
पूर्वी चीन, अमेरिका आणि रशिया या तीन बलाढ्य शक्तींमध्ये नेहमीच स्पर्धा पाहायला मिळायची. पण गेल्या काही काळापासून रशिया या स्पर्धेत मागे पडला आहे. आता खरी स्पर्धा आहे ती चीन आणि अमेरिकेत. हे दोन्ही देश वेगवेगळ्या क्षेत्रात आघाडीवर राहण्यासाठी नेहमीच प्रयत्न करताना दिसतात. पण यावेळे टेक्नॉलॉजीच्या जगात चीनने मोठी झेप घेत फक्त अमेरिकेतच नाही तर जगभरात खळबळ माजवली आहे. चीनच्या या आघाडीमुळे सिलिकॉन व्हॅलीलाही हादरे बसून गेले आहेत. Google, Microsoft सारख्या कंपन्या चीनच्या या कारनाम्यामुळे टेन्शमध्ये आल्या आहेत. चीनी कंपनी DeepSeek लॅबने R1 AI मॉडल लॉन्च केलंय. या मॉडलने जगाला प्रभावित केलं आहे. हे मॉडल जगभर प्रसिद्ध झालं आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जगात ChatGPT, Google Gemini सारख्या AI मॉडललाही या चीनी मॉडेलने मागे टाकलं आहे. 2022 मध्ये जेव्हा OpenAI ने ChatGPT लॉन्च केलं होतं. तेव्हा या जनरेटिव्ह AI ची चर्चा सुरू झाली. मायक्रोसॉफ्टने...