AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टोयोटा हायरायडरच्या ‘या’ खास फीचर्सने लावले सर्वांना वेड…. यातील तुमचे फेव्हरेट कोणते?

डी सेगमेंट एसयुव्ही व्यतिरिक्त कंपनी लवकरच छोट्या एसयुव्हीमध्येही लवकरच काम सुरु करणार आहे. कंपनी लवकरच आपली हायब्रिड कार Hyrider बाजारात आणणार आहे. कंपनीला विश्वास आहे, की ही कार एसयुव्ही सेगमेंटमध्ये मोठा बदल करेल.

टोयोटा हायरायडरच्या ‘या’ खास फीचर्सने लावले सर्वांना वेड…. यातील तुमचे फेव्हरेट कोणते?
Toyota CarImage Credit source: Instagram
| Updated on: Sep 03, 2022 | 4:28 PM
Share

टोयोटाचे मार्केट शेअर्समध्ये गेल्या काही वर्षांमध्ये मोठी वाढ होताना दिसत आहे. भारतीय लोकांची आवड लक्षात घेता टोयोटाकडून विविध प्रकारच्या आकर्षक व अत्याधुनिक फीचर्स असलेल्या गाड्या तयार करण्यात आल्या आहेत. डी सेगमेंट एसयुव्ही (SUV) व्यतिरिक्त कंपनी लवकरच छोट्या एसयुव्हीमध्येही लवकरच काम सुरु करणार आहे. कंपनी लवकरच आपली हायब्रिड कार हायराईडर (Hyrider) बाजारात आणणार आहे. कंपनीला विश्वास आहे, की ही कार एसयुव्ही सेगमेंटमध्ये मोठा बदल करेल. ही कार वन टू वन फीचर्सने सुसज्ज असल्याचा कंपनीचा दावा आहे. कंपनी ही कार दोन वेगवेगळ्या पॉवरट्रेनसह लॉन्च करणार आहे. हे दोन्ही पर्याय ग्राहकांना उपलब्ध असतील. याशिवाय टोयोटा या कारमध्ये अनेक अॅडव्हान्स फीचर्स (features) देत आहे. अपकमिंग कार्सच्या फीचर्समध्ये अनेक कॉस्मेटिक बदल देखील करण्यात आले आहेत. ग्राहकांना ही कार विविध प्रकारांमध्ये मिळेल.

खास फीचर्स

1) टोयोटा आपले हायराइडर दोन वेगवेगळ्या पॉवरट्रेनमध्ये लाँच करणार आहे.

2) एक पर्याय मारुतीकडून घेण्यात आलेल्या लाईट हायब्रिड पॉवरट्रेनचा असणार आहे.

3) दुसरा पर्याय स्ट्राँग हायब्रिडचा आहे. यामध्ये ही कार पेट्रोलसोबतच ईव्हीवरही धावणार आहे.

4) स्ट्राँग हायब्रिड पर्यायावर, कार केवळ 12.10 सेकंदात 0 ते 100 किमी प्रतितास वेग धारण करेल.

5) कंपनीने कारच्या आतील भागात प्रीमियम लक्झरी फील देण्याचा प्रयत्न केला आहे.

6) टोयोटाने मारुतीकडून सनरूफ सारखे अनेक फीचर्स घेतले आहेत.

7) कंपनीचा दावा आहे, की ही कार सर्व वेगात चांगली कामगिरी करेल. बॉडी रोल अधिक चांगला करेल.

8) या कारचा ग्राउंड क्लीयरन्स 210 मिमी आहे.

9) बूट स्पेसच्या बाबतीत, कंपनी स्ट्राँग हायब्रीडमध्ये ग्राहकांना 255 लिटर जागा पुरवते.

10) लाईट हायब्रीडबद्दल बोलायचे झाल्यास, Hirider ला 355 लीटर बूट स्पेस मिळेल.

11) कंपनी 4 वेगवेगळ्या ट्रिममध्ये Hyrider लाँच करणार आहे.

12) टोयोटा हायरायडरचे 11 भिन्न प्रकार 4 ट्रिममध्ये ऑफर करेल.

13) कंपनी 25 हजार रुपयांपासून बुकिंग सुरू करत आहे.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.