Elon Musk गेल्या सहा वर्षांपासून ‘बिन पगारी फुल अधिकारी’; या कारणांमुळे नाही घेतली सॅलरी

Elon Musk Tesla : जगातील धनकुबेर एलॉन मस्क गेल्या सहा वर्षांपासून विना पगारी त्याची जबाबदारी चोख बजावतोय, हे सांगूनही तुमचा विश्वास बसणार नाही. पण या कारणामुळे त्याला कामाचा छदाम पण मिळालेला नाही. काय आहेत ही कारणं, तुम्हाला पण बसेल धक्का...

Elon Musk गेल्या सहा वर्षांपासून 'बिन पगारी फुल अधिकारी'; या कारणांमुळे नाही घेतली सॅलरी
सहा वर्षांपासून थकला पगार
Follow us
| Updated on: Apr 19, 2024 | 3:51 PM

जगातील धनकुबेरांपैकी एक टेस्लाचा सीईओ एलॉन मस्क (Elon Musk Salary) मागील 6 वर्षांपासून कोणत्याही मोबदल्याविना काम करत आहे. कायदेशीर अडचणी आणि त्याने ठरवलेले उद्दिष्ट या कचाट्यात त्याचा पगार अडकला आहे. इलेक्ट्रिक वाहनं तयार करणारी कंपनी Tesla आता आपल्या सीईओला पगार मिळावा म्हणून थेट शेअरधारकांच्या न्यायालयात पोहचली आहे. मस्क याला 56 दशलक्ष डॉलरची नुकसान भरपाई, मोबदला देण्याची तयारी कंपनीने सुरु केली आहे. अर्थात अजून यावर निर्णय व्हायचा आहे. यापूर्वीच डेलावेअर येथील एका कोर्टाने एलॉनच्या प्रस्तावित पॅकेजविरोधात आपला निर्णय जाहीर केलेला आहे. काय आहे हे प्रकरण..

6 वर्षांपासून पगाराच्या प्रतिक्षेत

टेस्लाने 2018 मध्ये एलॉन मस्कच्या कामाचा मोबदला म्हणून एक पॅकेज तयार केले होते. पण त्याला गेल्या सहा वर्षांत कही मंजूरी मिळालेली नाही. कंपनीच्या बोर्डाने आपल्या सीईओच्या प्रतिष्ठेसाठी पुन्हा एकदा हा प्रस्ताव मंजूरीसाठी शेअरधारकांसमोर ठेवला आहे. टेस्लाचे चेअरमन रॉबिन डेनहोल्म यांनी याविषयीचे पत्र शेअरधारकांना लिहिले आहे. डेनहोल्म यांनी या पत्रात डेलावेअरच्या न्यायालयाच्या निर्णयावर आक्षेप घेतला आहे. शेअरधारकांना पॅकेजच्या बाजूने मत देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. टेस्लाच्या शेअरधारकांची वार्षिक बैठक 13 जूनपासून सुरु होणार आहे.

हे सुद्धा वाचा

उद्दिष्टाआधारीत पॅकेज

एलॉन मस्क यांनी टेस्लाकडून अद्याप कोणतेही वेतन घेतलेले नाही. हे पॅकेज कंपनीच्या आर्थिक वृद्धीवर अवलंबून आहे. हे पॅकेज 2018 मध्ये निश्चित करण्यात आले होते. या पॅकेजमध्ये मस्कला 12 उद्दिष्टांचा पर्याय देण्यात आला आहे. ही उद्दिष्ट जोपर्यंत मस्क पूर्ण करणार नाहीत, तोपर्यंत पॅकेज न देण्याचे ठरले होते. त्यासाठी 10 वर्षांचा कालावधी देण्यात आला होता. टेस्लाच्या माहितीनुसार, कंपनीने ही 12 उद्दिष्टे 2023 मध्येच पूर्ण केली आहे.

न्यायालय पॅकेजविरोधात

डेलावेअर येथील न्यायालयाने मात्र मस्क याच्या पॅकेजविरोधात निकाल दिलेला आहे. हे पॅकेज दीर्घकाळासाठी गुंतवणूकदारांच्या हितांचे संरक्षण करणारे नसल्याचे मत न्यायालयाने नोंदवले. कंपनीच्या संचालकांवर पण कोर्टाने ताशेरे ओढले होते. ते मस्क यांच्या इशाऱ्यावर नाचत असल्याचे खडेबोल न्यायपालिकेने सुनावले होते.

मस्क तर महत्वाचा कर्मचारी

डेनहोल्म यांनी एलॉन मस्क यांना टेस्लाचा सर्वात प्रामाणिक आणि महत्वाचा कर्मचारी म्हणून जाहीर केले. दीर्घ काळापासून वादात अडकलेले असताना एलॉन मस्क यांनी गेल्या सहा वर्षांपासून पगार न घेता काम केले आहे. उलट मस्क यांच्या मेहनतीने कंपनीला आणि गुंतवणूकदारांना मोठा फायदा झाला आहे. गेल्या सहा वर्षांत टेस्लाचा शेअर सहा पटीने वाढला आहे.

Non Stop LIVE Update
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?.
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला.
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका.
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?.