AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Facebook मेसेंजर आणि Instagram DM मध्ये WhatsApp चं फीचर, चॅटिंग अधिक सुरक्षित होणार

तुम्ही जर फेसबुक मेसेंजर आणि इन्स्टाग्राम डायरेक्ट मेसेज (DM) वापरत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे कारण आता तुम्हाला या अ‍ॅप्समध्ये व्हॉट्सअ‍ॅपचं दमदार फीचर मिळणार आहे.

Facebook मेसेंजर आणि Instagram DM मध्ये WhatsApp चं फीचर, चॅटिंग अधिक सुरक्षित होणार
| Edited By: | Updated on: Aug 15, 2021 | 4:11 PM
Share

मुंबई : तुम्ही जर फेसबुक मेसेंजर आणि इन्स्टाग्राम डायरेक्ट मेसेज (DM) वापरत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे कारण आता तुम्हाला या अ‍ॅप्समध्ये व्हॉट्सअ‍ॅपचं दमदार फीचर मिळणार आहे. हे हे फीचर लाँच केल्यानंतर, वापरकर्ते त्यांचं खासगी चॅट कंट्रोल करु शकतील. या फीचरचे नाव एंड-टू-एंड एन्क्रिप्शन आहे. त्यामुळे कोणीही त्यांचे मेसेजेस वाचू शकणार नाही. (Facebook video and voice call and Instagram DM will get end to end encryption soon, chat will be safe)

मेसेंजरचे प्रोडक्ट मॅनेजमेंट डायरेक्टर रूथ क्रिकेली यांनी एका ब्लॉग पोस्टमध्ये म्हटलं आहे की, युजर्सना अपेक्षा असते की, त्यांचे चॅट्स सुरक्षित राहावेत, खासगी राहावेत, या नव्या सुविधांसह आम्ही त्यांना आश्वस्त करत आहोत. कंपनीने सांगितले की, 2016 पासून त्यांनी एंड-टू-एंड एन्क्रिप्शनसह वन-ऑन-वन टेक्स्ट चॅट सुरक्षित करण्याचा पर्याय दिला आहे. गेल्या वर्षभरात, मेसेंजरने दिवसाला 150 मिलियनहून अधिक व्हिडिओ कॉलसह ऑडिओ आणि व्हिडिओ कॉलिंगच्या वापरात वाढ पाहिली आहे.

चॅट्स हॅकर्स आणि गुन्हेगारांपासून सुरक्षित

क्रिकेली म्हणाले की, “आम्ही आता या चॅट मोड व्यतिरिक्त कॉलिंगमध्ये एंड-टू-एंड एन्क्रिप्शन सादर करत आहोत, जेणेकरून आपण या तंत्रज्ञानासह आपले ऑडिओ आणि व्हिडीओ कॉल संरक्षित करण्यासाठी हे फीचर निवडू शकाल, वैयक्तिक संभाषणांना हॅकर्स आणि गुन्हेगारांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी व्हॉट्सअॅप सारख्या अॅप्सद्वारे एंड-टू-एंड एन्क्रिप्शन आधीच मोठ्या प्रमाणावर वापरले जात आहे.”

फेसबुकने म्हटले आहे की, तुमचे मेसेजेस आणि कॉलचा कंटेंट एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड चॅटमधील संभाषण सुरक्षित आहे. कंपनीने म्हटले आहे की, त्यांनी एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड चॅटमध्ये एक्सपायरिंग मेसेज फीचरदेखील अपडेट केले आहे. कंपनीने म्हटले आहे की, ते काही देशांमध्ये प्रौढांसोबत मर्यादित चाचणी देखील सुरू करणार आहेत, ज्यामुळे त्यांना एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड संदेश आणि इंस्टाग्रामवर समोरासमोर संभाषणासाठी कॉल करण्याची परवानगी मिळेल.

इतर बातम्या

डेल्टा व्हेरिएंटची भीती, गुगल, अमेझॉननंतर Facebook कडून कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये बोलावण्याचा निर्णय स्थगित

Twitter ची ‘ब्लू टिक’ व्हेरिफिकेशन प्रोसेस पुन्हा बंद, ‘इतके’ दिवस वाट पाहावी लागणार

Whatsapp वेब, डेस्कटॉप युजर्सना फोटो एडिटिंगपासून ते डिसअपियरर्यंतचे सगळे फीचर्स मिळणार!

(Facebook video and voice call and Instagram DM will get end to end encryption soon, chat will be safe)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.