Flipkart Big Saving Days Sale : स्वस्तात खरेदी करा Poco, Samsung आणि Apple चे स्मार्टफोन्स

Flipkart Big Saving Days Sale 2 मेपासून सुरू होत आहे. या सेलमध्ये विविध ब्रँड्सच्या स्मार्टफोन्सवर तगडा डिस्काऊंट जाहीर करण्यात आला आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 8:30 AM, 2 May 2021
Flipkart Big Saving Days Sale : स्वस्तात खरेदी करा Poco, Samsung आणि Apple चे स्मार्टफोन्स
Flipkart Big Saving Days Sale

मुंबई : फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेज सेल (Flipkart Big Saving Days Sale) 2 मेपासून सुरू होत आहे. या सेलमध्ये विविध ब्रँड्सच्या स्मार्टफोन्सवर तगडा डिस्काऊंट जाहीर करण्यात आला आहे. या सेलमध्ये तुम्ही आयफोन किंवा विविध कंपन्यांचे अँड्रॉयड स्मार्टफोन्स विकत घेऊ शकता. फ्लिपकार्टने अनेक चांगल्या डील्स आणि ऑफर्स सादर केल्या आहेत. तसेच कंपनीने एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांनी कार्ड आणि ईएमआयद्वारे स्मार्टफोन खरेदी केल्यास व्यवहारांवर त्यांना 10 टक्के सूट मिळणार आहे. (Flipkart Big Saving Days Sale : Buy Poco, Samsung and Apple smartphones in less price)

फ्लिपकार्ट अनेक स्मार्टफोनवर विविध सवलती देत आहे. आम्ही तुम्हाला अशाच फोन्सची यादी देणार आहोत, ज्यावर कंपनीने शानदार डील्स सादर केल्या आहेत. ज्या युजर्सना 20,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत दमदार स्मार्टफोन हवा आहे, अशा युजर्ससाठी सॅमसंग गॅलेक्सी F62 हा एक चांगला पर्याय आहे. आयफोन प्रेमींसाठीदेखील या सेलमध्ये चांगल्या डील्स मिळतील. त्यातही प्रामुख्याने iPhone 11 वर चांगली ऑफर देण्यात आली आहे.

POCO M3

पोको एम 3 या स्मार्टफोनवर 1,000 रुपयांची सूट देण्यात आली आहे. हा स्मार्टफोन ग्राहक 9,999 रुपये या सुरुवातीच्या किंमतीत खरेदी करु शकतात. हा स्मार्टफोन बोल्ड डिझाईन आणि आकर्षक लुकसह सादर करण्यात आला आहे.

सॅमसंग गॅलेक्सी F62

6,000 रुपयांच्या डिस्काऊंटसह गॅलेक्सी F62 उपलब्ध आहे. ग्राहक हा स्मार्टफोन 17,999 रुपये इतक्या किंमतीसह खरेदी करु शकतात. गेममर्ससाठी हा एक उत्तम फोन आहे. या फोनचा प्रोसेसर Exynos 9825 हाय-एंड परफॉर्मन्स देतो. तसेच यामध्ये 7000mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.

Realme Narzo 30A

Realme Narzo 30A या स्मार्टफोनवर 2,000 रुपयांची सूट देण्यात आली आहे. त्यामुळे हा स्मार्टफोन 7,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. Narzo 30A मध्ये 6000mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन फास्ट Helio G85 चिपसह येतो.

Realme 8

नुकत्याच लाँच करण्यात आलेल्या Realme 8 या स्मार्टफोनवर 1,000 रुपयांची सूट देण्यात आली आहे. 13,999 रुपये या सुरुवातीच्या किंमतीत हा स्मार्टफोन खरेदी करता येईल. Realme 8 मध्ये एक AMOLED डिस्प्ले मिळेल.

Realme X50 प्रो 5 जी

जर तुम्ही परफॉर्मन्स फोकस्ड फोनच्या शोधात असाल तर Realme X50 Pro 5G हा स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट पर्याय ठरू शकतो. 24,999 रुपये या किंमतीत हा फोन उपलब्ध असून यामध्ये स्नॅपड्रॅगन 865 चिप उपलब्ध आहे.

Realme X7 Pro 5G

Realme X7 Pro 5G हा स्मार्टफोन दोन महिन्यांपूर्वी लाँच करण्यात आला होता. आता हा स्मार्टफोन 2,000 रुपयांच्या डिस्काऊंटसह उपलब्ध आहे. हा स्मार्टफोन तुम्ही 27,999 रुपये या किंमतीत खरेदी करु शकता. यामधील डायमेन्सिटी 1100+ चिप जवळपास सर्व प्रकारच्या अॅप्स आणि गेम्सना कंट्रोल करण्यास, सुरळीतपणे चालवण्यास सक्षम आहे. Realme X7 5G देखील डायमेंशन 800U चिपसह 1,000 रुपयांच्या डिस्काऊंटसह उपलब्ध आहे.

iPhone 11

आयफोन 11 चं बेस 64 जीबी व्हेरिएंट 44,999 रुपये या किंमतीसह उपलब्ध आहे. A13 बायोनिक चिपसह या फोनमध्ये तुम्हाला UWB चिपदेखील मिळेल. जी AirTags ना सपोर्ट करते.

इतर बातम्या

लॉकडाऊन काळात लोकांची जोरदार ऑनलाईन शॉपिंग, Amazon ची छप्परफाड कमाई

POCO M3 5G स्मार्टफोन लाँचिंगच्या मार्गावर, शानदार कॅमेरासह जबरदस्त फीचर्स मिळणार

Realme च्या सर्वात स्वस्त 5G फोनचा आज पहिला सेल, 8GB/128GB सह ढासू फीचर्स मिळणार

(Flipkart Big Saving Days Sale : Buy Poco, Samsung and Apple smartphones in less price)