डायसन कंपनीचे नवीन एअर प्युरिफायर भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
डायसनने भारतात त्यांचे नवीन एअर प्युरिफायर लाँच केलं आहे. हे एअर प्युरिफायरचे मॉडेल घरातील वातावरण शुद्ध करण्यासाठी उत्तम आहे. तर यामध्ये स्मार्ट होम कनेक्टिव्हिटी सारखी ॲडवांस सुविधा देखील आहेत. चला तर मग आजच्या लेखात आपण या एअर प्युरिफायरची किंमत आणि उपलब्धतेबद्दल जाणून घेऊयात...

तुम्हाला जर नवीन एअर प्युरिफायर खरेदी करायचा असेल तर नुकताच डायसन कंपनीने त्यांचे नवीन एअर प्युरिफायर Dyson purifier cool PC1 – TP11 लाँच केले आहे. तर हे एअर प्युरिफायर घरातील हवा शुद्धीकरण करण्यासाठी डिझाइन केलेले आहे. वाढत्या प्रदुषणाचा आपल्या आरोग्यावर कोणताच परिणाम होऊ नये याकरिता डायसनचे हे एअर प्युरिफायर घरात असणे उत्तम आहे. चला तर मग आजच्या लेखात आपण या नवीन एअर प्युरिफायरचे उत्तम फिचर्स आणि किंमत याबद्दल जाणून घेऊयात…
ॲडवांस फिल्ट्रेशन आणि एअरफ्लो
प्युरिफायर कूल PC1 – TP11 मध्ये डायसनची HEPA फिल्टरेशन टेक्नॉलॉजी आहे, जे हवेतील 0.1 मायक्रॉन इतके लहान अल्ट्राफाइन सुक्ष्म कण कॅप्चर करते, ज्यामध्ये ॲलर्जीन, बॅक्टेरिया आणि विषाणूंचा असे प्रदूषक काढून टाकण्यास सक्षम आहे. यात ट्रायस-एनहान्स्ड अॅक्टिव्हेटेड कार्बन फिल्टर देखील आहे जो गंध, वायू, VOC आणि NO2 सारखे ऑक्सिडायझिंग वायू काढून टाकतो.
डायसन एअर मल्टीप्लायर टेक्नॉलॉजीद्वारे समर्थित हे प्युरिफायर प्रति सेकंद 290 लिटरपेक्षा जास्त एअरफ्लो देते, ज्यामुळे संपूर्ण खोलीत हवा शुद्ध होते. संपूर्ण खोलीत स्वच्छ हवेचे समान वितरण सुनिश्चित करण्यासाठी या युनिटमध्ये 350° ऑसिलेशन सपोर्ट आहे.
इंटेलिजेंट सेंसिंग आणि एनर्जी एफिशिएंसी
या एअर प्युरिफायरमध्ये एक बिल्ट-इन सेन्सर आहे जो हवेतील धूळ, बॅक्टेरिया (PM2.5, PM10) आणि इतर कण रिअल-टाइममध्ये डिटेक्ट करते. त्यानुसार आपोआप एअरफ्लो ॲडजस्ट करते आणि आवश्यकतेनुसारच एनर्जीचा वापर केला जातो. तर यांचा नाईमोडमध्ये ही आवाज कमी होतो आणि डिस्प्लेची चमक कमी करते. स्लीप टाइमर फिचर्समुळे ते 1, 2, 4 किंवा 8 तासांनंतर ऑटोमॅटिक बंद केलं जाऊ शकतो.
स्मार्ट होम कनेक्टिव्हिटी
प्युरिफायर कूल PC1 – TP11 स्मार्ट होम इंटिग्रेशनला सपोर्ट करते, ज्यामुळे मायडायसन अॅप, अमेझॉन अलेक्सा, गुगल असिस्टंट आणि सिरी द्वारे तुम्ही कंट्रोल करता येते. बिल्ट-इन वाय-फाय आणि ब्लूटूथ सपोर्ट यामुळे तुम्ही त्याचे शेड्यूल सेट करू शकतात. अशातच रिअल-टाइम मॉनिटरिंग करण्यास, वॉरंटी नोंदणी करण्यास आणि प्रोडक्ट सपोर्टमध्ये एक्सेस करू शकतात.
उपलब्धता आणि किंमत
डायसन प्युरिफायर कूल PC1 – TP11 ची किंमत 39,900 आहे आणि हे एअर प्युरिफायर काळ्या/निकेल आणि पांढऱ्या/चांदीच्या रंगांमध्ये उपलब्ध आहे. ती Dyson.in किंवा देशभरातील डायसन स्टोअर्समधून खरेदी करता येईल.
