फेसबुककडून युजर्ससाठी नवं फीचर लाँच

दोन वर्षापूर्वी फेसबुकच्या यूजर्स प्रायव्हेसी संदर्भात मोठी घोषणा करण्यात आली (Facebook launch new feature) होती.

फेसबुककडून युजर्ससाठी नवं फीचर लाँच
फेसबुकचे स्मार्टवॉच येणार
सचिन पाटील

| Edited By:

Jan 31, 2020 | 7:31 PM

मुंबई : दोन वर्षापूर्वी फेसबुककडून यूजर्स प्रायव्हेसी संदर्भात मोठी घोषणा करण्यात आली (Facebook launch new feature) होती. कंपनीने म्हटलं होतं की, युजर्सला ब्राऊजिंग हिस्ट्री डिलीट करण्याचे बटण दिले जाणार. पण आता तुम्ही हे करु शकता, यासाठी तुम्हाला एक प्रोसेस फॉलो करावी लागणार आहे. दोन वर्षानंतर कंपनीने हे फीचर सादर केले आहे. फेसबुकने युजर्सला Off Facebook Activity चा पर्याय दिला आहे. काही देशांमधील युजर्सला हे फीचर (Facebook launch new feature) यापूर्वीच दिलेले आहे.

जर तुम्ही फेसबुकचा वापर करता तर हे फीचर तुमच्यासाठी फायदेशीर आहे. कारण याचा वापर करुन तुम्ही काही ठारवीक जाहिरातीपासून लांब राहू शकता. फेसबुकचे हे फीचर वापरणे सोपं आहे.

फेसबुकच्या मोबाईल अॅपमध्ये जाऊन सेटिंगमध्ये जावा. तिथे तुम्हाला एक लिस्ट मिळेल. या लिस्टमध्ये अकाऊंट सेटिंग्स, सिक्युरिटी, प्रायव्हेसी आणि युअर फेसबुक इनफॉर्मेशनची कॅटेगिरी मिळेल. युअर फेसबुक इनफॉर्मेशनच्या आत तुम्हाला Off-Facebook activity चा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्हाला अनेक पर्याय मिळतील. सर्वात वर अशा अॅपचे आयकॉन दिसतील जे तुमच्या अॅक्टिविटीला फेसबुकसोबत शेअर करतात. बऱ्याचदा काही बिझनेस आणि कंपन्या असतात ज्या तुमचा डेटा शेअर करतात.

इथे जेवढे आयकॉन दिसतील त्या सर्वांनी तुमचा डेटा फेसबुकसोबत शेअर केलेला आहे. जेव्हाही तुम्ही त्यांच्या वेबसाईटवर भेट देता. तेव्हा तुमची अॅक्टिविटी बिझनेस टूलच्या माध्यमातून फेसबूकसोबत केली जाते.

उदाहरण म्हणजे जर तुम्ही एखाद्या ऑनलाईन स्टोअरवरुन कपडे खरेदी करता. तर ते ऑनलाईन रिटेलर तुमच्या अॅक्टिविटीला बिजनेस टूलच्या माध्यमातून फेसबुकसोबत शेअर केली जाते. ही ऑफ फेसबुक अॅक्टिविटी असते.

ऑनलाइन रिटेलरमध्ये जिथून तुम्ही कपडे खरेदी करता तिथला तुमचा अॅक्टिविटी डेटा फेसबुकसोबत शेअर केला जातो. फेसबुककडून तो डेटा आपल्या अकाऊंटसोबत बँकेण्डला लिंक करतो.

यापूढे ई-रिटेलरवर काही ऑफर आल्यास टार्गेटेड जाहिराती तुम्हाला दिसण्यास सुरुवात होईल. अशा प्रकारची हिस्ट्री डिलीट करण्यासाठी तुमच्याकडे आता खास पर्याय उपलब्ध आहे.

Off-Facebook activity मध्ये तुम्हाला Clear History चा पर्याय मिळेल. हे क्लिअर करण्यापूर्वी जेवढा डेटा तुमच्या फेसबुकसोबत शेअर झाला आहे तो सर्व डेटा क्लिअर होणार. पण यानंतरही फेसबुकला दुसऱ्या कंपन्या डेटा देत राहणार.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें