AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SIM कार्ड लवकरच इतिहासजमा, सॅटलाईट इंटरनेट घेणार जागा, काय आहे अपडेट

Satellite Internet SIM Card | सॅटेलाईट कनेक्शन म्हणजे सॅटेलाईट इंटरनेटविषयी अनेक वर्षांपासून उत्सुकता आहे. स्पेसएक्सचा मालक एलॉन मस्क भारतात ही सेवा सुरु करण्यासाठी प्रयत्न करत आहे. आता या कंपनीने करार पण केला आहे. लवकरच देशात सॅटेलाईट इंटरनेटची सुविधा मिळणार आहे.

SIM कार्ड लवकरच इतिहासजमा, सॅटलाईट इंटरनेट घेणार जागा, काय आहे अपडेट
सॅटेलाईट इंटरनेटचा जमाना
| Updated on: Mar 15, 2024 | 1:51 PM
Share

नवी दिल्ली | 15 March 2024 : सॅटेलाईट इंटरनेटचे युग लवकरच भारतात आवतरु शकते. आता याविषयी एक मोठी अपडेट समोर येत आहे. स्पेसएक्सचा मालक Elon Musk भारतात ही सेवा सुरु करण्यासाठी खटाटोप करत आहे. पण त्यापूर्वीच या कंपनीने बाजी मारली आहे. भारतीय कंपनी वन वेबने स्पेक्ट्रमसाठी अर्ज दाखल केला आहे. यावर्षी जून महिन्यापर्यंत देशात व्यावसायिक सॅटेलाईट ब्रॉडबँड सेवा सुरु होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. याविषयीचा खुलासा एका अहवालात करण्यात आला आहे.

6 वर्षांचा केला करार

कंपनीने सहा वर्षांकरीता वितरणाचा करार केला आहे. भारतात लो अर्थ ऑर्बिट कनेक्टिव्हिटी सेवा देण्यासाठी सहा वर्षांचा करार करण्यात आला आहे. ह्युजेस कम्युनिकेशन्स इंडिया आणि वन वेब यांच्यात झालेल्या करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे. कंपनीनुसार, वनवेबला यामुळे मोठा दिलासा मिळेल. अजून तरी बाजारात इतर कोणती कंपनी नाही. त्यामुळे या दोन कंपन्यांना हा मोठा निर्णय ठरु शकतो.

सिम कार्ड इतिहासजमा

केंद्र सरकारने याविषयी अद्याप कोणताही दुजोरा दिलेला नाही. तसेच ही यंत्रणा कशी काम करेल, त्याची प्रक्रिया काय असेल याची माहिती देण्यात आलेली नाही. पण दूरसंचार कंपन्या याविषयी सातत्याने काम करत आहेत. एकदा सॅटेलाईट कनेक्शन मिळाल्यावर सिम कार्डची कोणतीही आवश्यकता राहणार नाही. सध्या याविषयी ट्रायल सुरु आहे. ही सेवा भारतीय मोबाईलधारकांना कधी मिळेल, याचा ही खुलासा करण्यात आलेला नाही.

जिओ पण मैदानात

सॅटेलाईट इंटरनेटच्या स्पर्धेत जिओ पण मैदानात उतरणार आहे.  Jio Space Fiber माध्यमातून ग्राहकांना अंतराळातून, सॅटेलाईटच्या माध्यमातून इंटरनेट उपलब्ध होईल. सॅटेलाईट आधारीत गीगा फायबर तंत्रज्ञानामुळे दूर्गम भागातही इंटरनेट मिळेल. त्यामुळे या भागातही अनेक सोयी-सुविधा सहज पोहचू शकतील. जिओ ही सेवा देशभरात किफायतशीर दरात पुरवणार आहे. सध्या Jio Fiber Broadband आणि Jio AirFiber या सेवा बाजारात उपलब्ध आहेत. हे दोन्ही गतिमान इंटरनेट सुविधा पोहचवत आहेत.

Follow Us
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे...
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे दृश्य पाहाच!
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं....
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं बरळण्यापेक्षा...
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया...
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया समोर, एका वाक्यातच...
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी अखेर Metaने मागितली माफी, पहा व्हिडीओ
वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळ
Walmik Karad | वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळबळ
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत?
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत? सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut On SC Hearing | शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर संजय राऊतांचा मोठा दावा
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात...
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात नेमकं काय घडलं?
कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून...
Kunbi Certficate | कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून मोठी अपडेट समोर!