भारतातल्या आयफोन, आयपॅड युजर्ससाठी FAU-G गेम लाँच

FAU-G गेम केवळ अँड्रॉयड युजर्ससाठीचं लाँच केला होता. त्यामुळे आयफोन, आयपॅड युजर्स या गेमच्या आयओएस व्हर्जनची वाट पाहात होते.

भारतातल्या आयफोन, आयपॅड युजर्ससाठी FAU-G गेम लाँच
FAUG

मुंबई : अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर यावर्षी प्रजासत्ताक दिनी (26 जानेवारी) nCore गेम्सने FAU-G हा बॅटल गेम लाँच केला. लाँचिंगनंतर अवघ्या 24 तासात या गेमने एक नवा रेकॉर्ड प्रस्थापित केला. 24 तासांत गुगल प्ले स्टोरवरुन तब्बल 1 मिलियन (10 लाख) युजर्सने हा गेम डाऊनलोड केला होता. आतापर्यंत 6 मिलियनहून (60 लाख) अधिक युजर्सनी हा गेम डाऊनलोड केला आहे. PUBG हा गेम भारतात बॅन केल्यानंतर युजर्समध्ये FAU-G गेमबाबत खूप मोठी क्रेझ होती. ही क्रेझ लाँचिंगनंतर समोर आलेल्या डाऊनलोड्सच्या आकडेवारीवरुन पुन्हा एकदा स्पष्ट झाली आहे. (FAUG for iOS Now Available for Download from Apple App Store)

दरम्यान, हा गेम केवळ अँड्रॉयड युजर्ससाठीचं लाँच केला होता. त्यामुळे आयफोन, आयपॅड युजर्स FAU-G गेमच्या आयओएस व्हर्जनची वाट पाहात होते. त्यामुळे आता आयओएस युजर्सना वाट पाहावी लागणार नाही, कारण भारतातील आयओएस युजर्ससाठी FAU-G गेम लाँच झाला आहे. nCore गेम्सने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे. त्यामुळे हा गेम Apple अॅप स्टोअरवर विनामूल्य डाउनलोड केला जाऊ शकतो. हा गेम आयओएस 10.0 आणि त्यापुढील सर्व व्हर्जन्ससोबत कंपॅटिबल आहे.

FAU-G गेममध्ये मल्टीप्लेयर मोड

FAU-G (फियरलेस अँड युनायटेड गार्ड्स) गेम सिंगल प्लेयर मोडसह लाँच करण्यात आला होता. त्यानंतर यामध्ये मल्टीप्लेअर मोड देण्याची घोषणा कंपनीने केली होती. बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने याची पुष्टी केली आहे. अक्षयनेच हा गेम लाँच केला होता. त्यानंतर अक्षयने स्वतः ट्विटरवर एक पोस्ट करत याबाबतची माहिती दिली. अक्षयने त्याच्या ट्विटमध्ये म्हटलं होतं की, “तुमच्या मित्रांना शोधा, स्क्वाड बनवा आणि स्वातंत्र्यासाठी लढा! FAU-G चा मल्टीप्लेयर टीम डेथमॅच मोड लवकरच येतोय.”

कसा आहे सिंगल प्लेअर मोड?

सध्या हा गेम केवळ एकाच मोडवर खेळता येतो. याचाच अर्थ पूर्ण गेमचा अनुभव घेण्यासाठी तुम्हाला खूप वेळ लागेल. सध्या या गेममध्ये कॅम्पेन मोड उपलब्ध आहे. या मोडमध्ये भारतीय सैन्यदलाचा एक अधिकारी त्याच्या टीमपासून वेगळा झाला आहे, आणि त्याला शोधण्यासाठी बाकीचे अधिकारी आणि जवान मिशनवर जाणार आहेत.

स्मार्टफोनमध्ये अधिक स्पेसची गरज

तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनवर हा गेम खेळायचा असेल तर तुमच्या फोनमध्ये किमान 460 एमबी स्पेस असायला हवी. तसेच तुम्हाला या गेमच्या सर्व्हरमध्ये साईन इन करण्यासाठी मोबाइल किंवा वायफाय कनेक्शन/नेटवर्कची आवश्यकता भासेल.

FAU-G कसा डाऊनलोड कराल?

FAU-G हा गेम गुगल प्ले स्टोरवरुन डाऊनलोड करता येईल. परंतु उद्या गेमच्या लाँचिंगपर्यंत तुम्हाला वाट पाहावी लागणार आहे. गेम लाँच झाल्यानंतर काय-काय करावं लागेल. त्याची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.

1. सर्वात आधी गुगल प्ले स्टोर ओपन करा.

2. FAU-G असं सर्च करा.

3. त्यानंतर सर्च रिझल्ट्स दिसतील. त्यामधील पहिल्या-दुसऱ्या क्रमांकावरच FAU-G असेल, त्यावर क्लिक करा. (सुरुवातीच्या पर्यायांमध्ये FAU-G गेम दिसला नाही, तर तुम्हाला थोडं स्क्रोल करावं लागेल.

4. गुगल प्ले स्टोरवर गेम इन्स्टॉल करण्यासाठीचं पेज ओपन होईल.

5. इन्स्टॉलचं बटण युजर्सना तेव्हाच दिसेल, जेव्हा कंपनीकडून गेम लाईव्ह केला जाईल.

6. ज्या युजर्सनी या गेमसाठी आधीच प्री-रजिस्ट्रेशन केलेलं आहे, त्यांना गेम लाईव्ह होताच पुश नोटिफिकेशन पाठवलं जाईल. नोटिफिकेशनवर क्लिक करताच युजर्स थेट इन्स्टॉलेशन पेजवर जातील. युजर्स त्याद्वारे गेम इन्स्टॉल करु शकतात.

गुगल प्ले स्टोरवरुन बनावट FauG गेम्स हटवले

हा गेम प्री-रजिस्ट्रेशनसाठी उपलब्ध करण्यापूर्वी कंपनीने या नावाचे बनावट गेम्स प्ले स्टोरवरुन हटवले होते. FauG गुगल प्ले स्टोअरवर प्री रजिस्ट्रेशनसाठी उपलब्ध करुन देताना कंपनीने काही गेम प्ले फोटोदेखील शेअर केले आहेत, ज्यावरून या गेमची थीम कशी असणार आहे, याचा आपण अंदाज बांधू शकतो. काही दिवसांपूर्वी या गेमचा एक व्हिडिओ ट्रेलरही शेअर करण्यात आला होता. दरम्यान, या गेमसाठी प्ले स्टोरवर रजिस्टर करणाऱ्या युजर्सना गेम लाँच होताच पुश नोटिफिकेशन पाठवलं जाईल, त्यानंतर युजर्स गेम डाउनलोड आणि इंस्टॉल करुन खेळू शकतील.

संबंधित बातम्या

बॅन झालेल्या PUBG ला पछाडत ‘या’ नव्या गेमचा जगभरात डंका, छप्परफाड कमाई

Made In India गेम्स Pubg ला पछाडणार? पाहा देशातील टॉप-5 गेम्स

PUBG Mobile 2 लाँच होणार? जाणून घ्या कसा असेल नवा गेम

(FAUG for iOS Now Available for Download from Apple App Store)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI