वाहन चोरी रोखणारे जीपीएस, किंमत फक्त…

कार आणि बाईक सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येकजण चिंतेत असतो. देशात बाईक आणि कार चोरीच्या घटनेतही दिवसेंदिवस वाढ होत आहे. पोलीस या घटनेवर आळा घालण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

वाहन चोरी रोखणारे जीपीएस, किंमत फक्त...

नवी दिल्ली : कार आणि बाईक सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येकजण चिंतेत असतो. देशात बाईक आणि कार चोरीच्या घटनेतही दिवसेंदिवस वाढ होत आहे. पोलीस या घटनेवर आळा घालण्यासाठी प्रयत्न करत आहेत. पण तरहीही या घटनांमध्ये वाढ होत आहे. पण आता चिंता करण्याची गोष्ट नाही. कारण आता एक जीपीएस ट्रॅकर डिव्हाईस (GPS Tracker Device) बाजारात आले आहे. या जीपीएस ट्रॅकर डिव्हाईसमुळे (GPS Tracker Device) वाहन चोरी रोखण्यास  मदत मिळेल. या डिव्हाईसच्या माध्यमातून जर कुणी आपले वाहन चोरण्याचा प्रयत्न केला, तर तातडीने तुम्हाला मोबाईलवर नोटिफिकेशन येते.

iMars नावाच्या कंपनीने हे डिव्हाईस बाजारात आणले आहे. हे एक वॉटरप्रूफ इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस आहे. तसेच याचा आकारही खूप छोटा आहे. यामध्ये कंपनीने जीपीएस ट्रॅकर इनबिल्ड केला आहे. हे ट्रॅकर एका सिमकार्डच्या माध्यमातून चालू शकेल. हे डिव्हाईस वाहनाच्या बॅटरीने कनेक्ट करु शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनवर एक अॅप घ्यावा लागेल. तो अॅप तुम्हाला जीपीएसच्या माध्यमातून लोकेशन दाखवेल.

या डिव्हाईसवर एक क्यूआर कोड दिला असेल तो स्कॅन करुन तुम्ही हा अॅप इन्स्टॉल करु शकता. या अॅपमध्ये लॉग इन केल्यानंतर तुम्ही तुमच्या बाईकचे लोकेशन, रीडिंग आणि कंडीशनची संपूर्ण माहिती मिळवू शकतात. याशिवाय जर कुणी तुमचे वाहन चोरण्याचा प्रयत्न केला, तर तुमच्या फोनवर तुम्हाला तातडीने नोटिफिकेशन येईल. विशेष म्हणजे हे डिव्हाईस सिम कार्ड शिवाय चालू शकत नाही.

या मायक्रो जीपीएस ट्रॅकर डिव्हाईसची किंमत 2 हजार 502 रुपये आहे. हे डिव्हाईस banggood नावाच्या वेबसाईटवरुन तुम्ही ऑनलाईन खरेदी करु शकता.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI