वापरकर्त्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. सिमकार्ड नियमात बदल केला आहे. यामुळे प्रीपेडवरून पोस्टपेड किंवा पोस्टपेडवरून प्रीपेड स्विच करण्याची प्रक्रिया सोपी झाली आहे. कारण दूरसंचार विभागाने स्विच करण्याचा कूलिंग पीरियड कमी केला आहे. यापूर्वी वापरकर्ते 90 दिवसाआधी स्विच करू शकत नव्हते. मात्र आता हा अवधी 30 दिवसांचा केला आहे.
नव्या नियमामुळे 30 दिवसानंतर तुम्ही आरामात प्रीपेडवरून पोस्टपेड किंवा पोस्टपेडवरून प्रीपेड करू शकतो. पण त्यानंतर स्विच करण्यासाठी 90 दिवसांचा अवधी लागेल. म्हणजेच पहिल्यांदा स्विच करताना 30 दिवसांचा अवधी लागेल. पण वारंवार स्विच करणाऱ्यांसाठी हा अवधी 90 दिवसांचा असेल. दूरसंचार विभागाने ओटीपीच्या माध्यमातून प्रीपेडवरून पोस्टपेड आणि पोस्टपेडवरून प्रीपेड करता येईल. यामुळे वारंवार स्विच करणाऱ्या वापरकर्त्यांना दिलासा मिळणार आहे.
प्रीपेडवरून पोस्टपेड आणि पोस्टपेडवरून प्रीपेड करण्याची अनेक कारणं आहेत. कधी कधी प्लान महाग असला किंवा सर्व्हिस मनासारखी नसेल तर स्विच करण्याची तयारी होते. जर तुम्ही आज म्हणजे 13 जूनला प्रीपेड नंबर घेतला आणि काही दिवस वापरल्यानंतर पोस्टपेडमध्ये स्विच करू इच्छित असाल तर 30 दिवसात स्विच करू शकता. यासाठी तुम्हाला 90 दिवस थांबण्याची गरज नाही. या लॉक इन पीरियडमध्ये पुन्हा स्विच करायचं असेल तर करू शकता. पण यासाठी तुम्हाला कंपनीच्या अधिकृत आउटलेटमध्ये जाऊन केव्हायसी पूर्ण करावी लागेल.