Viral message : केंद्राकडून 30 हजारांचे अनुदान, ‘हा’ व्हायरल मेसेज मिळाला का; जाणून घ्या नेमकं तथ्य

केंद्र सरकारच्या अखत्यारित असलेली माध्यमसंस्था पीआयबीने व्हायरल मेसेजचा दावा खोटा असल्याचं सप्रमाण सिद्ध केलं आहे

Viral message : केंद्राकडून 30 हजारांचे अनुदान, ‘हा’ व्हायरल मेसेज मिळाला का; जाणून घ्या नेमकं तथ्य
व्हायरल मेसेजImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 08, 2022 | 7:20 PM

नवी दिल्ली : सोशल मीडियावरुन (Social Media) फसवणुकीच्या घटनांत अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. बनावट माहितीच्या आधारावर व्हायरल मेसेजच्या माध्यमातून सर्वसामान्यांना कोट्यावधी रुपयांचा गंडा घातल्याच्या घटना उजेडात आल्या आहेत. सध्या सोशल मीडियावर केंद्रीय अर्थमंत्रालयाकडून 30 हजार रुपये अनुदानाचा मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. देशातील नागरिकांना कठीण आर्थिक स्थितीत सहाय्य करण्याच्या हेतूने केंद्राने आर्थिक सहाय्य (Finance assistance) अनुदानाची मोहीम हाती घेतल्याचे म्हटलं आहे. दरम्यान, केंद्र सरकारच्या अखत्यारित असलेली माध्यमसंस्था पीआयबीने व्हायरल मेसेजचा (PIB Viral Check) दावा खोटा असल्याचं सप्रमाण सिद्ध केलं आहे आणि बनावट संदेशाच्या माध्यमातून प्राप्त होणाऱ्या कोणत्याही लिंकवर क्लिक न करण्याचे आवाहन जनतेला करण्यात आलं आहे.

व्हायरल मेसेज काय?

सोशल मीडियावर ‘https://bit.ly/3P7CiPY’ लिंक असलेला मेसेज व्हायरल होत आहे. अर्थमंत्रालयाच्या माध्यमातून 30,628 रुपयांच्या अर्थसहाय्यतेचा दावा यामाध्यमातून करण्यात आला आहे. लिंक वर क्लिक करण्याचे आवाहन केले जात आहे. दरम्यान, पीआयबीने अशाप्रकारच्या लिंकवर क्लिक करुन आर्थिक फसवणूक टाळण्याचे आवाहन जनतेला केले आहे.

अफवांपासून सावध राहा

पीआयबीनं फॅक्ट चेकच्या माध्यमातून दाव्याची सत्यता पडताळली आहे. व्हायरल मेसेज होणारा पूर्णपणे खोटा असल्याचं स्पष्ट केलं आहे. केंद्र सरकारच्या अर्थ विभागानं याबाबतची कोणतीही योजना आखलेली नाही. सोशल मीडिया वापरकर्त्यांनी अशा प्रकारच्या अफवांपासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मेसेजपासून सावध राहा

पीआयबी फॅक्ट चेकनंतर हा मेसेज पूर्णपणे खोटा असल्याचे म्हटले जात आहे. लिंकवर क्लिक करण्याद्वारे कुणीही खासगी बँकिंग संबंधित माहिती सार्वजनिक करू नये. बँक खात्याचे तपशीलांची माहिती दिल्यास मोठ्या आर्थिक फसवणुकीला सामोरे जावे लागू शकते.

कसं कराल फॅक्ट चेक?

तुमच्याकडे अशाच स्वरुपाचे मेसेज येत असल्यास अशाप्रकारच्या मेसेजचे सत्य जाणून घेण्यासाठी फॅक्ट चेक करू शकता. तुम्हाला पीआयबीच्या माध्यमातून फॅक्ट चेकचा पर्याय उपलब्ध आहे. यासाठी तुम्हाला अधिकृत लिंक https://factcheck.pib.gov.in/ वर क्लिक करावे लागेल. यासोबतच तुम्ही व्हॉट्सअ‍ॅप नंबर +918799711259 किंवा ईमेल pibfactcheck@gmail.com यावर तथ्य शोधन करू शकतात.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.