पॉर्न पाहणाऱ्यांनो सावधान! गुगल, फेसबुकची तुमच्यावर नजर

Namrata Patil

Namrata Patil | Edited By: अनिश बेंद्रे

Updated on: Jun 22, 2021 | 10:54 AM

जर तुम्ही इन्कॉग्निटो मोड (Incognito Mode) चा वापर करत पॉर्न बघत असाल, तर तुमची खाजगी माहिती लीक होऊ शकते. कारण इन्कॉग्निटो मोडवर पॉर्न बघणाऱ्या लोकांवरही गुगल किंवा फेसबुक गुप्त स्वरुपात नजर ठेवते. असे एका अहवालात स्पष्ट झाले आहे.

पॉर्न पाहणाऱ्यांनो सावधान! गुगल, फेसबुकची तुमच्यावर नजर
गहना वशिष्ठ ही शुटिंग झाल्यानंतर तो व्हिडीओ व्ही ट्रान्सफरवर अपलोड करायची. या व्हिडीओची एक लिंक ती अपलोडरला आणि एक लिंक उमेश कामतला पाठवायची.

मुंबई : जर तुम्ही इन्कॉग्निटो मोड (Incognito Mode) चा वापर करत पॉर्न बघत असाल आणि तुम्हाला वाटत असेल की हे कोणालाही समजत नाही, तर तुम्ही चुकीचे आहात. कारण गुगल, फेसबुकसह ऑरकल क्लाउड्स (oracle cloud) हे सर्व तुमच्यावर गुपचूप नजर ठेवून असतात. धक्का बसला ना, पण हे खरं आहे. मायक्रोसॉफ्ट, कानेर्गी मेलन विश्वविद्यापीठ, आणि पेंसिल्वेनिया विश्वविद्यापीठ यांनी एकत्रित केलेल्या अहवालात स्पष्ट ही धक्कादायक बाब समोर आली आहे.

जगभरात कॉम्प्युटर, लॅपटॉप किंवा स्मार्टफोन वापरणारे अनेक युझर्स इन्कॉग्निटो मोडवर जाऊन पॉर्न बघतात. हा मोड वापरल्याने माहिती गुप्त राहते असे अनेकांना वाटते. मात्र इन्कॉग्निटो मोडवर पॉर्न बघणाऱ्या लोकांवरही गुगल किंवा फेसबुक गुप्त स्वरुपात नजर ठेवते, असे स्पष्टीकरण मायक्रोसॉफ्ट, कानेर्गी मेलन विश्वविद्यापीठ, आणि पेंसिल्वेनिया विश्वविद्यापीठ यांनी एकत्रित केलेल्या अहवालात स्पष्ट केले आहे.

या अहवालानुसार, वेबएक्सरे नावाच्या उपकरणाद्वारे जवळपास 22 हजार 484 पॉर्न साईट्सला स्कॅन करण्यात आले. त्यानुसार जवळपास 93 टक्के वेब पेज हे युझर्सचा खासगी डेटा हा थर्ड पार्टीला शेअर करतात अशी धक्कादायक बाब समोर आली आहे.

टॉप 10 कंपन्या अमेरिकेत

यातील 74 टक्के पॉर्न वेबसाईटला गुगल आणि इतर कंपन्या ट्रॅक करतात. तर ऑरेकल या सॉफ्टवेअर डेव्हलपर्स कंपनी 24 टक्के पॉर्न साईट्सला ट्रॅक करते. विशेष म्हणजे फेसबुकही 10 टक्के पॉर्न वेबसाईटला ट्रॅक करत असल्याचे या अहवालात समोर आले आहेत.

जर कोणताही युझर्स सातत्याने पॉर्न साईटचा वापर करत असेल, तर त्याला सार्वाधिक ट्रॅक केले जाते. तसेच मायक्रोसॉफ्टसह इतर कंपनींनी केलेल्या एकत्रित अहवालानुसार, पॉर्नोग्राफीच्या टॉप 10 कंपन्या अमेरिकेत आहेत. तर इतर पॉर्नोग्राफीच्या इतर कंपन्या युरोपमध्ये आहेत.

अशाप्रकारे लीक होते माहिती ?

दरम्यान शोध घेणाऱ्या टीमने यासाठी जॅक नावाचे एक काल्पनिक प्रोफाईल तयार केले. जॅकने आपल्या लॅपटॉपवर पॉर्न बघण्याचा विचार केला. त्यानुसार त्याने आपल्या लॅपटॉपवरील ब्राऊजरमधील इन्कॉग्निटो मोड सुरु केले.  इन्कॉग्निटो मोड सुरु केल्याने त्याची खाजगी माहिती गुप्त राहिली अशी खात्री त्याला होती. त्यानंतर त्याने एक पॉर्न साइट सर्च केली आणि एक पॉर्न व्हिडीओ सुरु केला. इन्कॉग्निटो मोड सुरु केल्याने त्याची खाजगी माहिती गुप्त राहिल अशा विश्वास त्याला होता.

इन्कॉग्निटो मोडचा वापर हा फक्त तुम्ही सर्च केलेली ब्राऊंजिंग हिस्ट्री तुमच्या कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपवर जमा होऊ देत नाही. मात्र तुम्ही ज्या वेबसाईटवर त्याची माहिती कोणतीही थर्ड पार्टी ट्रॅक करु शकते. तसेच तुम्ही त्या वेबसाईटवर किती वेळ होता, तुम्ही काय सर्च केले याची सर्व माहिती थर्ड पार्टी टॅकर्सकडे असते.

यानुसार जॅकने सर्च केलेली सर्व माहिती आणि डेटा थर्ड पार्टीकडे पोहोचला. त्यानुसार थर्ड पार्टी ट्रॅकर्सने युआरएलच्या मदतीने पॉर्नसाईट्स सर्च केल्या आणि जॅकचा खाजगी डेटा त्या पॉर्नसाईट्सला विकला.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI