AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गुगल आणि मायक्रोसॉफ्टचे कोर्स आता पूर्णपणे फ्री, कशी कराल नोंदणी?

आजच्या स्पर्धात्मक युगात AI आणि टेक्नोलॉजीची समज असणे ही यशस्वी करिअरसाठी गरजेची बाब बनली आहे. आणि जर हे ज्ञान तुम्हाला मोफत, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्रोतांद्वारे मिळत असेल, तर त्याचा लाभ घेतलाच पाहिजे.

गुगल आणि मायक्रोसॉफ्टचे कोर्स आता पूर्णपणे फ्री, कशी कराल नोंदणी?
job tech
| Edited By: | Updated on: Jun 25, 2025 | 10:33 PM
Share

भारतातील टेक क्षेत्रात येत्या काही वर्षांत प्रचंड संधी निर्माण होणार आहेत. सर्विसनाउ या आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेच्या अहवालानुसार, २०२८ पर्यंत भारतात टेक क्षेत्रात तब्बल २७ लाख नोकऱ्या निर्माण होतील. विशेषतः आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) या क्षेत्रातील ज्ञान अत्यावश्यक ठरणार आहे. त्यामुळे जर आपण टेक्नोलॉजी क्षेत्रात उज्ज्वल भविष्य घडवण्याची स्वप्नं पाहत असाल, तर आता काही प्रसिद्ध कंपन्यांचे कोर्स मोफत उपलब्ध आहेत जे तुम्हाला या स्पर्धेत आघाडीवर नेऊ शकतात.

या कोर्सेसमध्ये गुगल, मायक्रोसॉफ्ट आणि अमेझॉन सारख्या नामवंत कंपन्यांचा समावेश असून ते ऑनलाईन, संपूर्णपणे नि:शुल्क स्वरूपात पूर्ण करता येतात.

1. गुगलचा ‘AI आणि मशीन लर्निंग क्रॅश कोर्स’

हा कोर्स त्यांच्यासाठी आहे ज्यांना पायथन प्रोग्रॅमिंग थोडं थोडं येतं आणि जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) शिकायचं ठरवत आहेत. या कोर्समध्ये सुपरवाइज्ड आणि अनसुपरवाइज्ड लर्निंग म्हणजेच AI कसं काम करतं, डेटा कसा तयार करायचा, मॉडेल कसं तयार करायचं आणि त्याची चाचणी कशी घ्यायची हे शिकवलं जातं. हा कोर्स गुगलच्या ‘Google for Developers’ या वेबसाइटवर फ्रीमध्ये मिळतो. यासाठी तुम्हाला फक्त नोंदणी करावी लागते.

2. अमेझॉनचा ‘AI आणि मशीन लर्निंग फाउंडेशन कोर्स’

जे लोक प्रोग्रॅमिंगमध्ये नवखे आहेत आणि AI म्हणजे काय हे शून्यावरून शिकू इच्छितात, त्यांच्यासाठी हा कोर्स योग्य आहे. यात AI आणि मशीन लर्निंगच्या बेसिक गोष्टी शिकवल्या जातात. यासोबतच अमेझॉनचे AWS टूल्स कसे वापरायचे हेही शिकायला मिळतं. हा कोर्स Udacity आणि AWS या वेबसाइट्सवर मोफत मिळतो. कोर्स करण्यासाठी ऑनलाइन नोंदणी लागते.

3. मायक्रोसॉफ्टचा ‘AI Fundamentals’ कोर्स

जर तुम्हाला संगणक वापरता येत असेल आणि तुम्ही AI म्हणजे काय, तो कुठे-कुठे वापरला जातो हे समजून घ्यायचं ठरवलं असेल, तर हा कोर्स नक्की तुमच्यासाठी आहे. यात AI चा इतिहास, तो आरोग्य, शिक्षण, बँकिंग यामध्ये कसा वापरला जातो हे सोप्या भाषेत समजावलं जातं. मशीन लर्निंग, डीप लर्निंग आणि न्यूरल नेटवर्क म्हणजे काय हेही यात शिकायला मिळतं. मायक्रोसॉफ्टच्या Microsoft Learn वेबसाइटवर हा कोर्स मोफत आहे. फक्त रजिस्ट्रेशन करावं लागतं.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.