AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Elon Musk च्या रोबोटने केला नमस्ते आणि योगा, व्हिडीओ व्हायरल

प्रसिध्द उद्योजक अब्जाधीश इलोन मस्क यांनी एक्सवर ( ट्वीटर ) एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात एक मानवाप्रमाणे काम करणारा रोबोट दिसत आहे.

Elon Musk च्या रोबोटने केला नमस्ते आणि योगा, व्हिडीओ व्हायरल
robo teslaImage Credit source: socialmedia
| Updated on: Sep 25, 2023 | 4:13 PM
Share

नवी दिल्ली | 25 सप्टेंबर 2023 : अब्जाधीश  इलॉन मस्क ( Elon Musk  ) यांनी आपल्या Tesla Robot चा नवीन व्हिडीओ शेअर केला आहे. हा एक humanoid robot आहे. टेस्लाचा हा नवा रोबोट खूपच स्मार्ट आहे. यासंदर्भात इलॉन मस्क यांनी शेअर केलेल्या व्हिडीओत रोबोट सर्वांना नमस्कार करताना दिसत आहे. या व्हिडीओला कॅप्शन दिलेले नाही. तरीही व्हिडीओला सब टायटल दिलेले आहेत. मस्क यांनी या रोबोटला काही टास्क पूर्ण करण्यास सांगितले आणि त्याने ते लिलया पूर्ण केले आहेत. इतकंच काय तर हा रोबो वस्तूंचे रंग देखील ओळखतो.

प्रसिध्द उद्योजक अब्जाधीश इलोन मस्क यांनी एक्सवर ( ट्वीटर ) एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात एक मानवाप्रमाणे काम करणारा रोबोट दिसत आहे. याला रोबोला विविध टास्क देण्यात आले आहेत. रोबोट काही टास्क पूर्ण केल्यानंतर नमस्ते आणि योगासने करताना दिसत आहे. या दोन विविध रंगाचे बॉक्स वेगवेगळ्या प्लेटमध्ये रंगानूसार ठेवण्याचे काम रोबोट सहजतेने करताना दिसत आहे. हा रोबोट निरनिराळ्या टास्क सहज शिकतो.

इलॉन मस्क यांनी केलेले ट्वीट –

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले इलॉन मस्क यांनी शेअर केलेल्या व्हिडीओत सबटायटल्स आहेत. त्यांनी दाखवले आहे की कसा ह्युमनोईड रोबोट आपल्या हातापायांचा हालचाली कशा पाहू शकतो. रोबोट केवळ व्हीजन आणि जॉईंट पोझिशन एनकोडरच्या मदतीने आपल्या हालचालीचा शोध घेऊ शकतो. काही अहवालात म्हटले आहे की या रोबोटला स्पेस मिशनमध्ये देखील वापरले जाऊ शकते.

किती आहे किंमत ?

Optimus नावाच्या या रोबोटची किंमत जवळपास 20,000 डॉलर ( 16,61,960 रुपये ) इतकी असू शकते. मिडीयातील वृत्तानूसार Humanoid Robot मध्ये 3 किलोवॅट प्रति तासाची बॅटरी पॅक आहे. त्यामुळे तो दिवसभर आरामात काम करु शकतो. या रोबोटला wifi आणि LTE चा सपोर्ट देखील देण्यात आला आहे. या रोबोटला टेस्ला कारच्या ऑटोपायलटमध्ये असलेल्या एडव्हान्स ड्राईव्हर असिस्टेंड सिस्टीममधील आर्टीफिशियल इंटेलिजंस सॉफ्टवेअर आणि सेंसरचा वापर केला आहे. हा रोबोट टेस्ला चिपवर काम करतो.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.